नगर : आरक्षणाच्या मुद्यावरून सामाजिक तेढ निर्माण होणे भूषणावह नाहीः मंत्री विखे

राहाता – आरक्षणाच्या मुद्यावरुन सामाजिक तेढ निर्माण होणे राज्याला भूषणावह नाही. व्यक्तिगत हेवेदावे निर्माण झाल्यास मुळ प्रश्‍न बाजूला पडेल. त्यामुळे सर्वच समाजाच्या नेत्यांनी संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सुरु असलेल्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहीजे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केली. … Read more

आता केवायसीसाठी फक्त पॅन कार्डही चालणार, आधार कार्डची गरज नाही !

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. अमृतकालच्या या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून देशातील विविध क्षेत्रांना गती देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. आता केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्डाची गरज भासणार नाही. आता … Read more

“ज्योतिषाला हात दाखवण्याची गरज नाही, मनगटातील ताकद ३० जूनलाच दाखवली”-मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई : शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यावर ज्योतिषाला हात दाखवण्याचा  केला होता. विरोधकांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर देत शिवसेनेला टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी ज्योतिषाला हात दाखवण्याची मला गरज नाही, मनगटातील ताकद आम्ही ३० जूनलाच दाखवली असल्याचे म्हणत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. कराडमध्ये पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. … Read more

पुणे जिल्हा : महागाईत बस नको, रेल्वे हवी!

पुरंदर-हवेलीतील प्रवाशांची आर्त हाक : एक्‍स्प्रेस रेल्वेगाड्यांना थांबा कधी मिळणार? समीर भुजबळ वाल्हे – राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट दर ग्रामीण भागातील जनतेला परवड नाहीत. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास तसेच शेतमाल विक्रीसाठी पुण्याला घेऊन जाण्यासाठी पॅसेंजर हे ग्रामीण शेतकऱ्यांचे स्वस्तात साधन होते; मात्र सातारा जिल्ह्यातील व पुरंदर-हवेली तालुक्‍यातील लहान-लहान स्थानकात सध्या केवळ एकच गाडी … Read more

पुणे: विद्यापीठांत धार्मिक द्वेषाचे विखार नको: मंत्री छगन भुजबळ

सर्व धर्मांतील मुलांना शिक्षण मिळावे पुणे – राजकारणी धार्मिक तेढाचे विष विद्यापीठात आणत आहे. ते कोणत्याही विचारधारेचे असले, तरी त्यांनी धर्मिक द्वेषाचे विखार विद्यापीठांमध्ये आणू नये. हे प्रकार तातडीने थांबवावे, असे आवाहन अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमात राजकीय पक्षाच्या नेत्यांना केले. शिक्षणसंस्थांमध्ये हिजाबच्या मुद्‌द्‌यावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षांना टोला … Read more

पुणे जिल्हा : पासपोर्टसाठी पडताळणीसाठी पोलिसांना घरी जाण्याची गरज नाही

जिल्हा अधीक्षक देशमुख यांच्या सूचना : अपवादात्मक परिस्थितीतच जावे लागणार बारामती – पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी करताना स्थानिक पोलिसांनी संबंधित व्यक्‍ती भारतीय नागरिक आहे का आणि त्या व्यक्तीविरुध्द कोणते गुन्हे प्रलंबित आहे किंवा न्यायालयाचे वॉरंट प्रलंबित आहे काय या दोनच बाबी तपासाव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत. अपवादात्मक परिस्थिती वगळता … Read more

आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला आकृतिबंधच्या निर्णयाबाबत सोमवारी शासन निर्णय निघणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज(दि.13फेब्रुवारी ) महानगरपालिका मुख्यालय येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृह येथे एकत्रित विकास नियमावली (युनिफाईड डिसीआर)अंमलबजावणी व विकास कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपा आकृतिबंधच्या विषयी मंत्री शिंदे म्हणाले, येत्या … Read more

‘सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नाही’

नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन प्रकार आढळून आला आहे. त्यासाठी जगभरातील देशांनी खबरदारीचे उपाय राबवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, देशातही यासाठी पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे. या नव्या प्रकारामुळे च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी, ‘सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नाही’ असे म्हटले … Read more

वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

पुणे-  जमिनीवर कर्जाचा बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महसुल विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली … Read more

उपचारासाठी पुण्या-मुंबईकडे धावण्याची गरज नाही

मंत्री वळसे पाटील ः भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना सेवा मंचर (प्रतिनिधी) – मंचर-वडगांव काशिंबेग फाटा येथील भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये करोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरू केला जाणार आहे, त्यामुळे पुणे, मुंबई येथे रुग्णांना उपचारासाठी धाव घ्यावी लागणार नाही. त्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे तीन, दोन खासगी डॉक्‍टरांच्या माध्यमातून, तसेच पाच व्हेंटिलेटर भीमाशंकर हॉस्पिटल व्यवस्थापन उपलब्ध करून देणार … Read more