पुणे | निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात वाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी मागे घेतल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. ती मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी (दि. ५) मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये भारताने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू … Read more

नगर | कांद्याचे राजकारण अन् खोट्या निर्यातबंदीवर शेतकर्‍यांचे मरण

नगर,{रवींद्र कदम}-  गेल्या दोन-तीन दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्यातबंदी उठविल्याची साखरपेरणी जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळे यानिर्यातबंदीचा शेतकर्‍यांना फायदा होणार की व्यापार्‍यांना? हेही पहावे लागणार आहे. मात्र, संबंधित राजकारण्यांकडून खोट्या निर्यातबंदीचे भांडवल करून राजकीय डाव मांडले जात आहेत. त्यामुळे कांदा भाववाढीच्या आशेवर बसलेल्या शेतकर्‍यांच्या वर्मावर घाव घातला जात आहे. दरम्यान, निर्यातबंदीचे पितळ उघडे पडल्याने त्याचे राजकीय … Read more

गॅस सिलेंडर व कांदा दरवाढीने कोलमडले गृहिणींचे बजेट

पिंपरी – करोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सावरत असतानाच गॅस सिलेंडर व कांदा दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सिलेंडरच्या दरात 50 रुपये वाढ झाली असून, कांद्याचा प्रतिकिलोचा दर 50 रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारात कांद्याचा वापर करण्यावर मर्यादा आल्या आहेत. करोनामुळे लॉकडाऊनचा बसलेला फटका, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा भाजीपाला वाढीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी कांद्याचे हातचे … Read more

कांदा रडवणार! दर आणखी वाढणार…

पिंपरी – राज्यात कांदा तुटवडा कायम असून आवश्‍यकतेपेक्षा कमी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. बाजारात कांदा 45 ते 55 रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या काही दिवसांतच कांदा दर दुप्पट झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जानेवारीत 25 ते 30 रुपये किलो दराने कांदा मिळत होता. परंतु फेब्रुवारीच्या पहिला आठवड्यानंतर कांदा ठिकठिकाणी 50 … Read more

‘कांद्याबाबत सरकारचे धोरण चुकीचे’

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका पुणे – कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणि आयातीला पाठिंबा हे केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असे वाटत नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर आयोजित बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, “राज्यात कांद्याच्या प्रश्‍नावर शेतकऱ्यांना … Read more

कांदा पुन्हा भडकला! वाचा सध्याचे भाव

पुणे – पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. जुन्या कांद्याची प्रतही काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत राज्यासह परराज्यातून मागणी वाढल्याने घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचा भाव 270 ते 340 रूपयांवर पोहचला आहे.    गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा किलोमागे सुमारे 90 रूपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ … Read more

…तर ‘या’ परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला होईल – शरद पवार

मुंबई – केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. शरद पवार म्हणाले कि, कांदा … Read more

रब्बीतील तब्बल 25 लाख टन कांदा अतिरिक्‍त ठरण्याची शक्‍यता

केंद्र सरकारने आतापासूनच नियोजन करणे आवश्‍यक पुणे – गेल्या रब्बीच्या कांद्याला चांगला भाव मिळाल्याने यंदा रब्बी हंगामात कांदा लागवडीत वाढ झाली आहे. तर आता करोनाच्या प्रादुर्भावामुळे कांदा निर्यातीवर मर्यादा आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे देशपातळीवर 25 लाख टन कांदा अतिरिक्त ठरण्याची शक्‍यता निर्यातदारांनी वर्तविली आहे. त्यामुळे कांद्याची निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारला आतापासूनच नियोजन करणे आवश्‍यक आहे. … Read more

कांद्याचे दर पुन्हा भडकणार

नाशिक: कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांमुळे कांद्याच्या बाजारभावात आपण चढ-उतार बघितले आहे. मात्र आता करोनाच्या संकटामुळे आशियातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कांद्याच्या बाजारपेठेतील कांदा लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव हे शंभरीचा टप्पा ओलांडून गगन भरारी घेणार असल्याची शक्‍यता आहे. देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर 17 डिसेंबर … Read more

रब्बी कांदा उत्पादनात यंदा उच्चांकी वाढीची शक्‍यता

पुणे – केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. रब्बी कांदा क्षेत्रात 18 टक्‍के, तर उत्पादनात 20 टक्‍के वाढीचे अनुमान असून, फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्‍त उत्पादनामुळे बाजारभाव मातीमोल होण्याची डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी हटविण्याची आग्रही मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. देशातील रब्बी … Read more