दहशतवादी कारवायांचा डाव उधळल्याने पुणे पोलिसांना एनआयएकडून प्रशस्ती पत्र

पुणे : २६\११ सारखा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. या दहशतवाद्यांना बेड्या ठोकणाऱ्या कोथरूड मधील ५ पोलीस अमलदारांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना १० लाख रोख रक्कम आणि प्रमाणपत्र एनआयएचे पोलीस अधिकारी इंगवले आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या … Read more

काश्‍मीरातील दहशतवादी हल्ल्याचा NIA करणार तपास

श्रीनगर  – काश्‍मीरात नुकताच सुरनककोट येथे दहशतवाद्यांनी लष्करावर हल्ला केला होता, त्यात चार जवान शहीद झाले होते या प्रकरणाचा तपास एनआयए तर्फे केला जाणार आहे. या तपासासाठी एनआयएच्या तज्ज्ञांचे एक पथक लवकरच घटनास्थळी रवाना होणार आहे. या हल्ल्यामुळे काश्‍मीरातील दहशतवाद्यांचे आव्हान पुर्ण संपुष्टात आलेले नाही असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्राने या प्रकरणाच्या तपासात … Read more

NIA Raids : भारतावर हल्ल्याचा ISIS चा कट; NIA चे कर्नाटक, महाराष्ट्रात 40 हून अधिक ठिकाणी छापे

NIA Raids : दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आज सकाळपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सुमारे 44 ठिकाणी छापे टाकत आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या माध्यमातून देशभरात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कटाशी संबंधित प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. ISIS ही जगातील सर्वात … Read more

Jammu Kashmir : राजौरी, पुंछ दहशतवादी हल्ल्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा हात ; NIA चा मोठा खुलासा

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी झालेल्या दोन दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्या तपासातील ही माहिती दिली आहे. यापैकी एक जानेवारी महिन्यात राजौरी गावात झालेला हल्ला होता ज्यात ७ नागरिक ठार झाले होते आणि दुसरा हल्ला पुंछ जिल्ह्यात झाला होता, जिथे लष्कराच्या वाहनांना लक्ष्य … Read more

सर्व राज्यांसाठी NIA अंतर्गत एकसमान दहशतवादविरोधी रचना असावी – अमित शहा

नवी दिल्ली  – आपल्याला केवळ दहशतवादच नाही तर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या व्यवस्थेलाही उद्‌वस्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने आयोजित केलेल्या दोन दिवसीय दहशतवाद विरोधी परिषदेचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. एनआयएच्या देखरेखीखाली देशात दहशतवादविरोधी आदर्श संरचना तयार केली … Read more

सिलिंग फॅनमध्ये लपवली होती बॉम्बची ‘रेसिपी’; ‘इसिस’ दहशतवाद्यांकडून खुलासा

पुणे -“इसिस’ दहशतवादी संघटनेच्या महाराष्ट्र गटाशी संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. पुण्यात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांना पकडले होते. त्यानंतर हा साथीदार पसार झाला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांकडे केलेल्या तपासात त्यांनी सरतेशेवटी सिलिंग फॅनमध्ये लपवलेली बॉम्बची रेसिपी सापडली होती. ही रेसिपीच दहशतवाद्यांना … Read more

राजस्थानातील दोन फरार दहशतवाद्यांना “एनआयए’कडून अटक

नवी दिल्ली- राजस्थानातील चित्तोरगड येथे 2022 मध्ये जप्त करण्यात आलेल्या “आयइडी’ आणि स्फोटकांप्रकरणी फरार असलेल्या दोघाजणांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. मुहम्मद युनुस साकी आणि इम्रान खान उर्फ युसुफ अशी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. हे दोघेही इसिसपासून प्रेरणा घेतलेल्या “सुफा’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. रतलाम येथील रहिवासी असलेल्या या दोघांना महाराष्ट्रातून … Read more

मनसुख हिरेन हत्या प्रकरण; माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली :  मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आज न्यायालयालाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने माजी पोलीस … Read more

‘आयसिस’शी संबंध; ठाण्यातून एकाला अटक

पुणे – दहशतवादी संघटना ‘आयसिस’च्या पुणे मॉड्युलशी संबंधित आणखी एका आरोपीला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. आरोपी विदेशी दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय असल्याचे आढळून आल्याने त्याला शुक्रवारी ठाण्यातील पडघा येथून अटक करण्यात आली. शमील साकिब नाचन (रा. पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बॉम्ब बनविण्याचे … Read more

Breaking news :”पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देऊ अन् देशात स्फोट घडवून आणू”; पुण्यात एका व्यक्तीला ईमेलद्वारे धमकी

मुंबई : एका अज्ञात व्यक्तीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे पंतप्रधानांना मारण्याची धमकी देण्यात आली. मी भारतामध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन, अशा आशयाचा मेल करत अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. “आय विल किल नरेंद्र मोदी … Read more