Pune Crime: पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग; धारदार शस्त्राने वार करत दुसऱ्या पतीचा खून

पुणे – पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसर्‍या पतीवर खूनी हल्ला केला. धारधार हत्याराने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सोनल उर्फ सुमीत पटेकर (रा.पवळे चौक कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, प्राजक्त सोनल उर्फ सुमित पटेकर (वय.34,रा. कसबा पेठ) यांनी … Read more

धक्कादायक ! आई-पत्नीसह 8 जणांची सामूहिक हत्या; नंतर स्वतःच घेतला गळफास

छिंदवाडा – मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे एका युवकाने आपल्या कुटुंबातील 8 जणांची हत्या करून गळफास लावून घेतला. आरोपीने आधी पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला, त्यानंतर आई-बहीण, भाऊ-वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची हत्या केली. मामाच्या घरी गेल्यावर त्याने 10 वर्षाच्या चिमुरडीवरही हल्ला केला, मात्र तो जीव वाचवण्यासाठी पळून गेला. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. तामिया तहसीलमधील माहुलझीर पोलिस … Read more

Crime News : ५७० रुपयाच्या वीजबिलाने केला महिला वीज कर्मचाऱ्याचा घात; कोयत्याने सपासप वार करत केला खात्मा

बारामती (प्रतिनिधी) – वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका ३४ वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करुन खात्मा केल्याची घटना मोरगाव (ता. बारामती) येथे आज सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेला आहे. मुळच्या लातूर शहरातील रहिवाशी असलेल्या … Read more

Crime News । बारामती शहरात आढळला दोघांचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु…

बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरातील जामदार रोड परिसरातील खत्री पवार इस्टेट या इमारतीमध्ये पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाचा गळा व एकाची नस कापलेले अवस्थेत हे मृत्यूदेह आढळून आले आहेत. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी फोनवरून पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. या … Read more

Murder News: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात तरुणाचा निर्घृण खून

Pune Murder News – पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात अप्पर डेपाे वसाहत याठिकाणी बाळासाहेब ओसवाल यांच्या नवीन बांधकामाच्या इमारतीतील गाळ्याच्या कामाच्या साईटवर एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार साेमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी मृताची ओळख पटविण्याचे काम पाेलीस करत आहे. नेमका खून काेणी केला व काेणत्या कारणास्तव केला याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

कृषी पर्यवेक्षकाचा शस्त्राने भोसकून खून; आखाडा बाळापूरची घटना

हिंगोली – आखाडा बाळापूर येथील बिज गुणन केंद्रात कार्यालयात काम करीत बसलेल्या कृषी पर्यवेक्षकाचा शस्त्राने भोसकून खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिसांसह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. राजेश शिवाजी कोल्हाळ (रा. कोंडवाडा, ता. सेनगाव) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर शहरालगत बिज … Read more

चंद्रपूर हादरलं..! ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या; शरिरावर केले सपासप वार

shiva vazarkar – चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना ही चंद्रपुरातील सरकारनगर परिसरात घडली आहे. ३० वर्षीय शिवा वझरकर याचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण … Read more

झाडाच्या बुंध्यावर मध्यरात्री गोळ्या झाडून सराव अन् नंतर केला खून, शरद मोहोळ खूनप्रकरणी आणखी धागेदोरे आले समोर

पुणे – शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी मुळशीतील हडशी गावात मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळीबाराचा सराव केला होता. मध्यरात्री झाडाच्या बुंध्यावर पोळेकर आणि साथीदारांनी पिसतूलातून गोळ्या झाडून सराव केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पौड पोलीस ठाण्यात तपासासाठी सोपविण्यात आला आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर ( २०, … Read more

pune news : तो खूनच, पण धागा मिळेणा… दोन वर्षापुर्वी सापडला होता पर्वतीच्या जंगलात मृतदेह

पुणे – पर्वती टेकडीवर पडक्या पाण्याच्या टाकीजवळ एका महिलेचा १७ ऑगस्ट २०२० मध्ये मृतदेह सापडला होता. त्या महिलेची ओळख आणि मृत्यूचे कारण कळले नव्हते. मात्र दोन वर्षानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालानूसार तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तीच्या डोक्यात आणि छातीवर कठीण वस्तूने आघात करुन खून केल्याचे अहवालात म्हटले आहे. यानंतर पर्वती पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा … Read more

pune news : बाह्यवळण मार्गावर तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

pune news : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर तरुण मृतावस्थेत सापडला. तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून (murder) करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, खुनामागचे (crime) निश्चित कारण समजू शकले नाही. सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रुपेश (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more