नगर : शिर्डी लोकसभा मतदार संघात नव्या दमाच्या नेत्तृत्वाची गरज : उत्कर्षा रुपवते

* संधी मिळाल्यास या मतदार संघातील रखडेला विकास पुर्ण करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करणार *  निवडणूक लढवण्यासाठी रुपवते यांनी घेतल्या दिग्गज राजकिय नेत्यांच्या गाठीभेटी राजेंद्र वाघमारे नेवासा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आणि माझी गेल्या तीन पिढ्यांपासून नाळ जोडली गेलेली आहे. महाविकास आघाडीला या मतदार संघातून राजकिय दृष्ट्या मोठी सकारात्मक परिस्थिती आहे. उत्तर नगर जिल्ह्यात अनेक समस्या … Read more

पुणे जिल्हा : शेतकरी जगाला पाहिजे – शिवाजी काळभोर

शेतकर्‍यांची बाजू न घेतल्यास यशवंत कारखाना निवडणुकीत पराभव अटळ सोरतापवाडी : हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकर्‍यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला आहे. मात्र येथे दुबार विक्रेते दोन ते तीन तासाच्या विक्रीतून मालामाल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे, असे मत लोणी काळभोर येथील शेतकरी शिवाजी शहाजी काळभोर यांनी व्यक्त केले. … Read more

जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास शहरे ; ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन शहरांचे नियोजन

टोकियो : जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या दैनंदिन समस्या लक्षात घेऊन आता जपानमध्ये विशेष शहरांची उभारणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठाची शारीरिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन ही नवी कॉम्पॅक्ट शहरे उभारण्यात येणार आहेत. जपानमध्ये आज साडे तीन कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांच्या फायद्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेतील पहिले … Read more

विकासदर 9 टक्‍के होण्याची गरज, तरच भारत 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल

  हैदराबाद, दि. 16-भारत सरकारने शक्‍य तितक्‍या लवकर पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. भारत 2028 -29 या वर्षापर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल. मात्र, त्यासाठी या कालावधीत भारताचा विकासदर किमान नऊ टक्‍के राहणे गरजेचे आहे, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने समन्वयाने … Read more

पंतप्रधानाच्या सुरक्षेच्याबाबत चूक नेमकी कोणाची याचा खुलासा होणे गरजेचे – नवाब मलिक

मुंबई – देशाचे पंतप्रधान पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आला. ही गंभीर बाब असून पंजाबमध्ये पंतप्रधान सुरक्षेच्याबाबत चूक नेमकी कोणाची याचा खुलासा होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षतेसाठी जी यंत्रणा तयार केली जाते त्यामध्ये एसपीजी, आयबी, आणि … Read more

वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई  : रूग्णसेवा हीच पवित्र सेवा आहे. आपली सेवा जेव्हा आपण असीम शक्तींना समर्पित करतो तेव्हा यश निश्चीतच प्राप्त होते. वैद्यकीय क्षेत्रात समर्पक भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे असल्याचे सांगून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिला डॉक्टरांचे त्यांच्या समाजकार्याबद्दल अभिनंदन केले. आज राजभवन येथे मेडीक्वीन या महिलांच्या आरोग्यासाठी काम करत असलेल्या संस्थेतर्फे राज्यभरातील समाजकार्य करणाऱ्या … Read more

नव्या पिढीला चैतन्यदायी गांधीविचारांशी जोडणे आवश्यक – अरुण खोरे

कोल्हापूर(प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांच्या विचारांचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी गांधीविचारांचे सैद्धांतिक, भावनिक आणि वैचारिक पातळीवर प्रसारण करावे लागेल. नव्या पिढीला गांधीजींच्या चैतन्यदायी विचारांची नव्याने ओळख करून द्यावी लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व गांधी विचारांचे अभ्यासक अरुण खोरे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रामार्फत ‘डॉ. उषा मेहता स्मृती व्याख्यानमाला-२०२१’अंतर्गत आयोजित ‘गांधींच्या पुनःस्मरणाची गरज … Read more

नीरजला संपूर्ण आरामाची गरज

हरियाणा – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीतील सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा याच्या प्रकृतीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता त्यात त्याच्यावर उपचार करत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी नीरजला संपूर्ण आरामाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. मायदेशात आगमन झाल्यावर तब्बल 10 दिवसांनी तो पानिपत येथे दाखल झाला होता. त्यानंतर त्याची हल्दाना बॉर्डर येथून रॅली काढण्यात आली आणि … Read more

लक्षवेधी : विकासाच्या मॉडेलचा फेरविचार हवा

-अशोक भगत सध्या जे विकासाचे मॉडेल प्रमाण मानून वाटचाल करीत आहोत, ते निसर्गास पूरक नाही. उलट निसर्गावर विजय मिळविण्याच्या रणनीतीतून आलेले हे मॉडेल आहे. ज्या वातावरणात आपण वास्तव्य करतो, त्याच्या दृष्टीने हे मॉडेल हिताचे नाही. त्यामुळे आता विकासाच्या अशा मॉडेलवर विचारविनिमय सुरू झाला आहे, ज्यामुळे निसर्गाची कमीत कमी हानी होईल. करोनाच्या महामारीपासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञ … Read more

मराठा आरक्षण कायदेशीर मार्गाने पूर्णत्वाला नेणे गरजेचे

आंदोलनाबाबत लवकरच निर्णय कोल्हापूर  – मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील समन्वयकांसोबत चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापूरमधील भवानी मंडपात दोन दिवस ही संवादाची प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील तमाम नेते आणि समन्वयक या हितगुज कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सर्वांनी एकत्रितपणे कायदेशीर बाबींचा विचार करून आंदोलनाची … Read more