नवीन संसद भवन आतून कसे दिसते, पहा 10 फोटो

New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २८ मे २०२३ रोजी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन केले आहे. दरम्यान  उद्घाटनाच्या एक दिवस आधी सरकारने संसदेतील छायाचित्रे शेअर केली होती.  नवीन संसद भवनात वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट भारताची विविधता दर्शवते. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील कार्पेट, त्रिपुरातील बांबूचे फरशी आणि राजस्थानमधील दगडी कोरीव कामांचा संसदेत वापर … Read more

नवीन संसदेच्या उद्धघाटनप्रसंगी पंतप्रधान करणार ७५ रुपयांचे नाणे लॉन्च

नवी दिल्ली :  नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन आणि लोकापर्ण सोहळा सध्या सुरु आहे.  या ऐतिहासिक वास्तूचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येत आहे. दरम्यान हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी या दिवशी अर्थ मंत्रालयाकडून विशेष ७५ रुपयांचे नाणे लॉन्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्याने लॉन्च करण्यात येणाऱ्या या नाण्यावर या नवीन संसद … Read more

New Parliament Inauguration : उद्‌घाटनाला ठाकरेंना कोण नेतंय? ते विधान परिषदेत 2 तास बसत नाहीत – फडणवीस

मुंबई – उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते तिथे दोन तासांच्या वर बसत नाही. त्यांना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला कोण घेऊन जात आहे?, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होत आहे. मात्र, या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नाही म्हणून … Read more

New Parliament Inauguration : पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला मायावतींचा पाठिंबा, म्हणाल्या “हा विषय आदिवासी महिलेच्या सन्मानाशी..”

लखनौ – दिल्लीतील नव्या संसद भवनाचे येत्या 28 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. उदघाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे व तसे न झाल्यास कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी मात्र या सगळ्या घटनाक्रमात … Read more

New Parliament Inauguration : देशातल्या ‘या’19 प्रमुख राजकीय पक्षांचा नवीन संसद भवन उद्‌घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

नवी दिल्ली – देशातील 19 प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखाने पंतप्रधान मोदींच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने लोकशाहीचा आत्माच हिरावून घेतला असल्याने आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीत कोणतेही मूल्य दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुर्ण बाजूला ठेवून स्वतः मोदींनीच या … Read more

New Parliament Inauguration : राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन व्हावे अशी ठाकरे गटाचीहीं मागणी

नवी दिल्ली – संसदेच्या नवीन भवनाचे उद्‌घाटन राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्तेच व्हायला हवे अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली आहे. या पक्षाच्या राज्यसभा सदस्य प्रियंका चर्तुर्वेदी यांनी ही मागणी केली. त्यांनी भाजपवर संवैधानिक अनैतिकतेचा आणि ते “सत्तेने आंधळे”झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती हे संसदीय मंडळाचे प्रमुख आहेत, त्यांचे … Read more