‘पाक लष्कराने नवाझ शरीफ यांना दिले दोन पर्याय’; एक तर देशाचे पंतप्रधानपद किंवा कन्येला पंजाबचे मुख्यमंत्रीपद

लाहोर – पाकिस्तानच्या लष्कराने माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांना दोन पर्याय दिले आहेत. एकतर नवाझ शरीफ यांनी स्वतः देशाचे पंतप्रधानपद स्वीकारावे किंवा नवाझ यांच्या कन्या मरियम नवाझ यांना पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री केले जावे, असे दोन पर्याय पाक लष्कराने नवाझ शरीफ यांच्या समोर ठेवले आहेत. चौथ्यावेळी देशाचे पंतप्रधान होण्याची संधी … Read more

आम्हीच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घातली; नवाझ शरीफ यांनी केली पाक लष्करावर टीका

लाहोर – अमेरिका किंवा भारतामुळे पाकिस्तानचे नुकसान झाले नाही. तर पाकिस्ताननेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाच्या कार्यकर्त्यांशी वार्तालापामध्ये ते बोलत होते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब होण्यास भारत, अमेरिका किंवा अफगाणिस्तान जबाबदार नाही. त्याला आपणच जबाबदार आहोत. लष्कराने आपल्या लोकनियुक्त सरकारला २०१८ मध्ये … Read more

Afganistan : ड्युरांड लाईनवर अजूनही तणाव; पाक लष्कर आणि तालिबानमध्ये चकमक

इस्लामाबाद :– पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीनेवरील ड्युरांड लाईनवर (Durand Line ) पाकिस्तानचे सीमेवरील लष्कर आणि तालिबानी सुरक्षा रक्षकांदरम्यान चकमक झाली आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या या नव्या चकमकीमध्ये किमान सात जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील दंद ए पटान भागात ही चकमक घडली. जखमी झालेल्यांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. … Read more

पाकिस्तानच्या लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 6 ठार

इस्लामाबाद – पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर बलुचिस्तानात कोसळले असून या दुर्घटनेत किमान 6 जण ठार झाले आहेत. सोमवारी रात्रीपासून हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. बलुचिस्तानातील लासबेला जिल्ह्यातील मुसा गोठ येथे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे आढळून आले आहे, असे लष्कराच्या माध्यम विभागाने म्हटले आहे. हा अपघात खराब हवामानामुळे झाला असण्याची शक्‍यता आहे. हेलिकॉप्टरमधील सर्व 6 जण या … Read more

विदेश वृत्त- अफगाणी दहशतवाद्यांचा पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला

इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांनी काल रात्री पाकिस्तानच्या सीमेजवळच्या लष्करी ठाण्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या जोरदार गोळीबारादरम्यान तीन सैनिक ठार झाले, असे पाकिस्तानच्या सैन्याच्यावतीने सांगण्यात आले. पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तान प्रांताच्या सीमेजवळच्या लष्करी ठाण्याजवळ ही घटना घडली. त्यामध्ये काही जण ठार झाले असे लष्कराने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र कोणत्याही त्रयस्थ माध्यमाकडून या वृत्ताला दुजोरा मिळू … Read more

ऐतिहासिक! पाकिस्तानच्या लष्करात दोन हिंदू अधिकाऱ्यांची लेफ्टनंट कर्नल पदावर बढती

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लष्करातील दोन हिंदू अधिकार्‍यांना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली असल्याची माहिती  पाकिस्तानच्या अधिकृत माध्यमांनी दिली आहे.  पाकिस्तानच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. मेजर डॉ. केलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डाने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर मेजर … Read more

झुंडबळींना रोखण्याचा पाक लष्कराचा निर्धार

इस्लामाबाद,-  झुंडबळींसारख्या घटनांना रोखण्याचा निर्णय पाकिस्तानातील लष्कराने आणि नागरी नेत्यांनी घेतला आहे. सियालकोटमध्ये श्रीलंकेचे नागरिकाची जमावाकडून हत्या झाल्याच्या पार्श्‍वभुमीवर नागरी आणि लष्करी नेतृत्वाने याबाबतचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये श्रीलंकेचा नागरिक प्रियांथा दियावर्दना यांच्या भीषण हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. देशातील कोणीही व्यक्ती अथवा संघटनेला कायदा हातात घेण्याची … Read more

पाकिस्तान सैन्याला मिळाले चीनकडून VT रणगाडे

इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्याने चिनी बनावटीच्या व्हीटी-4 रणगाड्यांची पहिली बॅच आपल्या सैन्यात औपचारिकरित्या सामील करून घेतली आहे. चीनमधील सरकारी मालकीची रणगाडे निर्मिती कंपनी नोरिन्कोद्वारा या रणगाड्यांचा पाकिस्तानला पुरवठा मागील वर्षीच्या एप्रिल पासून सुरू करण्यात आला आहे. चीनकडून व्हीटी-4 रणगाडे मिळवणारा पाकिस्तान तिसरा देश ठरला आहे. याआधी थायलंड आणि नायजेरियाने हे रणगाडे चीनकडून घेतले आहेत. पाकिस्तानातील … Read more

पाक लष्कराने हस्तक्षेप करणे थांबवावे – मौलाना फजलूर रेहमान

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या लष्कराने पाकिस्तानचे सरकार आणि पोलिसांशी संबंधित कोणत्याही नागरी विषयांमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे, अन्यथा पाकिस्तानमध्ये कोणतेही ऐक्‍य अस्तित्वात राहणार नाही, असे जमियत उलेमा ए इस्लाम (फजलूर) चे प्रमुख मौलाना फजलूर रेहमान यांनी म्हटले आहे. अलीकडच्या काळात कराचीमध्ये झालेल्या घटनांमधून पाकिस्तानच्या लष्कराचे पाकिस्तानमधील सर्व यंत्रणांवर मोठे नियंत्रण असल्याचेच दिसून येते आहे. प्रत्येक तालुक्‍यामध्ये लष्कराचे … Read more

पाकिस्तानातील शक्तिशाली लष्कराविरोधात विरोधी पक्षांनी थोपटले दंड

कराची – पाकिस्तानात लष्कराला सर्वांत शक्तिशाली मानले जाते. मात्र, त्या लष्कराविरोधात प्रमुख विरोधी पक्षांनी दंड थोपटल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांनी प्रथमच जाहीरपणे पाकिस्तानी लष्करावर आरोपांची सरबत्ती केली आहे. पाकिस्तानातील राजकीय घडामोडींवर लष्कराचा प्रभाव असल्याचे संपूर्ण जगाला ज्ञात आहे. मात्र, पाकिस्तानातील राजकीय नेते आणि लष्कराकडून कधीच त्याची जाहीर वाच्यता केली जात नाही. तेथील विरोधी पक्षही लष्कराच्या … Read more