जुन्नर शहरात नवरात्रीनिमित्त दुर्गामाता दौड

जुन्नर – नवरात्र उत्सवानिमित्त शहरात रोज पहाटे दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जात आहे. शिवप्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने आयोजित या उपक्रमात जुन्नर शहर व परिसरातील युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. रविवार पेठेतील ग्रामदैवत मंदिरापासून पहाटे निघणारी ही दौड रोज वेगवेगळ्या देवींच्या मंदिराला भेट देत आरती केली जाते. ठिकठिकाणी रांगोळ्या, फटाके, फुलांनी दौडीचे स्वागत केले जात … Read more

धक्कादायक ! गरबा खेळताना 17 वर्षीय मुलाला आला अटॅक अन् क्षणात झाले होत्याचे नव्हते..

नवी दिल्ली – नवरात्रोत्सवाच्या (Navratr) सहाव्या दिवशी एका दुख:द घटनेत कपडवंज खेडा (गुजरात) येथे गरबा (Garaba) खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्‍याने एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कपडवंज येथील गरबा मैदानावर 17 वर्षांचा मुलगा (17 year old boy heartatack) अचानक चक्कर येऊन पडला. त्याच्यावर तेथे उपचार करण्याचा प्रयत्न केला गेला पण तो प्रतिसाद देत नव्हता. … Read more

PUNE : कोथरूडची तुळजाभवानी माता; शेतामध्ये 50 वर्षांपूर्वी आढळली होती मूर्ती

कोथरूड – पौड रस्ता येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. आकर्षक मूर्ती, दागिन्यांनी सजविलेला साज आणि सिंहासन पाहिल्यावर प्रति तुळजापुरच्या आईचे दर्शन होत असल्याची भावना भाविकांची आहे. कोथरूड परिसरात 50 वर्षांपूर्वी जयभवानीनगर याठिकाणी सुतार कुटुंबियांच्या शेतात देवीची मूर्ती मिळाली, त्यानंतर मूर्तीची स्थापना त्याच शेतात करून तेथे मंदिर बांधण्यात आले. कालांतराने … Read more

गुजरातमध्ये गरबा खेळताना 24 तासांत 10 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये नवरात्रीनिमित्त गरबा खेळत असताना गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुन्हा गरबा खेळत असताना एका 17 वर्षीय युवक वीर शाहला हृदयविकाराचा झटका आला आणि रक्तस्त्राव सुरू झाला, काही वेळात त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कपडवंज येथील गरबा मैदानावर वीर शहा नावाच्या मुलाला रक्तस्त्राव झाल्यानंतर त्याला तातडीने … Read more

फळे महागली 20 टक्‍क्‍यांनी; उपवासामुळे मागणी

पुणे – नवरात्रौत्सवामुळे मार्केट यार्डात फळांची आवक वाढली आहे. विशेषत: सफरचंद, डाळींब, पपई, पेरू, चिकू, सीताफळ, संत्रा आणि मोसंबीला मागणी वाढली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे बहुतांश फळांचे भाव सुमारे 20 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. दसऱ्यापर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सफरचंद : हिमाचल प्रदेशातील हंगाम संपत आल्याने या फळाची … Read more

Shardiya Navratri 2023 : ‘उदे ग अंबे उदे…’ माँ दुर्गेची ही मंदिरे आहे देशभरात ‘प्रसिद्ध’, एकदा नक्की भेट द्या…

Shardiya Navratri 2023 : नवरात्र हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गादेवीचे भक्त नऊ दिवस उपवास करतात, तसेच, या काळात भक्त माँ दुर्गा मंदिरांनाही भेट देतात. या नवरात्रीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील दुर्गेच्या काही खास मंदिरांबद्दल सांगणार आहो. या मंदिरांची स्वतःची एक खास श्रद्धा आहे … Read more

Saptashrungi Devi : नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी देवीच्या गाभाऱ्यास चांदीतील नक्षीकामाचा नवा साज; ४६५ किलो चांदीचा वापर

Saptashrungi Devi – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तश्रृंगी निवासिनी (Saptashrungi Devi) देवीच्या मंदिरासाठी चांदीचा नवीन नक्षीदार गाभारा पु. ना. गाडगीळ आणि सन्स (पीएनजी सन्स) ने केला असून, नवरात्रापासून (Navratri) नव्या स्वरूपात भाविकांना मंदिरातील गाभाऱ्यातचांदीतील केलेल्या सुबक कामाचा साज अनुभवता येणार आहे. मंदिरातील गाभाऱ्यास चांदीने सुशोभित करण्याचा निर्णय सप्तशृंगी मंदिर … Read more

मार्केट यार्ड, मंडई फुलली; घटस्थापना, पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी

पुणे – घटस्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य तसेच फुले खरेदीसाठी शनिवारी (दि.14) सकाळपासूनच गर्दी झाली होती. हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक, रामेश्‍वर चौक परिसरात फूल विक्रेत्यांना तात्पुरती दुकाने थाटली आहेत. नवरात्रौत्सवात तिळाच्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. तिळाच्या फुलांना मागणी चांगली आहे. दसरा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. देवीच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण असते. घरोघरी … Read more

Navratri 2023 : नवरात्रीत दांडिया आयोजकांसाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ‘या’ गोष्टी असणार बंधनकारक !

मुंबई  – राज्यातील सर्व दांडिया (Navratri 2023) आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिले आहेत. मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठया प्रमाणात रास … Read more

Tuljabhavani temple : ‘या’ दिवसापासून तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार खुले; मंदिर संस्थानचा निर्णय

तुळजापूर – येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani temple) 13 ऑक्‍टोबरपासून दररोज 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. 13 व 14 ऑक्‍टोबर रोजी भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी अगदी परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे ही वेळ वाढवण्यात आली आहे. 15 ऑक्‍टोबर रोजी घटस्थापना होऊन तुळजाभवनीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार … Read more