मोदींच्या सभेत कांदाप्रश्नावर घोषणाबाजी करणारा शेतकरी पोलिसांच्या ताब्यात, पाहा संपूर्ण Video

PM Narendra Modi | Onion – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना एका शेतकर्‍याने घोषणाबाजी केली. त्या शेतकर्‍याने कांद्यावर बोला, असे म्हणताच गोंधळ निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. पिंपळगाव बसवंतमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला … Read more

कांदा स्वस्त मिळावा म्हणून निर्यातीवर बंदी !

नवी दिल्ली – देशवासीयांना कांदा स्वस्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिली आहे. सरकारने आठ डिसेंबर २०२३ पासून ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की, कांदा निर्यातीवर बंदी लादण्यामागे बरीच कारणे आहेत. … Read more

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात विधानभवनात विरोधकांची निदर्शने

नागपूर  – कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज येथील विधानभवनात आंदोलन केले. विरोधकांनी कांद्याच्या एमएसपीमध्ये (किमान आधारभूत किंमत) वाढ करण्याची आणि हंगामी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार भारताने मार्च 2024 … Read more

Onion price : जानेवारीत कांद्याचे दर ४० रूपयांच्या खाली येतील; केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा दावा

Onion prices – सध्या देशाच्या अनेक भागात कांद्याचे दर चढेच राहिले आहेत. आजही कांद्याचे भाव सरासरी ५७ रूपये प्रति किलो इतके आहेत. तथापि जानेवारीपर्यंत हे दर ४० रुपये प्रति किलोग्रॅमच्या खाली जाण्याची सरकारची अपेक्षा आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत कांद्याची किरकोळ विक्री किंमत ८० रुपये प्रति … Read more

शेतकरी चिंतेत.! कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान, दरात मोठी घसरण

Onion News – सध्या कांद्याच्या (Onion) दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणात सातत्याने होणारे बदल तसेच दिवाळी सणानिमित्ताने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. त्याचा … Read more

Nashik News : कांदा लिलाव 26 सप्टेंबरपर्यंत बंदच; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका !

नाशिक – नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये चार दिवसांपासून कांद्याचे (Onion) लिलाव बंद असून 26 सप्टेंबरपर्यत बंद कायम राहणार आहे. कांदा (Onion) निर्यातमूल्य रद्द करावे या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले आहेत. व्यापारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लिलाव सुरू होणार नाहीत अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. … Read more

“कांदा उत्पादकांनी चिंता करू नये…’; केंद्रीय कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले? वाचा….

नवी दिल्ली – केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर, महाराष्ट्रसह अन्यत्र शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संबंधात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी कांद्याच्या भावाबाबत चिंता करण्याची गरज नाही. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणत्याही … Read more

कांदा प्रश्‍न पेटलेलाच.! नाशिकमधील सर्व बाजार समित्या बंद; शेतकरी संतप्त

नाशिक – केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कावर तब्बल 40 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केली जात आहेत. तसेच, नाशिक जिल्ह्यात सर्व प्रमुख 15 बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय शेतकरी व व्यापाऱ्यांनी घेतला. राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाल्याने राज्य सरकारही हादरले. राज्य सरकारने तात्काळ पाऊले … Read more

“दोन चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो?’; महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं अजब विधान

मुंबई – कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे की लोकांनी दोन चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो. दहा लाख रूपयांच्या गाड्या वापरणाऱ्यांना 10 किंवा 20 रूपये जादा दराने कांदा खरेदी केला तर काय होणार … Read more

‘केंद्राची काद्यांवरील निर्यात शुल्क अन्यायकारक’; राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतप्त

मुंबई  – केंद्र सरकारने शनिवारी एक अधिसूचना काढताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार हे सर्वच संतप्त झाले. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि घातक असून काद्यांवरील निर्यात शुल्क अन्यायकारक असल्याचे मत ते व्यक्त करत असून या निर्णयाचा फायदा पाकिस्तानला होईल, असे निर्यातदार बोलत आहेत. केंद्राचे हे … Read more