Navratri Festival 2023 : नवरात्र महोत्सवानिमित्त सोलापूर-तुळजापूर मार्ग बंद !

Navratri Festival 2023 – श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव (Navratri Festival 2023) 15 ते 30 ऑक्‍टोबर कालावधीत होत आहे. 28 ऑक्‍टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा व 29 ऑक्‍टोबर रोजी मंदिर पौर्णिमानिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक पायी येत असतात. नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापूर शहर व परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशा … Read more

‘या देवी सर्वभूतेषु। कन्या रुपेण संस्थिता।।’

पुणे – नवरात्रौत्सवात कन्यापूजनाचा विधी मोठ्या भक्तिभावाने केला जातो. घरात जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा “देवी आली, लक्ष्मी आली’ असे म्हणण्याची श्रद्धा आहे. म्हणून, कन्यापूजन भक्तिभावाने केले जाते. याच श्रद्धेचा भाग म्हणून नांदेड सिटी येथील मंगल भैरव कोजागरी कमिटीतर्फे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कन्यापूजन विधीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अडीचशेहून अधिक कन्यांचे (छोट्या मुलींचे) पूजन करण्यात … Read more

नांदुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाभोंडला

पुणे (नांदुर.ता.दौंड ) – नांदुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवरात्रोत्सवाच्या (Navratri) निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी महाभोंडला मुलगी वाचवा,मुलगी शिकवा हा संदेश देत पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.(Nandur jilha Parishad school) कार्यक्रमात फलकावर काढलेल्या हत्तीच्या चित्राची पूजा करण्यात आली.त्यानंतर हत्तीचे चित्र मध्यवर्ती ठेवून शाळेतील विद्यार्थीनी तसेच गावातील माहिला,व शिक्षिकांनी ‘सासूरवाशीन सून रुसून … Read more

पुरातन ठेवा जपत मंदिर जीर्णोद्धाराचे काम; तुकाईमाता मंदिरात नवरात्रोत्सव

महादेव जाधव फुरसुंगी – सासवड मार्गालगत हडपसर व फुरसुंगी गावांच्या सीमेवर काळेपडळ येथील टेकडीवर तुकाई मातेचे स्वंयभू जागृत मंदिर आहे. नवरात्र उत्सवामुळे पहाटेपासुनच मंदिरामध्ये पुजा-अर्चा सुरू असते. दररोज, अंदाजे 15 हजार भाविकांच्या उपस्थितीत टेकडी फुलुन जात आहे. दसऱ्याच्यावेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करुन सीमोल्लंघन केले जाते. धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रम राबवून बांधिलकी जपण्याचे कामही मंदिर देवस्थान … Read more

सणासुदीला शेवंतीचे भाव तेजीत

जुन्नर – सर्वत्र नवरात्री उत्सव सुरू असून शेवंतीसह विविध फुलांना मोठी मागणी होत आहे. आजमितीस मुंबई बाजारात 100 ते 120 प्रतिकिलो पर्यंत बाजारभाव मिळत असून येत्या दसऱ्यापर्यंत आणखीन बाजार वाढतील, अशी माहिती कुसुर येथील युवा शेतकरी सुधीर बोचरे यांनी दिली. सध्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कुसुर, वडज, निरगुडे तसेच निमगाव, सावरगाव, गुंजाळवाडी आदी परिसरात शेवंती, … Read more

फुलांना बहर; मागणी अन्‌ दरही वाढले

पिंपरी – नवरात्रीच्या उत्सवामुळे फुलांना बहर आला असून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच बरोबर दरही वाढले आहे. मावळ व पिंपरी चिंचवडच्या उपनगरांतून फुलांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात मावळ परिसरातून तिळाची फुले विक्रीसाठी येत असून किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपयांना वाट्याने ही फुले विकली जात आहेत. गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षात फुलांना मागणी घटली … Read more

अंबा बैसली सिंहासनी हो।।

पुणे – आश्‍विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापना-शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात. यादिवशी घरोघरी आणि सार्वजनिकरित्या घटस्थापना केली जाते. या पावन पर्वाची यंदा रविवारपासून सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मुहूर्तावर घटस्थापना करून या नवरात्रीला सुरुवात करण्यात आली. आता पुढील नऊ दिवस आदिशक्‍तीचा जागर केला जाणार आहे. दरम्यान, ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी, चतु:शृंगी, सारसबागेजवळील महालक्ष्मी आणि शहरातील अन्य प्रसिद्ध देवींच्या … Read more

सातारा जिल्ह्यात धार्मिक वातावरणात नवरात्रोत्सवाला प्रारंभ

भाविकांची घटस्थापनेची लगबग; विविध मंदिरांमध्येही देवींची साजशृंगारयुक्‍त पूजा… सातारा – सालाबादप्रमाणे अश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा होतो. त्याचा प्रारंभ आज रविवारी सकाळी जिल्ह्यातील विविध देवी मंदिरात तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी उभारलेल्या मंडप स्थळी घटस्थापनेने झाला. रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असल्यामुळे सकाळी लवकर भाविकांची घटस्थापनेसाठी धांदल … Read more

सातारा : मांढरगडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ

मांढरदेव – संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या काळूबाई देवीच्या मंदिरात देखील यानिमित्ताने घटस्थापना करण्यात आली. सर्व ग्रामस्थ गावचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात एकत्र येतात. तेथे शास्त्रोक्‍त, विधीवत पद्धतीने घटस्थापना केल्यानंतर सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने काळूबाई देवीच्या मंदिरात जातात. तेथे देखील ग्रामस्थ, पुजारी, उपस्थित भाविक आणि देवस्थान ट्रस्टमार्फत विधीवत पद्धतीनें … Read more

फूलबाजारात ‘दरवळ’; नवरात्रौत्सवासाठी विक्रमी आवक

पुणे – नवरात्रोत्सवासाठी यंदा फुलबाजार फुलला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे फुलांचे जास्त झालेले उत्पादन, पितृपंधरवड्यात नसलेली मागणी आणि नवरात्रोत्सवात भाव मिळेल, या अपेक्षेने राखीव ठेवलेला माल शनिवारी (दि. 14) शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात विक्रीसाठी आणला. परिणामी, नेहमीच्या तुलनेत बाजारात फुलांची विक्रमी तिप्पट आवक झाली. त्यामुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत फुलांचे भाव निम्म्याने घटले. झेंडू, शेवंती या … Read more