ईडीने नवी मुंबईत जप्त केली 52 कोटींची मालमत्ता

मुंबई  – अंमलबजावणी संचालनालयाने मोनार्क युनिव्हर्सल ग्रुपच्या प्रकरणात नव्या मुंबईतील ५२.७३ कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. मेसर्स मोनार्क युनिव्हर्सल ग्रुप, गोपाल अमरलाल ठाकूर, हसमुख अमरलाल ठाकूर आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली महाराष्ट्र पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडीने ही कारवाई केली. या कंपनीने फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. … Read more

नवी मुंबईतील एमआयडीसीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई – नवी मुंबईतील एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू होते. या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही. नवी मुंबईतील पावणे कोपर खैरणे एमआयडीसी येथे ही … Read more

INDW vs ENGW Live Telecast : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीचा ‘येथे’ घ्या विनामूल्य आनंद, जाणून घ्या…कधी सुरू होईल सामना

India Women vs England Women Test Live Telecast : नुकतीच भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका संपली. इंग्लंडने ही मालिका 2-1  ने जिंकली. आता दोन्ही संघ एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून नवी मुंबईत ही लढत होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ तब्बल नऊ वर्षांनी … Read more

नवी मुंबईत कार-ट्रकचा भीषण अपघात ! एक ठार 2 जखमी

नवी मुंबई- राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आता नवी मुंबईत (Navi mumbai) एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील उलवे येथे एक कार आणि ट्रकची धडक झाली आहे. (car-truck accident) या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारा उलवे जवळ … Read more

अखेर प्रतीक्षा संपली ! नवी मुंबईत धावली पहिली मेट्रो..

नवी मुंबई – नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रो सेवा अखेर सुरु झाली. कोणत्याही प्रकारचे उद्‌घाटन न करता मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले होते. त्यानुसार आज बेलापूर ते पेंधार स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली. यावेळी सिडकोचे जॉईंट एमडी कैलाश शिंदे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त … Read more

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना आजपासून NMMT बससेवा मोफत; निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत

नवी मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्या 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याची घोषणा केली. त्यानंतर एसटी महामंडळाने महिलांना अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास करणार असल्याचेही जाहीर केले. ज्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. आता नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना … Read more

नवी मुंबईतही लवकरच धावणार मेट्रो; सिडकोच्या प्रस्तावाला मिळाला ग्रीन सिग्नल

नवी मुंबई :- मुंबईत मेट्रो सुरू झाल्यापासून नागरिकांचा प्रवास सुखकर झालेला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना देखील आता ही सुविधा मिळावी, असा प्रस्ताव सिडकोकडून ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तकडून हिरवा कंदील मिळाला असून सीएमआरएसचे प्रमाणपत्र सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 ला देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता लवकरत नवी मुंबईकरांना … Read more

नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई – मुंबई महापालिकेच्या धर्तीवर 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, … Read more

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून रुग्णांची विचारपूस

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या सोहळ्याला गालबोट लागले आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या लाखो अनुयायांना उन्हाचा त्रास झाला असून यातील ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

मोदी सरकारचा आदित्य ठाकरेंना मोठा झटका; ‘त्या’ ५०० कोटींच्या भूखंडाची केंद्रीय पर्यावरण विभागाकडून होणार चौकशी

मुंबई :  राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आजपासून राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना केंद्रातील मोदी सरकारने मोठा झटका दिला आहे. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना नवी मुंबईमध्ये एका देवस्थानाला देण्यात आलेल्या दहा एकर भूखंडाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये दहा एकर … Read more