‘नमस्ते ट्रम्प’मुळे देशात करोना पसरला…ज्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी यांची : नवाब मलिक

मुंबई – करोना काळात राज्य सरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादले. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर करोना पसरवण्याचा आरोप केला त्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी करोना पसरणार नाही असे सांगितले होते. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले, ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात करोना पसरला असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था केली, जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळ्या वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोक भोगत आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.

मोदी आणखी एक नमस्ते ट्रम्प रॅली घेणार का?

नवी दिल्ली  – भारताच्या करोनाविषयक आकडेवारीच्या विश्‍वासार्हतेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदी त्यांच्या प्रिय मित्रासाठी आणखी एक नमस्ते ट्रम्प रॅली घेणार का, असा उपहासात्मक सवाल चिदंबरम यांनी विचारला. अमेरिकेत लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या प्रक्रियेचा … Read more

गुजरातमधील करोना फैलावाला नमस्ते ट्रम्प कार्यक्रम कारणीभूत

एसआयटीमार्फत चौकशीची मागणी अहमदाबाद -गुजरातमधील करोना फैलावाला नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम कारणीभूत ठरल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. एवढेच नव्हे तर, गुजरातमधील भाजप सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्या पक्षाने दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन महिन्यांपूर्वी भारताचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी गुुजरातच्या अहमदाबादमध्ये 24 फेब्रुवारीला नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. … Read more

…म्हणून मोदी आणि ट्रम्प सोबत तिचाही प्रवास

नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प त्याचं स्वागत केलं. यावेळी ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्पही होत्या. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्या एका महिलेने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या महिलेचं नाव गुरदीप कौर चावला असं आहे. त्या नरेंद्र … Read more

मोदी-ट्रम्प यांचे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’

अहमदाबाद – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कुटुंबियांसह दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमादाबादच्या मोटेरा या स्टेडियम मध्ये नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान मोदी आणि ट्रम्प यांनी भाषणातून एकमेकांचं भरभरुन कौतुक केलं. काय म्हणाले ट्रम्प- आज ज्याप्रमाणे मोदींच्या भारतात आमचं स्वागत झालं. ते आम्ही कधीच विसरु शकत नाही. … Read more

ट्रम्प भारतात आले अन् पाकिस्तानबद्दल ‘हे’ बोलले…

अहमदाबाद– दहशतवाद्यांसोबत दोन हात करण्यासाठी अमेरीका भारताला नेहमी साथ देईल, असं अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. ते नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात बोलत होते. अमेरीका आणि भारत हे दोन्ही देश सध्या इस्लामिक दहशातवाद्यांपासून नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या कार्यकाळात आयएसआयएस (इसिस) विरोधात ताकद वापरण्याची लष्कराला अधिकार दिले, असंही ट्रम्प म्हणाले. इसिसचा … Read more

ट्रम्प भारतात बिफऐवजी ढोकळा, समोसे खाणार!

अहमदाबाद -अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवस भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ते खाणार काय?, शाकाहारी खाणार की मांसाहारी खाणार?, यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ट्रम्प यांच्यासाठी खास गुजराती स्टाईल मध्ये जेवण तयार करण्यात येणार आहे. त्यात फॉर्च्युनर सिग्नेचर कुकीज, खमण ढोकळा आणि ब्रोकली कॉर्न समोसा या पदार्थांचा समावेश आहे. फॉर्च्युन लॅंडमार्क … Read more

मोटेरा स्टेडियमचे प्रवेशद्वार कोसळले

अहमदाबाद – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद इथे येण्याच्या एक दिवस आगोदर नव्याने उभारण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये “व्हीव्हीआयपी’ प्रवेशद्वार बाहेरच्या बाजूस उन्मळून पडले. आज सकाळी सोसाट्याचे वारे सुटले होते. त्यामुळे हे प्रवेशद्वार उखडून पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मोटेरा स्टेडियमचे प्रवेशद्वार कोसळण्याची ही संपूर्ण घटना तेथेच उपस्थित असलेल्या एका नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रीत केली आणि हे चित्रीकरण … Read more

ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी गुप्तचरांचे “मिशन इम्पॉसिबल’

वॉशिंग्टन : जेम्स बॉन्ड किंवा मिशन इम्पॉसिबल सारख्या चित्रपटात आपण गुप्तचरांची कामगिरी पाहतो. त्यावेळी प्रत्यक्षात असे घडत असेल का? असा सवाल आपणास पडत असतो. मात्र प्रत्यक्षात असे प्रसंग गुप्तचरांच्या आयुष्यात घडत असतात. भारताच्या भेटीवर येणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभोवती असे शेकडो स्त्री पुरूष असतात. त्यांच्या यशाबद्दल त्यांची कोणी पाठ थोपटत नाही किंवा त्यांच्या … Read more

ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात

मोटेरा स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प साबरमतीत चरखा चालवणार ताजमहालचे सौंदर्य अनुभवणार उद्योगपतींना भेटणार संयुक्त पत्रकार परिषद नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत भेटीच्या तयारीला वेग आला असून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम येथे मेगा इव्हेंट आयोजित करण्यात येणार आहे. तर त्यांची ताजमहाल येथेही भेट ठरवण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया हे … Read more