नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण: ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली – नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना जामीनावर सोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी दाभोळकर यांच्या कन्येची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दोन मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने सांगितले की, उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना जामीन … Read more

PUNE: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी ५ जानेवारीला सुनावणी

पुणे – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांची नावे असलेली यादी सादर केली. न्यायालयाने या साक्षीदारांना समन्स काढले असून, पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात … Read more

7 वर्षे न्यायासाठी संघर्षाचा वेदनादायी प्रवास…

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा शोध घेण्यात सीबीआयला यश नाही पुणे – अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अविरतपणे झटणारे आणि समाजात पुरोगामी विचारसरणीला चालना देण्यासाठी कार्यरत असणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (दि.20) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सात वर्षे उलटूनही डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात सीबीआय या प्रतिष्ठित तपास यंत्रणेला अद्यापही यश आलेले नाही. ही … Read more

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : पुनाळेकर-भावेविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांविरोधात सीबीआयकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयने पुण्याच्या सत्र न्यायालयात गुरुवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. विक्रम भावे विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने सीबीआयने एकदिवस आधीच आरोपपत्र … Read more

ऍड. पुनाळेकरांनीच दिला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : विक्रम भावे घटनास्थळाची रेकी केल्याचे स्पष्ट पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील हल्लेखोर शरद कळसकर याला ऍड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट … Read more

दाभोलकर हत्या प्रकरण : विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या विक्रम भावे याचा जामीन सत्र न्यायाधीश आर. एन. पांडे यांनी फेटाळला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना पुरावा नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरून आरोपींचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांना तर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंघाने रेकी केल्याच्या आरोपावरून विक्रम भावे याला सीबीआयने … Read more

ऍड. संजीव पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर युक्‍तिवाद

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला संजीव पुनाळेकर यांनी संशयित आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर साधक म्हणून दिला आहे, असा युक्‍तिवाद सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सोमवारी विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात केला. या प्रकरणात सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद अद्याप बाकी असून, पुढील सुनावणी … Read more

डॉ. दाभोलकर प्रकरण : तपास यंत्रणांकडून पिस्तुलांचा गोंधळ?

पुणे – “अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे पोलीस व सीबीआयने केलेल्या तपासात चार पिस्तूलांचा गोंधळ दिसून येत आहे. तसेच सीबीआयच्या दोन दोषारोपपत्रात विरोधाभास आहे,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांचे न्यायालयात केला. ऍड.संजीव पुनाळेकर यांनी आरोपींना शस्त्र नष्ट करण्यास सल्ला दिल्याचा ठपका ठेवत … Read more

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून दोघांना अटक

मुंबई – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतून दोघांना अटक केली आहे. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. मात्र, या दोघांचा या हत्याकांडात काय सहभाग आहे हे अद्याप समजू शकलेला नाही. सीबीआयचे अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहेत. Mumbai: CBI team investigating Narendra Dabholkar murder … Read more