पिंपरी | पर्यावरण जनजागृती स्पर्धेचे आयोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – ईसीए (पर्यावरण संवर्धन समिती) च्या माध्यमातून शाळा, कॉलेज व शहरातील सोसायटी गाव इत्यादी परिसरात एक विषय घेऊन पथनाट्य किंवा प्रत्यक्ष कृती करून, त्याचे सादरीकरण करून जनजागृती करणे. या स्पर्धेत ६ वर्षाच्या मुलीपासून तर ७० वर्षे वय असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदवला. पाणीबचत, वृक्ष लागवड, प्लास्टिक कचरा समस्या, ई कचरा समस्या जागतिक तापमान वाढ … Read more

पिंपरी | विद्यार्थ्यांच्‍या सर्वांगीण विकासासाठी रात्रशाळा कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड येथील, श्री साईनाथ बालक मंदिराच्या विद्यार्थ्यांनी नुकताच रात्रशाळेचा आनंद लुटला. बालक मंदिरात वर्षातून एकदा रात्रशाळा या कार्यक्रमाचे आयोजन केली जाते. रात्रशाळेत आकाशदर्शन, ग्रहांची माहिती, ध्रुव तारा, गुरु, या ता–यांचे मुलांना दुर्बिणीतून दर्शन घडवले जाते. असे सातत्याने घेतले जाणारे नवनवीन उपक्रम, हे साईनाथ बालक मंदिरचे वैशिष्ट्य आहे. त्यामधील रात्रशाळा हा मुलांच्या आवडीचा … Read more

महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांची उद्या साताऱ्यात बैठक

सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष, परिवर्तनवादी, पुरोगामी सामाजिक संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी व सर्व घटक पक्षांचे तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुका उपप्रमुख व पक्षांच्या सर्व आघाड्या व सेलचे जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी( दि. 11) दुपारी 2 वाजता येथील राष्ट्रवादी भवनामध्ये बैठकीचे आयोजन इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. या बैठकीस … Read more

पुणे जिल्हा : संघटनेच्या अध्यक्षांवर हल्ला करणारे गजाआड

रांजणगाव पोलिसयांची कामगिरी : सोनेसांगवी ग्रामस्थांकडून सन्मान रांजणगाव गणपती – रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिम ट्रिआँन प्रा. लि. या कंपनीमधील कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल थिटे हे कंपनीतून घरी जात असताना त्यांच्यावर काही जणांनी हल्ला करुन त्यांच्यावरती तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. या बाबत माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तीन आरोपींना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाई केली. सोनेसांगवी … Read more

पुणे जिल्हा: जेजुरी येथील अतिक्रमणे हटवा; संघटनांच्या वतीने आंदोलनाचा इशारा

बारामती – भटक्या विमुक्तांचे श्रद्धास्थान जेजुरीच्या खंडेराया व भटक्या विमुक्तांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीमध्ये मैदानातील अतिक्रमणे हटवा, अशी मागणी संघटनाच्या वतीने केली आहे. कार्यवाहीसाठी आंदोलनाचा इशारा दिला असून याबाब्त तहसीलदारांना निवेदन देण्यात आला आहे. जेजुरीत वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी भरत असलेला गाढवांचा बाजार व भटक्या विमुक्त्यांची न्याय प्रक्रिया त्या ठिकाणी चालत … Read more

‘मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर’ संघटनेवर बंदी

नवी दिल्‍ली – देशविरोधी कारवायांमध्‍ये सहभाग असल्‍याने मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम या संघटनेवर बंदी घालण्‍यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये या संघटनेचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याशिवाय, दहशतवादी गटांना या संघटनेकडून पाठिंबा दिला जात होता, अशी … Read more

सातारा : ‘जलजीवन’च्या प्रचारासाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

ज्ञानेश्वर खिलारी; योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न सातारा – जल जीवन मिशन योजनेची प्रभावी प्रचारासाठी ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयीन स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. जिल्हयातील सर्व ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी … Read more

पुणे जिल्हा : राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करणार -गारटकर

अजित पवार यांनी दिले जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र इंदापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करणार असून, थेट गाव पातळीच्या वाडीवस्तीपर्यंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शाखा तसेच सरकारच्या विविध योजना जिल्ह्यातील जनतेपर्यंत सोयीस्कररीत्या कशा पोहोचवता येतील. यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, प्रदीप गारटकर यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे … Read more

गट संसाधन केंद्र कर्मचारी संघटनेचे कामबंद आंदोलन सुरू

सातारा – राज्यातील सर्व जिल्ह्यातील गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता ) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारपासून (दि. 14) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होत असून आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने होत आहे. देशाला दिशादर्शक व मार्गदर्शने करणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. केंद्र व राज्य … Read more

गरजूंनी परतफेड केल्यास संस्थेची प्रगती – वळसे पाटील

मंचर – येथील अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांना ठेवीसाठी कमी व्याज दिले तरी चालेल. तसेच गरीब, गरजू महिलांनी त्याची परतफेड केल्यास संस्थेची योग्य प्रगती होईल. असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले . मंचर येथील अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी … Read more