आता व्हॉट्‌स ऍप स्टेटस फेसबूकवर शेअर करता येणार

नवी दिल्ली – व्हॉट्‌सऍपचे स्टेटस फिचर खूप प्रसिद्ध झाले असून रोज नविन फोटो शेरो शायरी अथवा शुभ प्रभात, शुभ रात्रीचे मेसेज स्टेटस म्हणुन शेअर केले जाते. त्यामुळे या हे स्टेटस जास्तीत जास्त लोकांनी पहावे अशी सर्वांची इच्छा असते. आता लोकांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार असून आता लवकरच व्हॉट्‌सऍप स्टेटससोबत आणखी एक अन्य फिचर जोडले … Read more

कर्नाटक सरकार संकटात

कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांचा राजीनामा बंगळूर -कॉंग्रेस आणि जेडीएस या कर्नाटकमधील सत्तारूढ मित्रपक्षांच्या 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. त्यामुळे कायम अस्थिरतेच्या सावटाखाली असणारे 13 महिन्यांचे आघाडी सरकार मोठ्या राजकीय संकटात सापडले आहे. आता ते सरकार टिकणार की जाणार याविषयीचे चित्र मंगळवारी स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा सादर करण्यासाठी कर्नाटक … Read more

#Budget2019 : संरक्षण क्षेत्रासाठी 3.18 लाख कोटींची तरतूद

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी 3.18 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी संरक्षण क्षेत्रासाठी 2.98 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. संरक्षण क्षेत्रासाठीचा एकूण राखीव निधी 1,08,248 कोटी रुपयांचा आहे. नवीन शस्त्रांची खरेदी, प्लॅटफॉर्म आणि मिलीटरी हार्डवेअरच्या खरेदीसाठी हा निधी राखून ठेवण्यात आला आहे. याशिवाय भत्ते आणि देखभालीच्या कामासाठी गेल्यावर्षी 1,88,118 … Read more

#Budget2019: अन्नदात्याला ऊर्जादाता करणार

नवी दिल्ली :  “मोदी-2′ सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या आणि सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये अन्नदात्याला ऊर्जादाता करण्यासाठी कृषी आणि दूध उद्योगासाठी योजना आखणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. झिरो बजट शेतीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आयातीऐवजी निर्यातीवर जास्त भर देणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या … Read more

राहुल यांनी प्रियंका यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे सोपवावीत

कॉंग्रेस नेत्याची मागणी: गांधी परिवाराकडेच नेतृत्व ठेवण्याची भूमिका हैदराबाद -कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या राहुल गांधी यांचे मन वळवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. अशातच पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने वेगळी भूमिका मांडली आहे. राहुल यांनी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी-वढेरा यांच्याकडे सुत्रे सोपवावीत, अशी मागणी त्या नेत्याने केली आहे. तेलंगणमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मार्री … Read more

नरसिंह राव यांच्यावरील अन्यायाबद्दल सोनिया, राहुल यांनी माफी मागावी

नातवाची मागणी: कॉंग्रेसकडून नेहरू-गांधी परिवाराबाहेरील नेते दुर्लक्षित हैदराबाद- माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही.नरसिंह राव यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे नातू एन.व्ही.सुभाष यांनी गुरूवारी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जी.चिन्ना रेड्डी यांच्यावर पलटवार केला. तसेच, राव यांच्यावरील अन्यायाबद्दल सोनिया आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही केली. राव यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात गांधी परिवाराला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा … Read more

पश्‍चिम बंगाल कॉंग्रेसमधील बेबनाव चव्हाट्यावर

निषेध मोर्चापासून महत्वाचे नेते राहिले दूर कोलकता- पश्‍चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचा आरोप करत कॉंग्रेसने गुरूवारी येथे निषेध मोर्चा काढला. मात्र, त्या मोर्चापासून पक्षाचे अनेक महत्वाचे नेते दूर राहिले. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसमधील बेबनाव चव्हाट्यावर आला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अब्दुल मन्नन यांच्या नेतृत्वाखाली त्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पश्‍चिम बंगालमधील … Read more

अयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरण: चौघांना जन्मठेप तर एकाची निर्दोष मुक्तता

अयोध्या: अयोध्येतील राम जन्मभूमी येथे 2005 मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज येथील विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) मोठा निर्णय दिला आहे. या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, यातील जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या चौघांना न्यायालयाने प्रत्येकी ४० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. 5 जुलै 2005 रोजी सकाळी 9.15 … Read more

काश्‍मीरी विभाजनवाद्यांना विदेशातून आर्थिक मदत

एनआयएच्या चौकशीमध्ये आंद्रबी आणि शबीर शाह विरोधात पुरावे उघड नवी दिल्ली- कश्‍मीरमधील विभाजनवाद्यांना विदेशातून अर्थसहाय्य होत असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने केला आहे. कट्टर विभाजनवाद्यांच्या मुलांच्या विदेशातील शिक्षणासाठी आणि वैयक्तिक लाभासठी ही आर्थिक मद्‌त दिली जात असल्याचे “एनआयए’ने म्हटले आहे. “एनआयए’ने हुर्रियत कॉन्फरन्स आणि अन्य विभाजनवादी संघटनांच्या वरिष्ठ नेत्यांची अलिकडेच चौकशी केली. त्यादरम्यान … Read more

बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचे 44 बळी

पाटण- बिहारमधील तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे शनिवारपर्यंत किमान 44 जणांचा मृत्यू झाल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील औरंगाबाद जिल्ह्यात 22, गयामध्ये 20 आणि नवाडा जिल्ह्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तीव्र उष्णतेच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेमुळे झालेल्या या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र दुःख व्यक्‍त केले आहे. या मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी … Read more