हर्षोल्हासात बाप्पांचे आगमन; घरोघरी प्रतिष्ठापना, स्वागतासाठी अवघे पुणे शहर सजले

पुणे -“गणपती बाप्पा मोरया…’चा नादघोष मंगळवारपासून पुढचे दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात घुमणार असून, श्रींची प्रतिष्ठापना प्रत्येक घरात, सार्वजनिक मंडळांतर्फे करण्यात येणार आहे. महिनाभरापासूनची सजावटीची तयारी आता पूर्ण झाली आहे. दरम्यान, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच मंगळवारच्या अंगारक योगावर आलेल्या गणेश चतुर्थीला मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मधूर सुरांचे वादन करणारे बॅंडपथकातील वादक कलाकार, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्ते, … Read more

सकाळी 11 वाजेपर्यंत करा गणरायाची प्रतिष्ठापना

पुणे – गणेशोत्सव अवघ्या 24 तासांवर आला आहे. या लाडक्‍या बाप्पांचे मुहूर्तावर आणि यथासांग पद्धतीने स्वागत करण्याची जय्यत तयारी घरोघरी जवळपास झाली आहे. यंदाचे विशेष म्हणजे अंगारक योगावर (मंगळवारी) गणेशाचे आगमन होत आहे. त्यामुळे याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. सूर्योदयापासून सकाळी 11 वाजेपर्यंतचा काळ मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी अत्यंत शुभ आहे. यातही सकाळी साडेसहा ते नऊ … Read more

आज पहिला दिवा…वाचा वसुबारस सणाची माहिती

पुणे  – प्रकाश, मांगल्य आणि उत्साहाचा सण असणाऱ्या दिवाळीला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. गाय आणि वासराच्या पूजेचे महत्त्व असणारा वसुबारस हा दिवाळीच्या दिवसांमधील पहिला दिवा. पूर्वी घरोघरी गाई होत्या. मात्र, सध्या शहरांतील गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी गाय-वासरांच्या पूजेचे आयोजन करण्यात येते.   या दिवशी अनेक जण गायीच्या दूधापासून तयार … Read more