कोंडीमुक्‍त प्रवासाचे ‘स्वातंत्र्य’; 15 ऑगस्ट रोजी ‘इतक्या’ लोकांनी केला मेट्रो प्रवास

पुणे – मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे जोडली गेली आहेत. तर, या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांनी स्वातंत्र्यदिनी नवा विक्रम केला. दि. 15 ऑगस्टच्या दिवसभरात तब्बल 1 लाख 23 हजार 720 प्रवाशांनी मेट्रोची सैर अनुभवली. त्यामुळे वाहतूक कोंडीमुक्‍त प्रवासाचा आनंद या नागरिकांना मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते … Read more

जोर का झटका ! आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वीजदरात मोठी वाढ; घरगुती वीजेच्या दरात तब्बल ‘एवढी’ वाढ

मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशीपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. कारण बँकिंग,सोने दरवाढीसह नागरिकांना वीजदरवाढीचा झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरच्या वीज दरात मोती वाढ केली असल्याचे समोर आले आहे. महावितरण कंपनीने आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी हा भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

महावितरणच्या पुणे परिमंडळ मुख्य अभियंता पदी राजेंद्र पवार

पुणे – महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून राजेंद्र पवार यांनी पदोन्नतीवर गुरुवारी (दि. ०१) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांची औरंगाबाद परिमंडलामध्ये समकक्ष पदावर बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी पवार रुजू झाले आहेत. मुख्य अभियंता राजेंद्र पवार हे मूळचे भऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथील रहिवासी आहे. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी … Read more

सत्तेवर येताच शिंदे सरकारच गिफ्ट; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुंबई – महागाईने सध्या सर्वसामान्यांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. दिवसेंदिवस जीवनावश्‍यक वस्तूंसह इंधनाच्या दरात वाढ होत आहे. त्यात आणखी भर पडली असून काही दिवसांपूर्वीच महावितरणनेही वीजदरात वाढ केली आहे. यामुळे नवीन सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारला विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याच विषयावरून सत्ताधारी शिंदे सरकारवर हल्ला चढवला असून महाराष्ट्रात नवीन … Read more

महावितरणच्या नावाखाली दहा लाखांची फसवणूक

पिंपरी – महावितरणचे पेमेंट अपडेट करण्याच्या नावाखाली एका निवृत्त शिक्षिकेची 10 लाख 30 हजार 920 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना सांगवी येथे घडली. याबाबत 53 वर्षीय महिलेने बुधवारी (दि. 6) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9907496946 या फोनवरील अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेचे सांगवी येथे घर असून … Read more

कोल्हापूर: महावितरणच्या इचलकरंजी विभागात आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा कार्यशाळा

कोल्हापूर – महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयात जनमित्र, बाह्यस्त्रोत, ठेकेदारांचे वीज कर्मचारी यांचे करिता आपत्ती व व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरक्षा कार्यशाळा संपन्न झाली. महापूराची स्थिती उद्भवल्यास ती कशी हाताळावी याचे प्रशिक्षण दिले गेले. दैनंदिन कामातील सुरक्षा साधनाचे महत्व व विनाअपघात सेवा याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. सुरक्षा विषयक माहितीपटाच्या माध्यमातून वीज कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यशाळेस कार्यकारी अभियंता … Read more

महावितरण बारामती परिमंडलाची 6 हजार 201आकडे बहाद्दरांवर धडक कारवाई

बारामती(प्रतिनिधी) – बारामती परिमंडलाने गेल्या पाच दिवसांमध्ये आकडे बहाद्दरांविरुद्ध धडक कारवाई करुन वीज यंत्रणेवरील वाढीव ताण कमी करण्याचे मोठे काम केले आहे. परिमंडलातील 489 ओव्हरलोड फिडरवरील कारवाई करताना तब्बल 6201 आकडे पकडून जप्त करण्यात आले. त्यामुळे साधारणत 174 मेगावॅटचा वाढीव ताण कमी झाला आहे. वाढत्या तापमानामुळे राज्याची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचत असताना कोळसा टंचाईमुळे मागणी … Read more

महाराष्ट्रात भारनियमनाचे संकट

पुणे –राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्याअभावी वीज निर्मितीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे सुमारे 2500 ते 3,000 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यावर आता उतारा म्हणून शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन केले जाणार आहे. त्यामुळे उष्णतेने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यात दिवस काढण्याची वेळ आली आहे. याबाबत … Read more

पुणे जिल्हा: महावितरणच्या कामगार- वायरमन यांच्यात “फ्री स्टाईल’ हाणामारी

नारायणगाव (जुन्नर) – महावितरणचा कंत्राटी कामगार स्वतः च्या घरातील वीज मीटरमधून वीज चोरी करीत आहे. वीज ग्राहकांना सुद्धा वीज चोरीसाठी मदत करत असल्याची तक्रार स्थानिक वायरमनने महावितरणच्या वरीष्ठ अधिकार्‍यांच्याकडे केली. या वादातून कंत्राटी कामगार व वायरमन या दोघांमध्ये नारायणगाव (ता. जुन्नर) येथील टोमॅटो उपबजारात ‘फ्री स्टाईल’ कुस्ती झाली. या कुस्तीत वायरमनने मात्र कंत्राटी कामगाराला चितपट … Read more

काडीपेटी भिजल्याने अनर्थ टळला; महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा डिझेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर – गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे आणि शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडल्याचा निषेधार्थ गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच कार्यकारी अभियंता यांच्या समोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अचानक झालेल्या या घटनेने महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आक्रमक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा ही प्रयत्न केला आहे. मात्र अधिकारी वीज तोडण्याचं समर्थन करताना पाहायला मिळाले. कोल्हापूर … Read more