नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत यश

नांदेड : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव (ता. नांदेड ) येथील विद्यार्थिनी आरोही श्रीराम मोगले हिने सिंधुदुर्ग येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत १३ वा क्रमांक मिळवून कौतुकास्पद यश संपादन केले आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अक्वेटिक असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा मालवण येथे संपन्न झाल्या. या जलतरण स्पर्धेत विविध वयोगटामध्ये 500 मीटरपासून ते 5 … Read more

नांदेड : जिल्ह्यातील 6 लाख विद्यार्थ्यांनी दिला ‘घरोघरी तिरंगा’ चा संदेश

नांदेड  :- जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आज नव्या आत्मविश्वासाने गलबलून गेल्या. निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा उपक्रम. जिल्ह्यातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सामूहिक गीत गायनाच्या माध्यमातून देशाप्रति कृतज्ञता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अत्यंत कल्पकतेतून सर्व अधिकारी, मुख्याध्यापकांच्या … Read more

नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; नागरी वस्त्यांमध्ये शिरले पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका

नांदेड : गेल्या चार दिवसांपासून नांदेड  जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.  कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काल रात्रीपासून पावसाचा जोर आणखीच वाढाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सखल भागात पाणी साचल्यानं तसेच अनेक नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांना … Read more

मुंबई एनसीबीचे धाडसत्र सुरूच! नांदेडमधून 100 किलो अंमली पदार्थ जप्त; तीन जणांना अटक

मुंबई :  मुंबई एनसीबीच्या पथकाचे धाडसत्र सुरूच असल्याचे दिसत आहे.   मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात पथकाने सोमवारी रात्री छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल 100 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एनसीबी पथकाने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. छापेमारी अद्याप सुरु असल्याची माहिती मुंबई एनसीबीने दिली आहे. नांदेडमध्ये अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या एका फॅक्टरीचा एनसीबीने सोमवारी … Read more

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड – आज सकाळी 8:33 मि. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती. मी आपल्या शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण … Read more

नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने दाखविला ‘कोविड 19 संसर्गाची चेन ब्रेक’ करण्याचा मार्ग

नांदेड – कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण जनतेत कोविड 19 या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या प्रसाराला रोखण्याच्या पंचायत राज संस्थांना प्रयत्नांना सहकार्य करणे तितकेच महत्वाचे आहे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात दिला आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चाचणी … Read more

नांदेड : जिल्ह्यात आज 1 हजार 079 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड :  जिल्ह्यात 31 मार्च रोजी  3 हजार 918  तपासण्यांमधून 1 हजार 079 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यापैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 599 आहे. रूग्णांची संख्या वाढत असल्याने जनतेने काळजी व सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. आज  854 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे. तसेच … Read more

राज्यात ‘या’ जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊनची घोषणा; 11 दिवसांसाठी संचारबंदी

नांदेड : राज्यात वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे राज्यातील काही शहरांमध्ये लॉक डाऊन करण्याची घोषणातिथल्या प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 25 मार्च ते … Read more

नांदेड जिल्ह्यातील 262 आरोग्य रक्षकांना कोरोनाची लस

नांदेड- नांदेड जिल्ह्यात कोरोणा लसीकरण मोहिमेला आज प्रारंभ करण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांच्या उपस्थितीत आरोग्य सेवेत काम करणाऱ्या आरोग्य रक्षकांना आज कोरोणाची मात्रा देण्यात आली. जिल्ह्यातील लसीकरणाला आरोग्य रक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने लसीकरण करुन घेतले. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी रांगा लावून लसीकरण करुन घेतल्यामुळे पहिल्याच फेरीत संपूर्ण … Read more

वैद्यकीय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी

नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा-सुविधांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा नांदेड :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही काळजीची बाब असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग नव्याने उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव … Read more