निलेश लंकेंचा विजयानंतर मोठा गौप्यस्फोट,’विजयासाठी मला भाजपच्या स्टेजवरील नेत्यांनी मदत केली’

Lok Sabha Election 2024 । राज्यात जसे महायुतीचे पतन झाले, त्याच पद्धतीने नगर जिल्ह्यातही धक्कादायक निकाल लागला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नीलेश लंके हे विजय झाले आहेत. लंके यांनी विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे यांचा पराभव केला. लंके 29 हजार 314 मतांनी विजयी झाले आहे. अतिशय अटीतटीसह घासून झालेल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत लंके … Read more

Lok Sabha Result 2024 : सुजय विखेंना जोर का झटका; निलेश लंके विजयी !

Nilesh lanke । Sujay vikhe । Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुका एकुण सात टप्प्यात पार पडेल. 19 एप्रिलपासून सुरू झालेली मतदानप्रक्रिया 1 जून रोजी संपली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. अर्थातच त्यानंतर सर्वांच उत्सुकता निकाली लागली होती. तोच लोकसभा निवडणुकीक निकाल … Read more

‘सर्वसामान्य जनता आपल्या सोबत, त्यामुळे मीच जिंकणार..’; एक्झिट पोलआधी निलेश लंकेंचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 । Nilesh Lanke : देशातील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडले जात आहे. सातव्या टप्प्यासाठी 57 जागांसाठी 904 उमेदवार रिंगणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेकांनी मतदानाचा हक्क बजवाला आहे. तर, दुसरीकडे … Read more

nagar | कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले

पारनेर, (प्रतिनिधी) – कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा विभागामार्फत दि.३०रोजी दुपारी चार वाजता उन्हाळी आतर्वन सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मा.आ. नीलेश लंके यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केला होता. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतामधील विशेषतः जनावरांच्या चाऱ्याची पिके, फळबागा, इतर शेतमाल जळण्याची भिती निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे … Read more

“पैसे घेऊन मतदान करणे हे देशाचं दुर्दैव, म्हणूनच…”; आण्णा हजारेंचे मतदारांना आवाहन

Anna Hazare|

Anna Hazare|  महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. राज्यातील 11 मतदार संघामध्ये आज मतदान होत आहे. यात अहमदनगर मतदार संघाचा देखील समावेश आहे. येथून सुजय विखे पाटील आणि नीलेश लंके यांच्यात थेट लढत होत आहे. नुकतेच समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी आण्णा हजारे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन … Read more

नाशिकमध्ये पैसे वाटप होत असल्याचा संजय राऊतांचा आरोप; म्हणाले “दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा…”

Sanjay Raut On Eknath Shinde|

Sanjay Raut On Eknath Shinde|  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज 13 मे रोजी पार पडत आहे. राज्यात जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नंदूरबार, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या दिवशी पैसे वाटप झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला … Read more

“माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला….”, अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा

Ajit Pawar On Nilesh Lanke – अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बोलताना अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट इशाराच दिला आहे. अजित पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है, माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल.’

आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण कळायला लागली –

निलेश लंकेंवर टीका करताना अजित पवार म्हणाले, गडी दिसायला बारीक दिसतो, मात्र लय पोहोचलेला आहे. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. कसं साधं घर आहे, कसे साधे आई-वडील आहेत हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण कळायला लागली. अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पट्ट्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर, आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल. माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती. मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे.

शरद पवार गट – अजित पवार गट – शरद पवार गट-

राष्ट्रवादी एकत्रित असताना निलेश लंके यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, व अजित पवार या तिन्ही नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते प्रथम शरद पवार गटात गेले, नंतर काही दिवसांतच अजितदादा गटात परतले, लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे ते पुन्हा शरद पवार गटात आले आहेत.

निलेश लंके पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष होते. तत्कालीन शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात बंडखोरी केल्याच्या प्रकरणातून त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले व पारनेर-नगर विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.

नगरमध्ये विखे-लंके थेट सामना –

महायुतीमध्ये नगरची जागा भाजपकडे आहे तर महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा शरद पवार गटाकडे आहे. नगरच्या जागेसाठी शरद पवार गटाकडून निलेश लंके तर भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांना तिकीट देण्यात आले आहे. दोन्ही पक्षांचा येथे जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, 13 मे रोजी अहमदनगर लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुडेंचे फोटो, भाजपनं केली ‘तक्रार’

Lok Sabha Election 2024 । दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे. तर उमेदवारी अर्ज भरताना भाजप उमेदवार यांनी  जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी महायुतीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसरीकडे निलेश लंके यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न … Read more

इंग्रजी बोलतो म्हणजे खूप शहाणा….; सुजय विखेंच्या आव्हानावर शरद पवारांची जोरदार टीका

Nilesh Lanke । Sujay Vikhe Patil । Shard Pawar : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटाकडून निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे. काही दिवसांपूर्वी सुजय विखेंनी निलेश लंके यांच्यावर टीका करताना त्यांचे शिक्षण काढलं होतं. निलेश लंकेंनी पाठांतर करून का होईना, माझ्याएवढं इंग्रजी बोलावं, मी नगरमधून … Read more

अहमदनगर – मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांवर होणार कारवाई

नगर  – लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. गोंधळ घालणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. अहमदनगर आणि शिर्डी मतदार संघासाठी सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्ह्यातील ३८६ सुक्ष्म निरीक्षकांना न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. … Read more