पुणे | टास्क फ्रॉडमधून चौघांना ४३ लाखांचा गंडा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ऑनलाइन टास्कच्या आमिषाने शहरात होणारे फसवणुकीचे प्रकार अद्यापही सुरूच असून, सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चाैघांची ४३ लाख ६९ हजार ९६६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी, चंदनगर, लोणीकंद आणि मुंढवा पोलीस ठाण्यांत माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीने चतुःश्रृंगी पोलिस … Read more

पुणे | तरीही गावकर्‍यांना जलपर्णी काढण्याचे वावडे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंढवा, केशवनगर, खराडी येथे नदीवर अक्षरश: डासांचे थवेच्या थवे असताना या परिसरातील नागरिक नदीमध्ये साठलेली जलपर्णी महापालिकेला काढूच देत नसल्याचा प्रकार महापालिकेच्या अधिकार्‍यांना अनुभवायला येत आहे. त्यामुळे या डासांचा बंदोबस्त कसा करावा, यासंदर्भात महापालिकेपुढे मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. मुंढवा, केशवनगर, खराडी या भागांत नदीपात्रातील जलपर्णीमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची व्युत्पत्ती होऊन … Read more

PUNE: मुंढवा जॅकवेलच्या वीजबीलाचा भार पालिकेवर; महावितरणचा कारभार

पुणे –  शहरात निर्माण होणारे सांडपाणी प्रक्रीया करून ते पुन्हा शेतीला देण्यासाठी महापालिकेकडून मुंढवा येथे जॅकवेल उभारण्यात आला आहे. जॅकवेलला महावितरणकडून एप्रील २०२३ पूर्वी शेतीच्या दराने वीज बील आकारण्यात येत होते. मात्र, महावितरणकडून त्यात बदल करण्यात आला असून आता थेट सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी आकारला जाणार दर लागू करून महावितरणने महापालिकेस शाॅक दिला आहे. कृषी आकारणीसाठी … Read more

शिवसेना (शिंदे गट) आंदोलनाला यश; मुंढवा व हडपसरची वाहतूक कोंडी फुटणार

हडपसर – हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी बुद्रुक या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रवास करत असताना वाहतूक कोंडी सारख्या समस्येला दररोज सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही प्रशासन कोणताही ठोस असा निर्णय घेत नसल्यामुळे, काही दिवसांपूर्वी मुंढव्यातील महात्मा फुले चौकात शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद … Read more

डेंग्यूच्या अळ्यांची “मनपा’कडून पैदास ? पुणे मुुंढव्यातील नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया; समस्यांकडे दुर्लक्ष

  मुंढवा, दि. 29 (प्रतिनिधी) – मुळा-मुठा जुना नदीपुलावरील पदपथांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. घाणीमुळे व राडारोड्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे. पुलावरच गेल्या महिनाभरापासून पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळ्या दिसू लागल्या आहेत, त्यामुळे महापालिकेने हा नवा प्रकल्प हाती घेतला आहे काय? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. मुंढवा परिसरात गेल्या आठ-दहा वर्षात रस्तारुंदीकरणाची कामे … Read more

मुंढवा चौक विस्तारीकरण रखडले

मुंढवा (मनोज गायकवाड) – पुणे-सोलापूर महामार्ग परिसर, पुणे स्टेशन परिसर आणि पुणे-नगर महामार्ग जोडणारा महत्त्वाचा चौक असलेल्या मुंढवा येथील महात्मा फुले चौकाचे विस्तारीकरणासह येथे येणाऱ्या रस्त्यांचेही रूंदीकरण होणे गरजेचे आहे. याबाबतच प्रस्ताव महानगरपलिकेसह बांधकाम विभागाकडे प्रस्तावित आहे. नागरिक जागा देण्यास तयार आहेत. परंतु, भुसंपादनाचा प्रश्‍न “ताबा पावती’ तसेच नुकसान भरपाईच्या मुद्यावर अडकला आहे. मुंढवा चौक … Read more

Pune : 10 कोटी मिळकतकर भरूनही सुविधा नाहीत

मुंढवा –केशवनगर गाव महानगरपालिकेत समाविष्ठ होऊन पाच वर्षे पूर्ण झाली. परंतु, येथील नागरिक मूलभूत समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाहीत. पाणीप्रश्‍न, अखंडीत वीजपुरवठा, रस्ता रुंदीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, रस्त्यांवरील अतिक्रमणे, ओढ्या-नाल्यात कचऱ्याची दुर्गंधी, नदीपात्रात राडारोडा अशा अनेक समस्या असताना या परिसरातील नागरिकांनी गेल्या आर्थिक वर्षाचा तब्बल 10 कोटींच्या आसपास मिळकतकर भरला आहे. नागरिक प्रामाणिकपणे मिळकत कर भरत … Read more

प्रभाग रचनेबाबत हरकती; नागरिकांनी नोंदविला निषेध

मुंढवा, (मनोज गायकवाड) –पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर केशवनगरमधील बहुसंख्य नागरिकांनी आपल्या हरकती हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात नोंदविल्या आहेत. यात प्रामुख्याने येथील प्रभागाचे नाव बदलावे. तसेच, केशवनगर गावाचे तुकडे करू नयेत, अशा विविध हरकती असल्याचे तसेच यावर योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर संपूर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचे केशवनगरचे माजी … Read more

मुंढव्यात नदीचे पाणी शिरण्याचा धोका

मुंढवा, (मनोज गायकवाड) –केशवनगर येथे मुळामुठा नदीपात्रात जुन्या बांधकामांचा राडारोडा तसेच कचरा टाकला जात असल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला असून पावसाळ्यात पुरसदृश्‍य स्थिती निर्माण होऊन मुंढव्यात नदीलगतच्या परिसरात पाणी शिरण्याचा मोठा धाका आहे. त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी टाकण्यात आलेला कचरा तातडीने उचलणे गरजेचे ठरत आहे. मुंढव्यात नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढिग साचले आहेत. यामुळे … Read more

प्रभात इफेक्ट : अखेर मुंढव्यातील खड्ड्यांना लागले डांबर

मुंढवा – येथील महात्मा फुले चौकातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यांचा अंदाज न आल्याने अपघात वाढले होते. त्यावर “मुंढव्यातील खड्डे बुजविणार कोण?’ अशा आशयाची बातमी “प्रभात’ने नुकतीच प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत नगरसेविका पूजा कोद्रे यांनी पथ विभागास सूचना दिल्या. त्यावर हे खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी “प्रभात’चे आभार … Read more