ओमायक्रॉनमुळे व्यापारीवर्गात धास्ती

पाबळ – दोन महिन्यांपूर्वी आटोक्‍यात आलेल्या करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा ओमायक्रॉन संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील व्यवसायावर अवकळा आली असून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर मंदीचे सावट आले आहे.  पाबळ भागात याविषयी चर्चा सुरू असून आता हा नवा करोना किती दिवस चालणार? अशी नाराजी व्यावसायिक व्यक्‍त करीत आहेत. या चर्चेतील मोठी नाराजी … Read more

करोनाचा कहर महाराष्ट्रात ‘मिनी लॉकडाऊन’ सुरू, मुंबईतील धारावीत पॉझिटिव्हिटी रेट २१ टक्क्यांवर

मुंबई – ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे. याशिवाय राज्यात करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार निर्बंध व नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील, असे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पत्रकाद्वारे … Read more

पुण्यात 118 ओमायक्रॉनचे नवे रुग्ण; 2,471 नवीन बाधित

पुणे- शहरात आज नव्याने 2 हजार 471 करोना बाधित सापडले. वाढत्या संसर्गामुळे तपासणीच्या संख्येत वाढ करण्यात आली असून, दिवसभरात तब्बल 19 हजार 186 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. दरम्यान, राज्यात आज ओमायक्रॉनचे एकूण 133 रुग्ण सापडल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये पुणे महापालिकेत सर्वाधिक 118 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 3, वसई विरार येथे … Read more

Coronavirus : देशात करोनाची १ लाख ४१ हजार ९८६ नवीन प्रकरणे, ४० हजारपेक्षा जास्त करोनामुक्त

नवी दिल्ली – देशातील प्राणघातक करोना विषाणूच्या साथीचा वेग अनियंत्रित होत आहे. यासोबतच करोनाचा सर्वात धोकादायक प्रकार असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत करोना विषाणूचे एक लाख ४१ हजार ९८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, २८५ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ओमायक्रॉची ३ हजार ७१ प्रकरणे समोर आली … Read more

चिंताजनक ! ओमायक्रॉन देऊ शकतो नवीन “व्हेरिएंट”ला जन्म

नवी दिल्ली – सध्या जगभरात वेगाने पसरत असलेल्या करोनाच्या ओमायक्रोन या व्हेरिएंटचा  प्रभाव पूर्वीच्या करोना व्हायरस पेक्षा कमी असल्याचं सांगितले जातं. त्याच बरोबर हा व्हेरिएंट संपुष्ठात येईल आणि  आपण सगळे सामान्य जीवन पुन्हा जगू शकू असे भाकीतंही करण्यात आले. त्यामुळे उत्साह आहे. मात्र ओमायक्रॉन संदर्भात आता चिंताजनक बाब समोर आली असून जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) … Read more

‘ओमायक्रॉन’ संदर्भात दिलासादायक बातमी; ‘ICMR’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना विषाणू ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटची चाचणी करण्यासाठी OmiSure किटला मान्यता दिली आहे. OmiSure हे किट टाटा मेडिकलने विकसित केले आहे. टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या TATA MD CHECK RT-PCR OmiSure ला ICMR ने 30 डिसेंबर रोजीच मान्यता दिली होती, परंतु त्याची माहिती आज मंगळवारी समोर आली आहे. Omisure … Read more

सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित पुण्यात

पुणे – पुणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली असून, राज्यात रविवारी 50 ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या 49 झाली असून, राज्यात ओमायक्रॉन बाधितांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. तर सांगलीचा नव्याने समावेश झाला आहे. राज्यातील एकूण बाधित संख्या रविवारी 510 झाली आहे. रविवारी नोंद झालेल्या 50 बाधितांमधील … Read more

Omicron | कोल्हापुरात ओमायक्रॉनचा शिरकाव; दक्षता घेण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन

कोल्हापूर(प्रतिनिधी) : ओमायक्रॉन विषाणूने अखेर कोल्हापुरात शिरकाव केला आहे.आज दुपारच्या सुमारास कोल्हापुरात पहिला बाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले.यानंतर आरोग्य यंत्रणेबरोबरच शहरात एकच खळबळ उडाली. मात्र त्वरित उपाययोजना करत तो भाग सील करण्यात आला आहे. तर नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणेचे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केली आहे. आय टी आय परिसरातील एका कुटुंबातील चार … Read more

चिंताजनक! ‘ओमायक्रॉन’रुग्णांमध्ये वाढ; 27 दिवस, 21 राज्ये आणि 781 प्रकरणे

नवी दिल्ली – ओमायक्रॉनचा धोका देशात सातत्याने वाढत आहे. करोनाचा हा नवीन प्रकार देशातील 21 राज्यांमध्ये पोहोचला आहे. गेल्या 24 तासात ओमायक्रॉनचे 128 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 871 वर पोहचली आहे. ओमायक्रॉनचे 241 रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक प्रकरणे आहेत, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. … Read more

‘ओमायक्रॉन’ प्रकरणांमध्ये दिल्ली अव्वल, महाराष्ट्राला टाकले मागे, देशात एकूण 598 रुग्ण

नवी दिल्ली – ओमायक्रॉन रुग्ण संख्येत दिल्लीने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. दिल्लीत आता एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 142 झाली आहे तर महाराष्ट्रात आता 141 प्रकरणे आहेत. देशात एकूण 598 रुग्ण आहेत. ओमायक्रॉनया धोका लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने आज रात्रीपासून राजधानीत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. देशात करोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरीयंटचा … Read more