आई-वडिलांच्या कर्जमाफीसाठी मुलीकडे ‘ती’ मागणी ; नकार दिल्याने आरोपीकडून मुलीवर चाकूहल्ला

डोर्लेवाडी : बारामतीतील एका दाम्पत्याने घेतलेल्या कर्जाच्या मोबदल्यात त्यांच्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर आरोपी तरुणाने चाकू हल्ला करून त्या तरुणीला जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय. गुरुवारी सकाळी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात एका … Read more

satara | आई-वडिलांवर का येते पोटचा गोळा संपविण्याची वेळ ?

दहिवडी, {प्रविण राजे} – ‘आई-वडिलांनी मुलाची केली हत्या’ अशा अनेक घटना महाराष्ट्रातून ऐकायला व बातमीच्या माध्यमातून वाचायला मिळतात. तर कधी कधी ‘मुलानेच केली आई-वडिलांची हत्या’ आशा बातम्या देखील वाचायला मिळतात. मात्र, का घडतात असे प्रकार असा अनेकदा नागरिकांना प्रश्न पडतो. माण तालुक्यातील शिरवली गावात घडलेल्या अशाच दुर्दैवी घटनेमुळे हा सवाल आता सामाजिक पटलावर आला आहे. … Read more

Pune: ओवी सापडली.., पण अर्थ जाणून घ्यावा; शहरातील ‘त्या’ घटनेतून पालकांच्या मानसिकतेचा शोध

जयंत जाधव सिंहगडरस्ता – पुणे शहरामध्ये दोन दिवस समाज माध्यमावर एकच विषय होता, हरवलेली ओवी कधी सापडणार? त्यासाठी पूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. पुणे शहराचे पोलीस आयुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी, सामाजिक कार्यकर्ते ओवीला शोधत होते अखेर त्या रात्री दहाच्या सुमारास ओवी रांजणगावला सापडली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. परंतु, या घटनेतून पौगंडावस्थेतील मुला, मुलींची … Read more

पुणे जिल्हा | पालकांची जबाबदारी स्वीकारा, वृद्धाश्रम बंद होतील

बारामती, (प्रतिनिधी)- वयोवृद्ध आईवडिलांची जबाबदारी स्वीकारून पालन पोषणाची सेवा करा. वृद्धाश्रम बंद होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. ढेकळवाडी (ता. बारामती) येथे चंद्रभागा हगवणे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजीत किर्तन निरूपम कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आई वडिलांची सेवा केल्यामुळे तुमचे संस्कार तुमच्या मुला मुलीवर होऊन तुम्हच्या म्हातारपणी … Read more

मतदानाच्या आवाहनासाठी एक लाख विद्यार्थ्यांची पालकांना पत्रे

गुवाहटी – आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आसाममधील एक लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रे पाठवली आहेत. आसाममधील कामरुप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी ही पत्रे पाठवली आहेत. पत्रे पाठवणारे हे विद्यार्थी कामरुप जिल्ह्यातील ५२६ शैक्षणिक संस्थांमधील इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी आहेत. आपल्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी आवर्जुन मतदान करावे, असे आवाहन या मुलांनी पत्राद्वारे आपल्या पालकांना केले … Read more

satara | आई-बाबा, कृपया मतदान करा

फलटण, (प्रतिनिधी) – आपल्या देशातील लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ होण्यासाठी, आई आणि बाबा, प्लीज मतदान करा, असे आवाहन तडवळे, ता. फलटण येथील विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे केले आहे. ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी तडवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच कार्यक्रम झाला. आपली लोकशाही जगप्रसिद्ध आहे. ही लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी अवश्य मतदान करा, असे आवाहन चिमुकल्यांनी आपल्या पालकांना … Read more

अल्पवयीन मुलाच्या हातात दुचाकी देणे पालकांना पडले महागात; पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : अल्पवयीन मुलाला दुचाकी चाविण्यासाठी देणे हे पालकांना चांगलेच महागात पडले आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्या बद्दल मोटर वाहन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. धूलिवंदनच्या दिवशी अनेक ठिकाणी मद्यपान करून अनेकजण वाहने चालवत असतात. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचे सूचना पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिल्या … Read more

पुणे | कागदावर उमटले विद्यार्थी, पालकांचे कल्पनाविश्व

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवीच्या शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील ७० शाळांतील १,५०० विद्यार्थी, शिक्षक व पालक स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन आमदार रवींद्र धंगेकर ‌यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी दिव्या चव्हाण, … Read more

PPC 2024: पीएम मोदींशी बोलण्यासाठी तयार व्हा, 29 जानेवारीला ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम

नवी दिल्ली – 29 जानेवारी 2024 रोजी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी केल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पीएम मोदींशी बोलण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि शिक्षकांनाही या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल – शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी पीपीसी कार्यक्रम आयोजित केला … Read more

मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; मुलीच्या नातेवाईकांकडून वीजेच्या खांबाला बांधून मारहाण

सांगली – मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना भोगावी लागल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील शिराळा तालुक्यातील ही घटना आहे. प्रेम प्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना वीजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाम करण्यात आली. मारहाणीत मुलाचे वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी १२ जणांविरोधात … Read more