ब्रिटनमध्ये आढळला करोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन; जर्मनीने ब्रिटनहून येणाऱ्या लोकांना घातली बंदी

लंडन – ब्रिटनमध्ये करोनाच्या ट्रिपल म्यूटेशनची चर्चा सुरू झाली आहे. ही माहिती देताना त्या देशाचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले की, ट्रिपल म्युटंट करोना व्हायरस प्रकार पहिल्यांदा यॉर्कशायरमध्ये सापडला होता. याचा अभ्यास वैज्ञानिक करत आहेत. या नवीन प्रकाराबद्दल असे सांगितले जात आहे की, हे करोनाच्या पूर्वीच्या रूपांपेक्षा अधिक धोकादायक आणि संक्रमित करणारे आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, … Read more

नव्या स्ट्रेनविषयी केजरीवालांच्या ‘त्या’ ट्विटला सिंगापूरच्या दूतावासाचे उत्तर; म्हणाले,…

नवी दिल्ली : जगभरात सध्या करोनच्या वेगवेगळ्या लाटांनी सर्वांना हैराण करून सोडले आहे. त्यातच आता सिंगापूरमध्ये नवीन स्ट्रेन आल्याची चर्चा सुरु आहे. त्यात ‘सिंगापूरमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूचे नवीन रुप मुलांसाठी खूप घातक असल्याचे  सांगितले जात आहे,’ असे  म्हणत यामुळे करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला दिला होता.त्यासाठी त्यांनी एक … Read more

इटलीतील लॉकडाऊन संपणार

रोम – इटलीत कोरोना संसर्गाची स्थिती सुधारत आहे. २६ एप्रिलपासून देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु त्यासाठी जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन केले पाहिजे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबतीत इटलीचा सातवा क्रमांक लागतो. इटलीचे पंतप्रधान मारियो ड्राघी म्हणाले, संसर्गाच्या बाबतीत देशातील परिस्थितीत सकारात्मक बदल होत आहे. त्यामुळे सरकारने नियमांत … Read more

कोरोना नवीन स्ट्रेन : मुलांकडे जराही दुर्लक्ष करणे धोकादायक

जगातिक साथीचा आजार Covid19 च्या नवीन स्ट्रेनचा प्रभाव मुलांसाठी अधिक घातक आहे का? सुमारे सव्वा वर्षांपासून या व्हायरसचा प्रभाव मुलांवर अधिक प्रमाणात पडले नाही परंतू नवीन स्ट्रेन मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. अशात काय सावधगिरी बाळगावी जाणून घ्या- कोरोनावर वैज्ञानिक अध्ययनानंतर ही गोष्ट समोर आली आहे की वयस्कर लोकांच्या तुलतेम मुलांच्या पेशींमध्ये आढळणारे … Read more

जाणून घ्या, ‘ही’ आहेत दुसऱ्या लाटेतील करोनाची लक्षणे; WHOने दिली माहिती

नवी दिल्ली – करोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याने, त्याची नवीन लक्षणे देखील समोर येत आहेत. नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, उलट्या होणे, सांधेदुखी, अशक्तपणा येणे, भूक न लागणे आदींचा समावेश आहे. जागतिक आरोग्या संघटना अर्थात डब्ल्यूएचओच्या मते, वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसत आहेत. ही लक्षणे एखाद्या व्यक्तीस विषाणूच्या संसर्गाच्या 5-6 दिवसांनी दिसतात. काही प्रकरणांमध्ये ही … Read more

अमेरिकेतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर लसही ठरणार निष्फळ; वैज्ञानिकांनी व्यक्त केला अंदाज

न्यूयॉर्क : करोनाने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. कोरोनाविषयी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातच सर्वांच्या चिंतेत भर घालणारी एक बातमी समोर येत आहे. अमेरिकेमधील ओरिगॉन येथे ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या करोना विषाणूचे बदलेले स्वरुप म्हणजेच म्युटेड व्हेरिएंट आढळून आला आहे. हा विषाणू ब्रिटनमधील विषाणूपेक्षा अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या … Read more

रुग्णांचा वाढता आकडा आणि म्युटंट स्ट्रेनचा थेट संबध नाही

नवी दिल्ली – महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये करोना रुग्णांचा वाढता आकडा आणि कोविड 19 च्या म्युटंट स्ट्रेन “एन 440 के’ आणि “ई 484 क्‍यू’ यांचा थेट संबध नाही, असे आज “आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी कोविड 19 शी संबधित साप्ताहिक पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. हे दोन विषाणूंचे स्ट्रेन इतर देशांमध्येही सापडले आहेत आणि … Read more

एकट्या महाराष्ट्रात 6112 कोरोना रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली असून गेल्या २४ तासांत नवीन १३,१९३ रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, शुक्रवारपर्यंत देशात १,०९,६३,३९४ लोकांना संसर्ग झाला. तर, १,०६,६७,७४१ रुग्ण पूर्ण बरे झाले. महाराष्ट्रात शुक्रवारी ६,११२ रुग्ण आढळले असून ४ डिसेंबरनंतर तेथे प्रथमच रुग्णसंख्या ६ हजारांच्या वर गेली आहे. १० दिवसांत रुग्णांची संख्या दुपटीवर गेल्याने चिंता … Read more

फ्रान्सला करोनाच्या ‘न्यू स्ट्रेन’चा धोका; सीमा बंद करण्याचा दिला इशारा

पॅरिस – फ्रान्समध्ये नवीन करोना विषाणू आढळण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून युरोपियन युनियनच्या बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी सीमा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. फ्रान्समधील करोना न्यू स्ट्रेनच्या नव्या प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे. राष्ट्रपती राजवाड्यात आरोग्य सुरक्षेबाबत तातडीच्या बैठकीनंतर फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टॅक्‍स यांनी याची घोषणा केली. … Read more

ऑस्ट्रेलिया, जपानमध्येही करोनाच्या नव्या स्ट्रेनचा धुमाकूळ

टोकियो : करोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यामुळे जगभरात चिंताव्यक्त केली जाते आहे.नव्या स्ट्रेनमुळे करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. करोनाबाधिताच्या संख्येमुळे अनेक देशामधून निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या बाधिताच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत. तर दुसरीकडे जपानमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये तीन दिवस … Read more