nagar | कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम – काटे

शेवगाव, (प्रतिनिधी) – सध्याचा लोकसभा निवडणुकीचा माहोल लक्षात घेऊन भाजप सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठविण्याची घोषणा केली. मात्र, ती अत्यंत फसवी आहे. उलट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्याचेच काम भाजपने याद्वारे केले असल्याची टीका केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी येथे केली. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ तालुक्यात ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या कोपरा बैठकीत … Read more

Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; केंद्र सरकारने निर्यातीवरील बंदी उठवली

Onion Export: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 2023-24 मध्ये 2023-24 मधील खरीप आणि रब्बी पिकांचा अंदाज कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेली मागणी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 … Read more

पुणे जिल्हा | केंद्र सरकारला फक्त गुजरातच्या शेतकऱ्यांची चिंता

शिक्रापूर (वार्ताहर)- महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरातमध्ये असताना देखील केंद्र सरकारने गुजरातच्या दोन हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली असल्याने मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता आहे. या निर्णयाने दाखवून दिले आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका, अशा खणखणीत शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या … Read more

पुणे जिल्हा : वातावरणाने पिचडले अन् निर्यातबंदीने रडवले

वडापुरी – लहरी वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे आधीच कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता कुठे शेतकर्‍यांच्या कांद्याला थोडा अधिकचा दर मिळण्यास सुरुवात झाली असता केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केली. कांदा निर्यात बंदीमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये केंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात रोष उमटत आहे. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे केवळ एकाच दिवसात कांद्याचे बाजारभावात कमीतकमी दोन हजार रुपये प्रति क्विंटलने … Read more

कांदा प्रश्न पु्न्हा पेटला; नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार, उपबाजार समितीत कडकडीत बंद

नाशिक – नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर (Onion farmers) आता कांदा व्यापारी (Onion trader) वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत (market committee) कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) मार्फत सुरू असलेली … Read more

Maharashtra : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; 300 कोटींचं अनुदान वितरित होणार…

मुंबई :- राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, … Read more

कांदा रडवणार! दर आणखी वाढणार…

पिंपरी – राज्यात कांदा तुटवडा कायम असून आवश्‍यकतेपेक्षा कमी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. बाजारात कांदा 45 ते 55 रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या काही दिवसांतच कांदा दर दुप्पट झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जानेवारीत 25 ते 30 रुपये किलो दराने कांदा मिळत होता. परंतु फेब्रुवारीच्या पहिला आठवड्यानंतर कांदा ठिकठिकाणी 50 … Read more

…तर ‘या’ परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला होईल – शरद पवार

मुंबई – केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. शरद पवार म्हणाले कि, कांदा … Read more