PUNE: येरवडा मेट्रो स्थानकांवरून विमानतळासाठी फिडर सेवा

पुणे – मेट्रो प्रकल्पातील रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहे. उर्वरित कामे पूर्ण करून हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, त्या सोबतच या स्थानकाच्या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने पादाचार्‍यांसह, विमानतळ तसेच नगररस्त्याने जाणार्‍या खासगी तसेच एसटीच्या बसेससाठी स्वतंत्र बस बे उभारले … Read more

MSRTC : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न – मंत्री देसाई

सातारा :- कोरोना संसर्गामुळे विविध प्रतिबंध लादण्यात आले होते. या प्रतिबंधामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले. महामंडळ हे सर्वसामान्यांचे परिवहनाचे साधन आहे. या महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. पाटण एसटी बस आगाराला नवीन दहा बसेस मिळाल्या आहेत त्याचे लोकार्पण पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते … Read more

‘एसटी’चे खासगीकरण; विलीनीकरणा संदर्भात मंत्रिमंडळातून मोठी बातमी

मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी वगळता राज्य सरकारकडून अन्य् सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम असल्याचे चित्र आहे. असे असताना मंत्रीमंडळाने राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी फेटाळली आहे. ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून, त्यातून चुकीचा पायंडा पडेल, … Read more

निलंबनाचा धसका : आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उस्मानाबाद – साताऱ्यातील एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तुळजापूर तालुक्यात आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दिवभरातील ही दुसरी घटना आहे. सहकाऱ्यांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा धसका घेतल्यामुळे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या अन्य् सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  किरण घोडके असे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘गोड’; राज्य सरकारची एसटी महामंडळाला 1 हजार कोटीची मदत

मुंबई – पैशा अभावी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे राज्य परिवहन मंडळाला शक्‍य झाले नव्हते. त्यामुळे त्यासाठी राज्य सरकारने एस. टी. महामंडळाला एक हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. पुढील सहा महिने ही मदत टप्प्याटप्याने मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर … Read more

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर सरकार जागं झालं; तासाभरात कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची घोषणा

मुंबई – एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारातील वाहक मनोज अनिल चौधरी (वय-30, रा. कुसुंबा, ता. जळगांव) यांनी आज (सोमवारी) सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेकांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती. या घटनेनंतर सरकारला जाग आली आली आहे. तासाभरात महिन्याचं वेतन आणि दिवाळी बोनस देण्यात येणार … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महामंडळ कर्ज काढून देणार थकित वेतन

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यंसाठी दिलासादायक बातमी आहे. थकित वेतन देण्यासाठी महामंडळानं 2 हजार कोटींचं कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. लाॅकडाऊनमुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन थकले आहे. सध्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देणं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे वेतन … Read more

परीक्षार्थींची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

पुणे – आगामी काळात परीक्षार्थींची ने-आण करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाने उचलली आहे. यासाठी ऑक्टोबरमध्ये विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.   ऑक्टोबरमध्ये राज्यातील विविध केंद्रांवर “एमएचटी सीईटी’ आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकडून (एसटी) परीक्षार्थींची ने-आण करण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आहे. पुणे विभागातून परीक्षांच्या तारखांतून दोन सत्रांत बसेस … Read more

एसटीची पहिली स्लिपर बस प्रवाशांच्या सेवेत दाखल

मुंबई : एसटी महामंडळाकडून एसटीच्या परळ आगारात स्लिपर आणि आसन व्यवस्था असणाऱ्या दोन्ही एसटी बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. एसटीच्या रातराणी बस म्हणून यांची ओळख असणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 40 बसेस राज्यात धावणार आहेत. माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवाकर रावते संकल्पनेतील ही रातराणी नव्या रूपात आणि सर्वसामान्यांना परवडेल अशीच आहे. … Read more

एस. टी. महामंडळाच्या बसेस होणार “जीपीएस’ने सुसज्ज

अजय शिंदे पुणे विभागातून सातारा, कराड, वाई आगारांची निवड सातारा  – महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) रस्त्यांवरून धावणाऱ्या बसेसच्या लोकेशनचा तपशील नोंदवण्यासाठी या बसेसमध्ये ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीमच्या (जीपीएस) धर्तीवर “व्हीटीएस’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) सॉफ्टवेअर बसवण्याची योजना अंमलात आणली जात आहे. या सिस्टीममुळे बसचे नेमके लोकेशन समजल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले … Read more