आमदार मोहितेंच्या घर, कार्यालयाला छावणीचे स्वरुप

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार दिलीप मोहिते यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करोनाच्या महामारीमुळे अचानक रद्द झाले. मात्र, मंगळवारी (दि. 22) सकाळपासून दुपारपर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या घराजवळ आणि त्यांच्या कार्यालयाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. https://www.facebook.com/217046208635092/posts/1336506526689049/ सन 2020-21 मध्ये होणारी सरकारी नोकर भरती … Read more

डाळमोडी येथील युवकांचा निसर्ग संतुलनाचा संकल्प

वडूज  – सामाजिक, राजकीय द्वेषापोटी गावोगावी मतभेदाच्या भिंती तयार झाल्या आहेत. याची लागण मोठ्या शहरापेक्षा खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. या मत व मनभेदाच्या भिंती तोडून गावामध्ये एकीचे वातावरण निर्माण करण्याबरोबर परिसरात निसर्गाचे चांगले संतुलन राखण्याचा संकल्प खटाव तालुक्‍यातील डाळमोडी येथील शेकडो युवकांनी केला आहे. डाळमोडी गावामध्ये दोन वर्षापूर्वी किरण निकम, अजित माने आणि सचिन घाडगे … Read more

कंपन्यांत संसर्गविरहित वातावरणासाठी यंत्रणा

सीसीटीव्हीवरील माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा विश्‍लेषण मुंबई – लॉकडाऊन अंशतः शिथिल केल्यानंतर गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपन्यांतील कामकाज सुरू झाले आहे. त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक ती उपकरणे आणि यंत्रणा काही कंपन्या विकसित करीत आहेत. भारत फोर्ज या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हेल्थ मॉनिटरिंग सिस्टिम विकसित केली आहे. याकरिता या कंपनीने ब्लॅक स्ट्रॉ … Read more

खासगी कंपन्यांबाबत तक्रारींचा पाऊस

कारवाईचे अधिकार नसल्याने पालिकाही हतबल : जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची पुणे – अनेक कंपन्यांनी “वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. मात्र, “आम्हाला रोज ऑफिसला बोलवतात..आम्हाला अजूनही बायेमेट्रिक हजेरी सुरू आहे. आम्हाला कोणीही सॅनिटायझर्स देत नाहीत. आमच्या ग्रुपने बैठका बोलवतात,’ अशा अनेक तक्रारी खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांसह आरोग्य विभागास केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे नाव … Read more

कराड नगराध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

प्रहार संघटनेच्या पवित्र्याने शहरात खळबळ कराड – कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्या दालनाला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी टाळे ठोकले. निवेदन देण्यासाठी पालिकेत आल्यानंतर नगराध्यक्ष उपस्थित नव्हत्या. दोन तास वाट पाहूनही त्या आल्या नाहीत; परंतु भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या गेल्याचे समजताच संतप्त कार्यकर्त्यांनी पालिकेतील कर्मचाऱ्याला अध्यक्षांच्या दालनात कोंडून बाहेरून टाळे ठोकले. या धक्कादायक प्रकाराची माहिती … Read more

दिव्यांगांचा मोर्चा समाजकल्याण कार्यालयात घुसला

जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांना घेराव; प्रश्‍नांचा भडिमार करत ठिय्या सातारा – प्रहार अपंग क्रांती आंदोलन आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने सुमारे चारशे दिव्यांगांनी आज जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने जिल्हा परिषदेत काही वेळ गोंधळ झाला होता. केंद्र सरकारच्या दिव्यांग हक्क कायदा 2006 ची … Read more

संघ कार्यालयावर बॉम्ब फेकणाऱ्या स्वयंसेवकला अटक

कोची : पोलिस चौकी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला केरळ पोलिसांनी अटक केली. ही घटना 16 जानेवारीला घडली होती. त्याला तमिळनाडूतील कोईमतूर येथून अटक करण्यात आली. संघाचे कार्यालय असणाऱ्या कथीरूर मनोज स्मृती केंद्राजवळील पोलिस चौकीवर बॉम्ब संशयित प्रबेश याने फेकले होते, असे पोलिसांनी सांगितले. त्याने 16 जानेवारीच्या पहाटे पोलिस … Read more

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा कृषी कार्यालयात राडा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा कृषी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. सोमवारी दुपारी हि घटना घडली. सोयाबीन पीक विमा शेतकऱ्यांना दिला गेला नसल्याने कार्यकतें कृषी अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु कृषी अधीक्षक रजेवर असल्याने कार्यकर्ते कृषी उपसंचालक एस पी जाधव दालनात गेले.परंतु त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयात धुडगूस घातला. संतप्त … Read more

कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय बंगळुरात पेटवले

बंगळुरू : शहरातील मल्लेश्‍वरम्‌ भागातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय काल रात्री पेटवून देण्यात आले. मात्र यातील आरोपींची ओळख अद्याप पटली माही. मोटारसायकलवरून आलेल्या काही जणांनी पेट्रोल ओतून रात्री दीडच्या सुमारास पेटवले. त्यांनी कार्यालयाच्या आवारात लावलेल्या वाहनांनाही पेटवून दिले. या आगीत कार्यालयाजवळ उभ्या केलेल्या सहा मोटार सायकली जळून खाक झाल्या. सुधारीत नागरीकत्व कायद्याला भाकप करत असलेल्या … Read more