पुणे जिल्हा : पारगावात कांद्याची वखार खाक

गुऱ्हाळाच्या जळणाला आग : बारा लाखांचा फटका पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथील शेतकरी जालिंदर लक्ष्मण ताकवणे यांच्या गुऱ्हाळघराला जळण म्हणून वापरण्यात येणाऱ्या चोत्रीच्या मोठ्या दोन गंजीला आग लागली. गंजीसह काही अंतरावर असणाऱ्या कांद्याच्या वखारीचे यात नुकसान झाले आहे. ही घटना (दि.१) रोजी सकाळी १० वाजता घडली. जालिंदर ताकवणे यांचा अनेक वर्षांपासून गुऱ्हाळघराचा व्यवसाय आहे. … Read more

पुणे जिल्हा : पारगावत एसी, कुलरची विक्रमी विक्री

होरपळलेल्या ग्राहकांचा कल पारगाव – यंदा उन्हाचा पारा ४० पार जाऊन उन्हाळा असाह्य होऊ लागल्याने दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांचा घरात एसी व कुलर बसविण्याचा कल वाढला आहे. यापूर्वी कधी नाही ते यावर्षी इलेक्ट्रॉनिकच्या दुकानांत एअर कंडिशनर विक्रीचा विक्रम झाला आहे. दरम्यान, पारगाव येथील तीन दुकानांतून सरासरी चारशे एसी, कुलरची विक्री झाली आहे. यावर्षी सूर्याने … Read more

पुणे जिल्हा | पारगावच्या बारावीच्या केंद्रावर दिली ४५२ विद्यार्थ्यांनी इंग्रजीची परीक्षा

पारगाव शिंगवे, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील श्री संगमेश्वर माध्यमिक व कै. बाबुराव गेणुजी ढोबळे उच्च माध्यमिक कला, वाणिज्य, विज्ञान विद्यालयात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या लेखी परीक्षेला ४५२ विद्यार्थी बसले होते. पारगाव येथील विद्यालयातील इयत्ता बारावी परीक्षा केंद्र क्रमांक- ०१४३ मधील परीक्षा केंद्रात पाच, शाळेतील … Read more

पुणे जिल्हा | बालचमूंच्या नृत्याविष्काराला ८९ हजारांची देणगी

पारगाव, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पारगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगाव शाळेस ग्रामस्थांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारास उत्स्फूर्तपणे ८९ हजारांची देणगी दिली. ही देणगी विद्यार्थी हितासाठी वापरणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा गुंड यांनी दिली. नानगावमध्ये नर्सरी व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये पोवाडा, लोकनृत्य, फनी डान्स, देशभक्तीपर … Read more

पुणे जिल्हा : पारगावात कांदा ओतून निदर्शने

दूध उत्पादक शेतकरी संतापले पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शिरूर सातारा रोडवर दूध व कांदे ओतून शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. काही काळ रस्ता अडवून दूध व कांदे रस्त्यावर ओतून उपस्थित मंडल अधिकारी परदेशी व गावकामगर तलाठी रामकृष्ण वेताळ यांना निवेदन देण्यात आले. शेतीसाठी १२ तास विनाखंडित वीजपुरवठा … Read more

पुणे जिल्हा : पारगावात वर्गमित्रांकडून माणुसकीची ओंजळ रिती

कमवता मित्रच हरपल्याने कुटुंबाला मदत : अनोखी भाऊबीज पारगाव –दीपावली उत्सव हा आनंदाचा क्षण. परंतु तो अनेक कुटुंबांना काही कारणांमुळे साजरा करता येत नाही, अशीच एक घटना नुकतीच पारगावात घडली. कमवती व्यक्‍ती हरपल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आपल्या वर्गमित्राच्या कुटुंबासाठी सर्व मित्र मदतीसाठी धावून गेले. कुटुंबाला 16 हजारांची मदत करीत भाऊबीजेला अनोखी भेट दिली. वर्गमित्रांकडून … Read more

पुणे जिल्हा : पारगावात बहरला झेंडूचा महासागर

12 एकर 20 गुंठ्यावर 70 हजार रोपांची लागवड पारगाव – पारगाव (ता. दौंड) येथील कृषी पदवीधारक शेतकऱ्याने झेंडूची 12 एकर 20 गुंठे क्षेत्रात लागवड केली असून, नवरात्रीमध्ये हा झेंडू भाव खाणार असून, कोटींच्या घरात याचे अर्थकारण फिरणार आहे. पारगाव येथील शेतकरी सर्जेराव शिवाजीराव जेधे यांनी त्यांच्या शेतात 70 हजार झेंडू रोपांची लागवड केली असून, त्यांच्या … Read more

सातारा – पारगाव येथे युवकाची आत्महत्या

खंडाळा – पारगांव (ता. खंडाळा) येथे एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अधिक माहिती अशी, की केसुर्डी येथील एका कंपनीमध्ये काम करणारा युवक विनायक संजय पडवळ (वय 22, सध्या रा. पारगांव, मूळ रा. येरफळे, ता पाटण) या युवकाने भाडेतत्त्वावर राहत असलेल्या घरात दोरीने फास लावून आत्महत्या केली. रूममध्ये राहणारे इतर मित्र कंपनीत कामासाठी … Read more

पुणे जिल्हा: पारगावात दाम्पत्याची आत्महत्या; दौंड तालुका झाला सुन्न

पारगाव – दौंड तालुक्‍यातील पारगाव येथील भीमा नदीपात्रात सात जणांचे हत्याकांड प्रकरण ताजे असताना गावात दाम्पत्याने आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळले. या घटनेने संपूर्ण दौंड तालुका सुन्न झाला आहे. भालचंद्र ऊर्फ विकास पोपट जगताप (वय 42) व जयश्री भालचंद्र ऊर्फ विकास जगताप (वय 35), असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी … Read more

पुणे जिल्ह्यातील ‘या’ भागात 3 दिवसांत आढळले ‘इतके’ मृतदेह, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पारगाव – पारगाव (ता. दौंड) येथील भीमा नदी पुलाखाली तिसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर मिळालेले मृतदेह हे आत्महत्या की हत्या हे मोठे आव्हान यवत पोलीस यंत्रणे पुढे आहे. दरम्यान, मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. भीमा नदी पुलाखाली बुधवारी (दि. 18) एक महिलेचे शुक्रवारी (दि. 20) एक पुरुषाचे मृतदेह पोलिसांनी … Read more