पिंपरी | निरोगी आयुष्यासाठी ज्येष्ठांनी नियमित व्यायाम करावा – वसंत ठोंबर

चिखली, (वार्ताहर) – जेव्हा जेव्हा आपण निरोगी जीवनशैलीचा विचार करतो तेव्हा नियंत्रित आणि अत्यंत पौष्टिक आहार, हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवन, जमेल तसा व्यायाम, मित्र मैत्रिणींबरोबर संवाद करणे, फिरणे, योगा बरोबर हास्य योग व सकारात्मक दृष्टिकोन ही ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदी व निरोगी जीवन जगण्याची महत्त्वाची सूत्रे आहेत, असे मत वसंत ठोंबर यांनी व्यक्त केले. … Read more

शालेय पोषण आहारात आता अंडी अन्‌ केळीही; पूरक आहार मिळणार

पुणे – केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पुरक पौष्टिक पदार्थ देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, केळी मिळणार आहेत. यातुन विद्यार्थ्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील 86 हजार 500 शाळांमधील 1 कोटी 3 लाख विद्यार्थ्यांना पोषण … Read more

कालानमक तांदूळ आणि ब्लॅकराईसपासून तयार होणार पौष्टिक आहार

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर परिसरात पिकणारा कालनमक जातीचा तांदूळ आणि मणिपूरमध्ये पिकणाऱ्या ब्लॅक राईसच्या मिश्रणातून पौष्टीक आहार तयार करण्यासंदर्भात वाराणसीतील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्रात (इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट-इरी) संशोधन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया पदार्थ उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणानेही मदत केलेली आहे. या नव्या पदार्थाला कान्फ्लेक्स असे … Read more

विद्यार्थी “उपाशी’ अन् अधिकारी “तुपाशी’

पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही धान्यादी मालाचे वाटप करण्यास सुरुवात झालेली नाही. पुणे जिल्हा परिषदेच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे धान्यादी मालाचा मेनूही निश्‍चित करण्यात आला नसून सेंट्रल किचनमधील महिला बचत गट, संस्था यांना धान्यादी मालाचे वाटप करण्याबाबतचे कार्यादेशही देण्यात आले नाहीत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे … Read more

पुणे जिल्हा :1138 विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

* विद्यार्थी, पालकांमधून नाराजीचा सूर *  वाल्हे परिसरातील शाळांमध्ये चार महिन्यांपासून पुरवठा बंदच वाल्हे  – मागील दीड-दोन वर्षांपासून करोनामुळे शाळा बंद होत्या. तत्पूर्वी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून दिला जात होता. त्यानंतर धान्याच्या स्वरूपात पोषण आहार दिला जात होता. मात्र, सप्टेंबरपासून आजवर शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाल्हे परिसरातील … Read more

पोषण आहाराचे अपडेट द्या

एम.डी.एम.पोर्टलवर नोंद करण्याचे शाळांना आदेश 25 जानेवारीपर्यंत माहिती भरण्याची मुदत पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना पुरविण्यात येत असलेल्या तांदूळ व धान्य आदी मालाची माहिती अपडेट करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. माहिती अपडेट न केल्यास शाळांमधील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती भरण्याची सुविधाच बंद करण्यात येणार आहे, असा इशारा शालेय पोषण आहार कक्षाचे राज्य … Read more

गैरव्यवहारांची “खिचडी’ शिजणे बंद

पोषण आहाराची बिले यापुढे शिजवलेल्या अन्नाच्या वजनानुसारच – डॉ.राजू गुरव पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अनुदानाचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत (सेंट्रल किचन) शहरी भागातील शाळांना शिजवलेल्या अन्नाचे वजन करुनच पुरवठा करण्यात येत आहे. या वजनानुसारच बिले अदा करण्यात येणार आहेत. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांची बचतही होणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक … Read more

भात तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’

आरोग्यावर दुष्परिणाम करणारे घटक नसल्याचे समोर पुणे – कात्रजमधील राजस सोसायटी येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारामधील भातामध्ये आरोग्यावर दुष्परिणाम करणारे कुठलेही घटक नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालातून समोर आले आहे. याप्रकरणी सर्व घटकांची चौकशी करण्यात आली असून शिक्षण विभाग आणि शालेय पोषण विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून हा … Read more

पोषण आहार गैरकारभाराची खिचडी बंद

भरारी पथकांचा “वॉच’ : योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न, अहवालही बंधनकारक पुणे – राज्यातील शालेय पोषण आहार योजनेबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्या आहेत. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथकामार्फत शाळांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. या पथकाचा आता योजनेवर कडक “वॉच’ राहणार आहे. पथकाला कार्यवाहीचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. विविध … Read more

आदिवासी शाळेतील धान्यात पालीची विष्ठा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर : संबंधितांवर कारवाईची पालकांची मागणी भीमाशंकर – आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगाव येथील आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजन बनविण्यासाठी ठेकेदाराने खरेदी केलेल्या धान्यात उंदीर आणि पालीची विष्ठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच शाळेत सर्वत्र दुर्गंधी असून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. … Read more