रामपूर न्यायालयाचा जयाप्रदा यांना दिलासा ! ‘या’ प्रकरणातील अजामीनपात्र वॉरंट घेतले मागे

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या नेत्या जयाप्रदा यांना उत्तर प्रदेशातील रामपुर येथील न्यायालयाने दिलासा दिला आहे. जयाप्रदा यांच्या विरोधात जारी करण्यात आलेले वॉरंट न्यायालयाने मागे घेतले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आज म्हणजे सोमवारी जयाप्रदा न्यायालयात अचानक प्रकट झाल्या होत्या. न्यायालयाने त्यांचे विनंतीपत्र मान्य केले आहे. २० हजार रूपयांच्या चार जणांच्या हमीवर त्यांना दिलासा देण्यात … Read more

Pakistan: इम्रान खान यांच्या अडचणी संपेना; अटक वाॅरंट जारी

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाक निवडणूक आयोगाने जामिनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. इम्रान यांच्याबरोबर त्यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्याविरोधातही अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्याविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या चार सदस्यीय पिठाने इम्रान खान यांच्यासह … Read more

संजय राऊत यांच्याविरुद्ध ‘या’ प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट जारी केले असल्याचे म्हटले आहे. शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने ही कारवाई केली. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 जानेवारीला … Read more

Poll code violation : जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

बरेली – ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. देशात 2019 या वर्षी झालेल्या मागील लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावरून त्यांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यांत दोन गुन्हे नोंदवण्यात आले. त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याबद्दल जयाप्रदा यांच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी … Read more

खासदार नवनीत कौर राणा यांचा पाय आणखी खोलात; दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून पुन्हा वॉरंट जारी करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांविरोधात दोन महिन्यात दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात … Read more

राणा दाम्पत्याला न्यायालयाची नोटीस; म्हणाले,”तुमचा जामीन का रद्द करू नये?”

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये?  असा सवाल करत याविषयी त्यांनी आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्याने माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर टीका केली … Read more

राज ठाकरेंविरोधात ‘त्या’ प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट

मुंबई :  मशिदींवरील भोंग्यांविरोधात  कडक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.  २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत  आहे. सांगलीमधील शिराळा न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. ६ एप्रिलला हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. एक महिना … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बीड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे. मात्र याप्रकरणी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात सतत ते सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे … Read more

100 कोटी वसुली प्रकरण: माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या; अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई – शंभर कोटीच्या वसुलीच्या आरोपांमुळे गोत्यात आलेले मुंबई माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिंह यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपाप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने यासंबंधित कोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ठाणे पोलिसांना परमवीर सिंह यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या … Read more