पुणे जिल्हा | धामणीत खंडोबाच्या नवीन पालखीची मिरवणूक

लोणी धामणी,(प्रतिनीधी) – धामणी (ता. आंबेगांव) येथे धर्मबिजेला (रविवारी) कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या पंचधातूच्या मुखवट्याची लोकवर्गणीतून नवीन करण्यात आलेल्या पितळी पालखीतून वाजतगाजत सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात व फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. मागील वर्षीच्या (२३ नोव्हेबर २३) सोमवतीच्या सोहळ्यात खंडोबाच्या मानाच्या काठीच्या व पालखीच्या मानकर्‍यांनी खंडोबाची नवीन पालखी करण्याची ग्रामस्थांना विंनती केलेली होती. त्यावेळी देवस्थानने व … Read more

पुणे जिल्हा: श्रीक्षेत्र जेजुरीत पालखी महामार्गाचे काम निकृष्ट?

जेजुरी (ता. पुरंदर) : लवथळेश्‍वर येथील ओढ्यात कमी व्यासाचे पाइप टाकण्यात आले आहेत. जवळार्जुन – पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी उपजिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी महामार्गासाठी जागा संपादित करण्यात आली. त्याअनुषंगाने कामाला सुरुवात झाली आहे; परंतु पालखी महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराकडून अधिकची जागा संपादित करत मनमानी व चुकीच्या पद्धतीने काम केले जात आहे. … Read more

पुणे जिल्हा : माळवाडीत शिक्षकांसह बालचमूंनी काढली पालखी

राजगुरुनगर  – “पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा आहे, हाच वारसा जपण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी (काळूस) मधील बालचमूंनी आणि शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते. शाळेच्या शिक्षिका स्नेहा गहिणे यांनी या विद्यार्थ्यांना आपल्या वारकरी संप्रदायाची माहिती आणि अनुमती येण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांची पंढरीचीवारी काढली. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी यामध्ये … Read more

जे नेमे माझ्या गात विठोबासी ।।

  धन्य ते सभाग्य नर आणि नारी। करिताती वारी पंढरीची ।। तयांचे चरणी माझे दंडवत । जे नेमे माझ्या गात विठोबासी ।। दिवाळी दसरा अवघे पर्वकाळ । नांदती सकळ तया घरी ।। संत चोखोबांचा अभंगाचा अनुभव वारीमार्गावरील विसाव्याची आणि मुक्कामाची ठिकाणे “याचि देही, याचि डोळा’ घेत असतात. देव दर्शनाला आपण जातो; पण देव आपल्याला भेटायला … Read more

विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म।।

“पंढरीची वारी’ ही विविध भाषा, संस्कृतीचा एकोपा जपणारी, बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती-जमातींना एकत्र आणणारी आपली चालतीबोलती, जिवंत अशी लोकधाराच होय! वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण “मी’पणा सोडूनच सहभागी होतो. गरीब-श्रीमंत, सामाजिक भेदभाव विसरून हरिनामाच्या गजरात तल्लीन होतो. या लोकदैवताला विठ्ठल म्हणा…विठोबा म्हणा…किंवा पांडुरंग…”महाराष्ट्राच्या भक्‍तीभाव आणि लोकसंस्कृतीला एकत्र आणण्याचे आद्य प्रतीक’ अशी या विठुरायाची ओळख. … Read more

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे गोल रिंगण; हरिनामाने आसमंत दुमदुमला

नीलकंठ मोहिते इंदापूर : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण सालाबाद प्रमाणे, यंदा बेलवाडी (ता.इंदापूर) येथील संत तुकाराम महाराज स्थळावर तुकोबा – विठ्ठलाच्या जयघोषाने व अश्वंच्या दौडींने, ज्ञानोबा तुकाराम या जयघोशात आसमंत दुमदुमून निघाला. वैष्णवांच्या उत्साहाला आलेले उधान परिसरात चैतन्यमय असलेले वातावरण, आश्वाच्या बरोबरीने धावणारे वैष्णवजन,अश्या उत्साही भक्तीमय वातावरणात, गोल रिंगण सोहळ्यास … Read more

अजित पवारांकडून पालखीचे सारथ्य

बारामती/ जळोची – तुकाराम महाराज यांचा जयघोष करीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कविवर्य मोरोपंतांच्या बारामतीत पोहोचताच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर अजित पवार यांनी रथात बसून पालखी सोहळ्यातील रथाचे सारथ्य केले. पालखी सोहळा बारामती तालुक्‍यातील उंडवडी येथील मुक्‍काम आटोपून बारामती शहरात दाखल … Read more

होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी।।

होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।। काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ।। अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ।। तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ।। वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पंढरी पहा. बाकीचे साधने काय करायची आहेत? सर्व काही फळ यानेच मिळते. असे केल्याने अभिमान नष्ट होतो आणि … Read more

माउलींचे आज सातारा जिल्ह्यात आगमन

लोणंद – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा उद्या दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. यावर्षी जिल्ह्यात पाच मुक्कामांसाठी पालखी सोहळ्याचे आगमन होते आहे. यापैकी पहिला अडीच दिवसाचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. लोणंदमधील मुक्काम आटोपल्यानंतर पुढील मुक्कामासाठी फलटण तालुक्‍यातील तरडगाव हद्दीत माउलींचे पहिले ऊभे रिंगण होऊन संध्याकाळी तरडगाव येथे वैष्णवांचा मेळा … Read more

पराशर ऋषी दिंडी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान; माऊलीच्या जयघोषाने पारनेर दुमदुमले

पारनेर – येथील महर्षी पराशर ऋषी वारकरी सेवा मंडळ व मातोश्री प्रतिष्ठान आयोजित आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच भाऊसाहेब लामखडे व जनाबाई लामखडे या वारकरी दाम्पत्याचा हस्ते प्रस्थान सोहळा पार पडला. तत्पूर्वी नगराध्यक्ष विजय औटी व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सपत्नीक माऊलींच्या पादुकांचे पाद्यपूजन केले. पोलीस … Read more