यूपीमध्ये भाजप नव्याचेहऱ्यांना देणार ‘संधी’; कुमार विश्वाससह ‘या’ नावांची चर्चा

Bjp Candidate List Kumar Vishwas Nupur Sharma

Lok Sabha elections 2024 । 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तिसरी यादी लवकरच बाहेर येऊ शकते. यूपीसाठी भाजपने केवळ 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उरलेल्या जागांवर पक्ष अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करू शकतो, असे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे पक्ष यूपीमधील उमेदवार म्हणून अशी अनेक नावे बनवू शकतो, जे … Read more

Prophet row | भाजपच्या माजी प्रवक्‍त्या नुपूर शर्मांना मिळाला बंदुकीचा परवाना

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी भाजपच्या माजी प्रवक्‍त्या नुपूर शर्मा यांना बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. त्यांना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पक्षातून गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते. नुपूर शर्मा यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यांना येणाऱ्या धमक्‍यांचे मुल्यांकन करून आणि योग्य त्या प्रक्रियेचे पालन करून त्यांचा शस्त्र परवाना मंजुर करण्यात आल्याचे दिल्ली … Read more

#Flashback2022 : नुपूर शर्मा, हिज़ाब, सावरकर वादाच्या केंद्रस्थानी

नवी दिल्ली  – वर्ष 2022 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊया या वर्षातील काही वादग्रस्त प्रकरणांबद्दल, ज्यांनी सर्वसामान्य माणसांची झोप उडवली होती. पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी 5 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील उड्डाणपुलावर त्यांचा ताफा अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्धीच्या झोतात आले. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून पाकिस्तानची सीमा … Read more

‘त्या’ वक्तव्याबाबत नुपूर शर्मांना सर्वोच्च दिलासा

नवी दिल्ली – वादग्रस्त ट्विटच्या संदर्भाने भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या प्रवक्‍त्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यांच्याविरोधात काही राज्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारी आणि “एफआयआर’च्या अनुषंगाने कोणतीही कारवाई बळाने करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. नुपूर शर्मा यांनी जीवे मारण्याच्या धमक्‍यांची दखल घेत न्यायालयाने नुपूर शर्मा यांना ट्विटसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या … Read more

नुपूर शर्मांचा ‘शिरच्छेद’ करण्याचे वादग्रस्त विधान करणाऱ्या अजमेर दर्गाच्या खादिम चिश्तीला अटक

नवी दिल्ली : भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात वादग्रस्त  वक्तव्य करणाऱ्या अजमेर दर्गाचा खादिम सलमान चिश्ती याला अजमेर पोलिसांनी अटक केली आहे.  प्रेषितांविरोधात वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपातून निलंबित झालेल्या नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण आपले घर देऊ असे चिश्ती याने जाहीर केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई करत … Read more

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

  अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. इरफान शेख असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी एक एनजीओ चालवतो आणि त्याने शमीम आणि त्याच्या मित्रांना त्याला मारण्यासाठी प्रवृत्त केले होते तसेच लॉजिस्टिक सपोर्टही दिला होता. इरफान शेखची सध्या चौकशी सुरू आहे. इरफानने आरोपींना 10 हजार रुपये देण्याचे आणि … Read more

उदयपुर हत्या प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी भाजप कार्यकर्ता असल्याच्या दाव्याने एकच खळबळ

नवी दिल्ली – उदयपुर येथे एका टेलरची अलिकडेच गळा चिरून हत्या झाली आहे, त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. या घटनेतील दोन आरोपींपैकी एक जण भाजपचाच सदस्य असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळेच हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करण्याची घाई केंद्र सरकारने केली आहे काय असा प्रश्‍नही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित … Read more

अमरावती : नुपूर शर्मा समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्ट हत्या प्रकरणात थेट गृहमंत्री शहांनी घातले लक्ष; केली मोठी घोषणा

अमरावती – येथे एका केमिस्टची गळा चिरून जी हत्या करण्यात आली आहे त्या प्रकरणाचा तपासही एनआयएकडे सोपवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. या आधी उदयपुर येथेही जी घटना घडली आहे त्याचाही तपास एनआयएकडेच देण्यात आला आहे. हे प्रकरण एनआयए कडे चौकशीसाठी सोपवावे अशी मागणी भाजपनेच केली होती असे सांगण्यात येत आहे. … Read more

महाराष्ट्र हादरला! अमरावतीत नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्टची निर्घृण हत्या

नागपूर – महाराष्ट्रातील अमरावती शहरात एका 54 वर्षीय केमिस्टची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. उमेश कोल्हे असे यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी भाजपच्या वादग्रस्त निलंबीत प्रवक्‍त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती त्यामुळेच त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप आहे. ही घटना उदयपुर घटनेशी मिळती जुळती … Read more

‘तुम्ही देशात…’ – न्यायालयाने भाजपच्या निलंबित प्रवक्‍त्या नुपूर शर्माला कठोर शब्दांमध्ये फटकारले

नवी दिल्ली – वादग्रस्त विधान केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्‍त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सगळ्यांचा दिल्लीत एकत्रित तपास केला जावा अशी मागणी करणारी याचिका शर्मा यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र त्याच्या सुनावणीच्या वेळी आज न्यायालयाने नुपूर शर्मा यांना चांगलेच फटकारले. तुम्ही देशात आग लावण्याचे … Read more