पालघरमध्ये अपघातांची मालिका ! 3 दिवसांत विविध दुर्घटनेत चौघांचा मृत्यू; 7 जण जखमी

पालघर – तालुक्यात अपघातांची मालिका सुरू आहे. मागील तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातांमध्ये आतापर्यंत सात जण जखमी झाले आहेत. रविवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी चहाडे – गुंदले रस्त्यावर टायर फुटून कार उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर … Read more

पालघरमध्ये बनावट जिऱ्याचा कारखाना उघडकीस ! भिवंडी, गुजरातशी कनेक्शन, नागरिकांच्या जीविताशी खेळ

पालघर – पालघर जिल्ह्यातील बनावट जिरे निर्मिती कारखाना पोलिसांनी सील केला आहे. रसायने वापरून तयार केल्या जात असलेल्या बनावट जिऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आतापर्यंत बनावट जिऱ्याची किती विक्री झाली आणि किती लोकांच्या आरोग्याशी खेळ झाला, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. पालघर मधील नंडोरे येथील हा बनावट कारखाना उघडकीस आल्यामुळे त्याचे धागेदोरे … Read more

पालघरमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या ! आरोपीने महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून 150 किमी दूर फेकला

पालघर – पालघरमध्ये 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी महिलेला पाण्यात बुडवून मारले. यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातमधील वलसाड येथील खाडीत फेकून दिला. या हत्येत आरोपीच्या पत्नीनेही साथ दिली होती, तिलाही पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर शुक्‍ला असे आरोपीचे नाव असून तो मुंबईत कॉस्टूम डिझायनर … Read more

एकीकडे रुग्ण संख्येचा वाढता आलेख, तर दुसरीकडे लसीकरण पुन्हा बंद

पालघर – सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हैदोस घातला आहे. या कोरोनामुळे देशाच्या सर्व स्तरावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. तसेच आरोग्य यंत्रणा ही पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे इंजेक्शनची कमतरता तर कुठे ऑक्सिजन अभावी लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यात … Read more

पालघर हत्याप्रकरणी सीआयडीची दोन आरोपपत्रे

पालघर: पालघर सामूहिक हत्याप्रकरणी राज्याच्या सीआयडीने 126 जणांविरोधात दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या घटनेमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने केलेल्या मारहाणीत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राज्याच्या “सीआयडी’ने 4,955 आणि 5,925 पानांची दोन आरोपपत्रे बुधवारी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केली. याप्रकरणी सबळ पुरावा मिळवण्यासाठी “सीआयडी’ने 808 संशयित … Read more

तीन मुलांची हत्या करून वडिलांची आत्महत्या

पालघर: नालासोपारा शहरात शनिवारी मध्यरात्री एक धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनीच आपल्या पोटच्या तीन मुलांची गळा चिरून हत्या करत स्वत: आत्महत्या केली. या घटनेने संपर्ण शहर हादरले आहे. कैलास परमार (वय 35) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कैलास परमार हे नालासोपाऱ्यात आपली पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. परंतु दीड महिन्यांपूर्वी … Read more

‘पालघर प्रकरणाचा तपास सीबीआय, एनआयएकडे द्यावा’

नवी दिल्ली: पालघर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात दोन साधूंसह तिघा व्यक्‍तींची जमावाकडून झालेल्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि एनआयएकडे द्यावा, अशी मागणी करणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सुनावणीनंतर न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली … Read more

पालघरप्रकरणी राज्य सरकारकडून सीलबंद अहवाल सादर

मुंबई: पालघरमधील सामूहिक हत्याकांडप्रकरणी राज्य सरकारने दोन सीलबंद अहवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. याप्रकरणी महिन्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश 30 एप्रिलला झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने दिले होते. या प्रकरणाचा तपास यंत्रणेचा अहवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? याची माहिती सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही एक याचिका … Read more

पालघर येथे बेस्ट बसमधून दारुची अवैध वाहतूक

पालघर: लॉकडाऊमुळ दारुची दुकाने बंद असल्यामुळे दारुच्या छुप्या पद्धतीने दारु आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्‍त्या लढवल्या जात आहेत. कधी अत्यावश्‍यक सेवेच्या वाहनातून तर कधी ऍम्बुलन्समधून दारूची वाहतूक केली जात आहे. आता तर थेट बेस्ट बसमधून दारुची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्वेला मुंबईच्या बेस्ट बसमधून 30 हजार रुपयांची देशी विदेशी दारु पकडली आहे. एका … Read more

मुंबईतील 72 कैदी करोना पॉझिटिव्ह

पालघर: ऑर्थर रोड तुरुंगातील स्वयंपाकीच्या माध्यमातून एका बॅरेकमधील 72 कैद्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या कैद्यांना मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे झालेल्या हत्याकांडाच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गृहमंत्र्यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाविषयी तसेच … Read more