पुणे | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संभ्रम दूर करा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – यंदाच्‍या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे राबवायचे, याबाबत संस्‍थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्‍या पार्श्वभूमीवर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलावीत, अशी अपेक्षा माजी व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य राजेश पांडे यांनी व्‍यक्‍त केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 … Read more

पिंपरी | राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुदत वाढवावी – श्रीराम पुरोहित

कर्जत, (वार्ताहर) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वागतार्ह असून त्यामुळे चांगले विद्यार्थी घडतील यात शंका नाही. मात्र, शासनाने त्यामधील काही गोष्टींचे स्पष्टीकरण दिल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात अडचण येणार नाही. 34 वर्षांनी येणारे हे धोरण 2040 पर्यंत असणार असे. त्यामुळे शासनाने हरकती सुचविण्यासाठी दिलेली 3 जून 2024 ही अंतिम तारीख खूप मर्यादित असून ती वाढवून द्यावी. तसेच … Read more

पुणे जिल्हा | विद्यार्थी कृती केंद्रित अभ्यासक्रमावर विशेष भर द्यावा

मंचर, (प्रतिनिधी) – बदललेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये शिक्षकांना वर्षभरामध्ये ५० तासाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. शिक्षकांमध्ये सुद्धा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास घडून आला पाहिजे. ज्ञानरचनावाद यामध्ये विद्यार्थी कृती केंद्रित अभ्यासक्रमावर विशेष भर दिला पाहिजे, असे आवाहन इंग्रजी विषयाचे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक बालाजी नगरगोजे यांनी केले . मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात … Read more

पुणे | आरटीई कायद्यात बालकांच्या वयोमर्यादेत सुधारणा करावी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यात बालकांसाठी ६ ते १४ वयोमर्यादा दिलेली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यामध्ये ही वयोमर्यादा वयवर्षे ३ ते १८ केली आहे. यामुळे आरटीई कायद्यातील बालकांच्या वयोमर्यादेत सुधारणा करावी, अशी मागणी सिस्कॉम या संघटनेच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी शिक्षण आयुक्त … Read more

PUNE: सर्व अभ्यासक्रमांचे साहित्‍य आता मातृभाषेत

पुणे – सर्व अभ्यासक्रमांचे साहित्‍य विद्यार्थ्यांना मातृभाषेतून डिजिटल स्‍वरुपात उपलब्ध होणार आहे. याबाबतचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशातील सर्व शैक्षणिक शिखर संस्‍थांना दिले आहेत. यासाठी संस्‍थांना तीन वर्षांचा कालवधी देण्यात आला आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या भाषेत अभ्यासक्रमाचे साहित्‍य उपलब्ध करुन देण्याच्‍या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये प्रामुख्याने यूजीसी, एआयसीटीई, एनसीईआरटी, इग्नू, एनआयटीसह अन्य … Read more

PUNE: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सुकाणू समिती

पुणे – राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शिक्षणाचे बालपणातील काळजी व शिक्षण (पायाभूत स्तर) शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षणमधील घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आलेली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० लागू करण्यात आले आहे. … Read more

खासगी विद्यापीठांच्या संख्येवर अंकुश लावण्याची गरज – डॉ. अभय जेरे

पुणे – राज्यांमध्ये खासगी विद्यापीठांची संख्या वाढत असून, त्याद्वारे मोठ्या संख्येने पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. या प्रकारावर कुठेतरी अंकुश लावण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे ( एआयसीटीई) उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुढील २५ वर्षांतील शिक्षण व्यवस्था या विषयावर … Read more

तृयीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठ भरणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

पुणे – राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क विद्यापीठाला भरावे लागणार आहे, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जाहीर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबइत राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी … Read more

PUNE: योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग; लोणावळा येथील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

पुणे – योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेचा शताब्दी सोहळा आणि ‘शालेय शिक्षणात योगाचे एकत्रीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रपती श्रीमती मुर्मू बोलत होत्या. कार्यक्रमास महाराष्ट्राचे … Read more

बालकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार

पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा (पायाभूत स्तर) मसुदा जाहीर केला. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. बालके त्यांच्या भाषेत वेगाने आणि सखोलपणे संकल्पना शिकत असल्याने मातृभाषाही शिक्षणासाठी महत्त्वाची ठरते. शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्याकडे … Read more