परमवीरसिंह यांच्या विरोधात खंडणीचा चौथा गुन्हा दाखल

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्‍त परमवीरसिंह यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी खंडणी वसुलीचा चौथा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह मुंबईतील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका हॉटेल व्यावसायिकाकडून 11 लाख 92 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. … Read more

Breaking : परमबीर सिंहांनी दोन कोटी स्वीकारले; ‘या’ ६ जणांसह दुसरा गुन्हा दाखल, जाणून घ्या नावे

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज पुन्हा 2 कोटी रूपयांची मागणी केल्याच्या आरोपाखाली परमबीर सिंह यांच्यासह इतर 6 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Maharashtra: Second case of extortion registered against former Mumbai Police Commissioner Param Bir … Read more

मोठी बातमी : परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल, ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. A case of … Read more

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लवकरच ईडीचे समन्स

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांचा तपास ईडीकडून सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ईडीच्या कोठडीत … Read more

परमबीर सिंग यांना पुन्हा दिलासा; 15 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पुन्हा मोठा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंग यांना आता 15 जूनपर्यंत अटक होणार नाही. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ऍट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्हाच्या संदर्भातील सुनावणीत परमबीर सिंग यांना दिलासा मिळाला आहे. अकोला येथे कार्यरत … Read more

परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ ; कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर काही दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर आरोप केले होते. यामुळे काल अकोल्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून परमबीर यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रारीमध्ये अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप केले होते. … Read more

“धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होतोय”; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर याप्रकरणी आता सीबीआयने देशमुख यांच्यासह या प्रकरणात संबंधित असलेल्या इतरांवर गुन्हा दाखल केला असून, देशमुख यांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. याच मुद्दयावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

बाळासाहेब व मुलींची शपथ घेऊन अनिल परबांचे स्पष्टीकरण; भाजप नेता म्हणाला….

मुंबई – परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब पाठोपाठ आता सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी माझे दैवत असलेल्या … Read more

परमबीर सिंह एनआयएच्या कार्यालयात दाखल; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. परमबीर सिंग हे आज सकाळी एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले आहे. … Read more

‘अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नाही, बॉम्बची गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली हे शोधा’

मुंबई – उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्वाचा विषय नाही, ती बॉम्बची गाडी कुणी ठेवली हा महत्वाचा विषय आहे, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. विषय होता … Read more