सातारा – भुईंज व दरेच्या आरोग्य केंद्रासाठी दोन कोटी निधी

वाई – विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाई तालुक्यातील भुईज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी व महाबळेश्वर तालुक्यातील दरे उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधणे या कामांसाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. यामध्ये भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती, इमारतीमधील विद्युतीकरण, पेव्हर ब्लॅाक बसविणे, … Read more

शिरढोणसह एकसळ परिसरासाठी ४ कोटी २५ लाख निधीची तरतूद – आमदार महेश शिंदे

कोरेगाव – विधानसभा मतदारसंघातील शिरढोणसह एकसळ परिसराचा आता सर्वांगिण विकास होत असून दोन्ही गावे आता प्रमुख रस्त्याने जोडली जाणार आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ४ कोटी २५ लाख रुपये शिरढोण-एकसळ रस्त्यासाठी मंजूर झाले असून, मंगळवारी प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच संदीप साळुंखे यांच्यासह … Read more

सातारा – पाटण तालुक्‍यातील विकासकामांना सव्वा सहा कोटींचा निधी मंजूर

सणबूर  -पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी एकूण सहा कोटी 56 लाख 48 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. रस्ता सुधारणेमध्ये बामणेवाडी, जिमनवाडी, बागलवाडी, भोकरवाडी-जळव रस्ता सुधारणा 50 लाख, लुगडेवाडी 50 लाख, दुधडेवाडी-मरळी 20 लाख, रामिष्टेवाडी-काळगाव रस्ता सुधारणा 30 लाख, वरचे केर-खालचे केर 50 लाख, तर कब्रस्तान … Read more

कराड उत्तरच्या विकासासाठी 60.76 कोटींचा निधी

पुसेसावळी – कराड उत्तर मतदारसंघातील गावजोड रस्ते, ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग तसेच इतर सोयीसुविधांसाठी 60.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कराड उत्तर भाजपचे नेते धैर्यशील कदम यांनी दिली. महायुती सरकार आल्यामुळे कराड उत्तरमध्ये विकास कामांचा झंझावात सुरु झाला आहे. तसेच भविष्यातही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामे खेचून आणली जातील, … Read more

अर्थसंकल्पात सातारा-जावळी मतदारसंघासाठी भरघोस निधी

सातारा  – सातारा-जावळी मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील रस्त्यांच्या डांबरीकरण, रुंदीकरण आणि सुधारणा करण्यासाठी तब्बल 90 कोटी रुपये निधी नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जावळी तालुक्‍यातील प्रमुख जिल्हा मार्ग पाचगणी-कुडाळ रस्ता भाग पाचगणी ते काटवली घाट खचलेल्या रस्त्याची सुधारणा, संरक्षक … Read more

नगरपरिषदेच्या प्रभागांना विकासाची प्रतीक्षा

जामखेड शहरातील स्थिती ः नगरपरिषद होऊन चार वर्षं उलटूनही सुविधांची वानवा नागरिकांना मिळते दूषित पाणी तालुक्‍यात अद्यापही चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शहराला महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. मात्र विंचरणा नदीपात्रात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने नळाद्वारे येणारे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. … Read more