पुणे जिल्हा : भेंडीवर रोगराईचा प्रादुर्भाव

लहरी वातावरणाचा फटका : उत्पादन घटणार चिंबळी – कमी खर्चात व थोड्या अवधीत जास्त उत्पादन निघणार्‍या भेंडी पिकाची टोकण पद्धतीने लागवड केली; परंतु अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण तसेच दाट धुके पडले असल्यामुळे पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घटणार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. चिंबळी (ता. खेड) येथील प्रगतिशील शेतकरी जयसिंग लक्ष्मण बहिरट यांनी गेल्या दीड … Read more

चीनमध्ये करोनाचा उद्रेक; WHO ने चीनकडून सर्व डेटा मागितला, मदतीचेही दिले आश्वासन

न्यूयॉर्क : जगभरात पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण सापडत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चीनमध्येच मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर येत आहे. चीनमधील करोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस … Read more

करोनानंतर मेंदू खाणाऱ्या अमिबाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या ‘या’ धोकादायक आजाराची लक्षणे आणि कारणे

करोनाच्या पुनरागमनाने जग अजून हैराण झाले होते की आणखी एका नवीन आजाराने एन्ट्री केली आहे. दक्षिण कोरियामध्ये ‘ब्रेन इटिंग अमिबा’चे पहिले प्रकरण समोर आले असून, त्यानंतर सर्वांचीच झोप उडाली आहे. हा आजार अत्यंत जीवघेणा असल्याचे सांगितले जाते. ‘ब्रेन इटिंग अमिबा’ लोकांच्या मेंदूचा नाश करतो. कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन एजन्सी (KDCA) ने या आजाराची पुष्टी … Read more

देशातील करोना रुग्णवाढीवर आदर पुनावाला म्हणाले,”घाबरू नका…”

 बीजिंग  : जगाला धडकी भरवणारा करोना जिथून जन्माला आला त्याच चीनमध्ये पुन्हा एकदा या व्हायरसने डोके वर काढले आहे. त्यातच इथल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण  निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभुमीवर भारतात देखील खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत. चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ आदर पूनावाला यांनी भारतीयांना न घाबरण्याचा … Read more

आढळरावांच्या प्रतिमेचे दहन; खेडमध्ये शिवसैनिकांचा उद्रेक

गाढवावर छायाचित्र छापून गद्दार असा उल्लेख राजगुरूनगर : शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांचे खच्चीकरण केले. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याने खेड तालुक्‍यातील संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर त्याचे दहन केले. तसेच गद्दार आढळराव असा फलक हातात घेत शिवसैनिकांनी त्यांचा तीव्र निषेध … Read more

नव्या विषाणु प्रादुर्भावाबाबत मोदींनी घेतली आढावा बैठक

नवी दिल्ली – दक्षिण अफ्रिकेत करोनाचा ओमिक्रॉन हा नवीन विषाणू आढळून आला आहे. त्या विषाणुच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या धोक्‍याबाबत पंतप्रधान मोदींनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी संबंधीत तज्ज्ञांनी या नवीन विषाणुंची पंतप्रधानांना माहिती सादर केली. आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध मागे घेण्याच्या निर्णयाचा संबंधीत अधिकाऱ्यांनी फेर आढावा घ्यावा अशी सुचना मोदींनी यावेळी केली. या बैठकीच्या संबंधात प्रधानमंत्री … Read more

चीनमध्ये पुन्हा करोनाचा धुमाकूळ; विमानांची उड्डाणे रद्द, शाळांना ठोकले टाळे तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन

वुहान: भारताने एकीकडे १०० कोटींच्या लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असून त्याचा आनंद सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे चीनने मात्र पुन्हा एकदा करोनाचा  शिरकाव झाला असल्याने जगाची चिंता वाढली आहे. चीनमध्ये मागील काही दिवसांपासून   रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे चीनने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनने आपली हवाई सेवा काही वेळासाठी खंडित केली … Read more

शहरी भागातही रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार

मुंबई – राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची … Read more

साताऱ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव ; मरीआईचीवाडीतील मृत कोंबड्यांना बर्ड फ्लूच!

strong>सातारा – मरीआईचीवाडी (ता.खंडाळा) येथे मृत कोंबड्या आढळून आल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला होता. भोपाळ येथील राष्ट्रीय पशुरोग प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे मरीआईचीवाडी येथील मृत कोबड्याना बर्ड फ्लूच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सातारा जिल्ह्यात बर्ड प्लुचा शिरकाव झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लोणंद नजीक मरीआईचीवाडी येथे सुमारे 90 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला … Read more

“औषधांच्या साठ्यासाठी चीनने करोनाची तीव्रता लपवली”

न्यूयॉर्क : करोनाशी लढा देण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा करण्यासाठी चीनने  विषाणूची तसेच हा किती धोकादायक आजार आहे याची माहिती लपवल्याचा अमेरिकेतील अधिकाऱ्यांचा आरोप आहे. गुप्तचर विभागाने यासंबंधी एक अहवाल तयार केला आहे. चीनने जाणुनबुजून करोना महामारी किती गंभीर आजार आहे याची माहिती लपवली असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला करोनाचा फैलाव होण्यास … Read more