Coronavirus: चीनची स्थिती पाहता केंद्र सरकार सतर्क; ऑक्सिजन पुरवठा आणि वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना

नवी दिल्ली – काही देशांमध्ये कोविड रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने केंद्राने शनिवारी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना द्रव वैद्यकीय ऑक्‍सिजनची उपलब्धता, सिलिंडर्स आणि व्हेंटिलेटरसारख्या उपकरणांची रुग्णालयांमध्ये पुरेशी उपलब्धता ठेवण्याची सूचना केली आहे. आरोग्य मंत्रालयाने या सूचना करताना म्हटले आहे की, प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए),ऑक्‍सिजन निर्माण करणारे प्लांट पूर्णपणे कार्यान्वित आहेत की नाही हे … Read more

राज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय जालन्यात

जालना: राज्यातील पहिलं मेडिकॅब रुग्णालय जालन्यात सुरू करण्यात आलं आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते काल या मेडिकॅब रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं. जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि रेफर हॉस्पिटल म्हणून जालन्याला लागलेला डाग पुसून काढण्यासाठी या रुग्णालयाचा उपयोग होईल, अशी आशा राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हे … Read more

कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी ऑक्सीजन पुरवठ्यास प्राधान्य द्या – मुख्यमंत्री  ठाकरे

रत्नागिरी : कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी नवी कोविड केंद्र उभारुन बेडस् व रुग्णसुविधेसाठी ॲम्ब्युलन्स आदि सुविधांसोबत सर्वाधिक लक्ष ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर द्यावे आणि शक्य त्या ठिकाणी ऑक्सीजन निर्माणीस प्रारंभ करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयातील समर्पित कोविड रुग्णालयाच्या 200 खाटांचा दुसरा टप्पा आणि राजापूर तालुक्यातील ओणी येथील 30 खाटांच्या … Read more

“दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करत आहेत”; शिवसेनेची भाजपवर सडकून टीका

मुंबई : “महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आणि सरकार असल्यामुळे दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करत आहे, अशा परखड शब्दांत शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. आजच्या १ मे या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही टीका केली आहे. राज्यातले लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबले आहे. ज्या महाराष्ट्रानं देशाला आर्थिक प्राणवायूचा पुरवठा केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा … Read more

ऑक्‍सिजन पुरवठ्याच्या नुसत्याच “वाफा’!

मागणीच्या तुलनेत 22 टक्‍के कमी पुरवठा 84 मेट्रिक टन पुणे जिल्ह्याला कमी प्राणवायू सागर येवले पुणे – मागील महिनाभरात पुणे विभागात ऑक्‍सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. विभागातून तब्बल 511.6 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची मागणी असून, सध्या 399.06 मेट्रिक टन ऑक्‍सिजन मिळत आहे. मागणीच्या तुलनेत 22 टक्‍के टन ऑक्‍सिजन कमी मिळत आहे. त्यामुळे ऑक्‍सिजन पुरवठ्याचे नियोजन सुरू … Read more

“या’ शहरात “ग्रीन कॉरिडॉर’मुळे ऑक्‍सिजन पोहोचला वेळेत

नवी दिल्ली- गाझियाबाद येथील ऑक्सिजन प्लांटमधून गुरू तेज बहादूर रुग्णालयापर्यंत ग्रीन कॅरिडॉर करून ऑक्सिजन टँकर एका तासात नेल्याने मोठी दुर्घटना टळली. पोलीसांनी शनिवारी रात्री ही माहिती दिली. हे दिल्लीतील सर्वात मोठे करोना रुग्णालय आहे. तेथे सध्या 700 जण उपचार घेत आहेत. हा टँकर पोहोचला त्यावेळी तेथे अवघा दीड तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक होता. मोदीनगर … Read more

ससून, महापालिका रुग्णालयांत ऑक्‍सिजन पुरवठा वाढवा

विरोधी पक्षांची विभागीय आयुक्तांकडे मागणी पुणे – महापालिका तसेच ससून रुग्णालयात गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, या दोन्ही ठिकाणी ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने नवीन बेड वाढवणे शक्‍य होत नाही. तेथे तातडीनं ऑक्‍सिजन पुरवठा वाढवावा, अशी मागणी मनपा विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली. विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा … Read more

रेमडेसिव्हिअर वरून सुरू असलेले राजकारण थांबवावे

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेमडेसिव्हिअर इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा, या इंजेक्शनचा होत असलेला काळाबाजार, ऑक्सिजन बेडची कमतरता, व्हेंटीलेटरची कमतरता अशा विविध गोष्टी समोर येत आहेत. यामुळे नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारावरच गदा आली आहे. हा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात तसेच रेमडेसिव्हिअरबाबत सुरू असलेले राजकारण थांबवावे, या मागणीसाठी चित्रपट … Read more

पुण्यात आरोग्य व्यवस्थाच ‘गुदमरली’!

ऑक्‍सिजनची मागणी वाढल्याने रुग्णांना अन्यत्र नेण्याची वेळ पुणे – ऑक्‍सिजनची मागणी मोठ्याप्रमाणात वाढल्याने आज खासगी रुग्णालयांतील आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेतील ऑक्‍सिजनचा विषय ऐरणीवर आला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्‍सिजन संपल्याने तेथील रुग्ण अन्य रुग्णालयात नेण्याची वेळ आली असून, रुग्ण दगावण्याचेही प्रकार होत आहेत. महापालिकेने सुमारे 9 हजार बेड ताब्यात घेतले आहेत. त्यातील 6 हजार हे ऑक्‍सिजन … Read more

राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे; राजेश टोपेंचे मोठे विधान

मुंबई – राज्यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सर्व प्रकारे  नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायलाही तयार आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, असे साकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला घातले आहे.  … Read more