Lok Sabha Election 2024 : अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केजरीवाल संतापले; म्हणाले, ‘ते लोक पाकिस्तानी आहेत का?’

Arvind Kejriwal | Amit Shah | Lok Sabha Election 2024 – पंजाबचे लोक पाकिस्तानी आहेत का? गुजरात, गोवा, उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश आणि देशातील अनेक भागातील लोकांनी आम्हाला प्रेम आणि विश्वास दिला. या देशातील सर्व लोक पाकिस्तानी आहेत का? तुम्हाला याचा इतका अभिमान आहे की तुम्ही लोकांना शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात करता. तुम्ही … Read more

पाकिस्तानी कुरापतीला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर

जम्मू – पाकिस्तान रेंजर्सनी बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आंतरराष्ट्रीय सीमेलगत मारा केला. त्या पाकिस्तानी कुरापतीला भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान रेंर्जसनी सीमेलगत जम्मू विभागात असणाऱ्या बीएसएफच्या चौकीला लक्ष्य करून गोळीबार केला. त्यानंतर बीएसएफच्या सतर्क जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये सुमारे २० मिनिटे धुमश्‍चक्री झाली. सुदैवाने त्यामध्ये भारतीय बाजूची कुठलीही … Read more

पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ड्रोनला पाडण्यात यश

नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. अनेकदा शस्त्रसंधी आणि चर्चांच्या फेऱ्या होऊनही पाकिस्तानने एक ड्रोन भारतीय हद्दीत घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृत्तसंस्थेने ट्वीट करून माहिती दिली आहे. दरम्यान, बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे ड्रोन वेळीच खाली पाडण्यात यश आले आहे. … Read more

पाकिस्तान महिला अँकर कडून भारतीय गोलंदाजांचे कौतुक

नवी दिल्ली – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात क्रिकेट कसोटी मालिका सुरु आहे. नुकत्याच दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळविला. पाच दिवस चाललेल्या या सामन्यात भारताचा गोलंदाज मोहमद सिराजने आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांना वेड लावले आहे. लॉर्ड्स कसोटीनंतर सिराजची देश-विदेशात बरीच चर्चा होत आहे. त्याने माजी कर्णधार कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानचे … Read more

पाकिस्तानातील गणेश मंदिराची तोडफोड

लाहोर – पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या एका हिंदू मंदिराची मुस्लिम कट्टरवादी जमावाकडून प्रचंड तोडफोड करण्यात आली. या मंदिराचा काही भाग या जमावाने पेटवून दिला. या गणेश मंदिरातील मूर्तीचीही विटंबना करण्यात आली. ही जाळपोळ आणि तोडफोड रोखण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर पाकिस्तान रेंजर्सना पाचारण करण्यात आले आहे. रहिम यार जिल्ह्यतल्या भोंग शहरातील मंदिरावर हा हल्ला करण्यात आला. हल्ला … Read more

पाकिस्तानातील अकरा अपहृत पोलिसांची सुटका

लाहोर – पाकिस्तानातील तेहरिक ई लबाईक या इस्लामिक कट्टरपंथीयांच्या संघटनेने लाहोर शहरातील हिंसक निदर्शनांच्यावेळी तेथील अकरा पोलीस जवानांचे अपहरण केले होते; पण आता त्यांची आज सुटका करण्यात आली आहे. रविवारी एका पोलीस ठाण्यावर हल्ला करून या संघटनेच्या समर्थकांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच पळवून नेले होते. त्यामुळे प्रशासन हादरले होते. त्यांनी अपहरणकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी … Read more

भारतीय लष्कराचा अधिकारी पाकिस्तानी माऱ्यात शहीद

जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र चालू ठेवत सोमवारी भारतीय हद्दीत मारा गेला. त्यामध्ये भारतीय लष्कराचा एका अधिकारी शहीद झाला. ती घटना जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली. पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी आणि पूँच जिल्ह्यांमध्ये गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्यांनी राजौरीच्या नौशेरा क्षेत्रातील भारतीय सीमा ठाण्यांना लक्ष्य केले. त्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी मृत्युमुखी … Read more

पूंछ, राजौरीमध्ये पाक सैन्याकडून गोळीबार

जम्मू – जम्मू-काश्‍मीरमधील नियंत्रण रेषेवर पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याने आज गोळीबार केला. भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले, असे संरक्षण प्रवक्‍त्यांनी सांगितले.  सीमेवरून पूंछ जिल्ह्यातील शाहपूर, किरणी आणि कासबा भागात आणि राजौरीमधील सुंदेरबनी भागात चिथावणीखोरपणे गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  पाकिस्तानी सैन्याकडून दुपारी 2.30 वाजता पूंछ जिल्ह्यातील तीन … Read more

पाकिस्तानी माऱ्यात भारतीय जवान शहीद

जम्मू-पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा शस्त्रसंधीचा भंग करत शुक्रवारी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशैरा क्षेत्रात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्या माऱ्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैनिकांनी सलग तिसऱ्या दिवशी शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती केल्या. त्यांनी मागील दोन दिवस पूँच जिल्ह्यात भारतीय … Read more

बीएसएफने पाडले पाकिस्तानचे टेहळणी ड्रोन

जम्मू – सीमा सुरक्षा दलाने आज जम्मू काश्‍मीरमधील कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानचे एक टेहळणी ड्रोन पाडले. पहाटे 5.10 च्या सुमारास बॉर्डर आऊट पोस्ट पानसरच्या आसपास पेट्रोलिंग ड्युटीवरच्या “बीएसएफ’च्या जवानांनी आकाशात हे ड्रोन उडताना पाहिले. “बीएसएफ’च्या जवानांनी सुमारे नऊ फैरी झाडल्या आणि आकाशात भारतीय हद्दीमध्ये सुमारे 250 मीटरवरचे हे ड्रोन पाडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  या … Read more