पंतप्रधान संसदेत आल्यावर घोषणाबाजी करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन…

parliament – विरोधी पक्ष जर संसदेत नसतील तर त्या संसदेला (parliament) काहीच अर्थ राहत नाही आणि संसदेचे कामकाज विना अडथळ्यांचे व्हायचे असेल तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या सहमती झाली पाहिजे असे मत लोकसभा सचिवालयाचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांनी व्यक्त केले. संसदेत कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करण्यास मनाई आहे. अगदी पंतप्रधान सभागृहात आल्यावर घोषणा … Read more

संसदेतून विरोधी पक्षांचे ७८ खासदार एकाच दिवशी निलंबित; ५ दिवसांत ९२ खासदारांवर निलंबनाची कारवाई

नवी दिल्ली – संसद सुरक्षा भेदल्याच्या घटनेवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारीही दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. गदारोळाबद्दल दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांच्या खासदारांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला. त्यातून लोकसभेतील ३३ आणि राज्यसभेतील ४५ सदस्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे एकाच दिवशी संसदेतून ७८ खासदार निलंबित होण्याची अभूतपूर्व घडामोड घडली. दरम्यान, मागील ५ दिवसांत … Read more

दिल्ली पोलिसांनीच संसदेवरील हल्ल्याचे ‘दहशतवादी हल्ला’ असे वर्णन केले; के. सी. वेणुगोपाल यांचा दावा

नवी दिल्ली – संसदेवर झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला होता असे दिल्ली पोलिसांनीच संबोधित केले असून त्यांनीच याचे राजकारण सुरू केले आहे. विरोधी पक्षांनी याचे राजकारण केलेले नही असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. आज कॉंग्रेस मुख्‌यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताा ते म्हणाले की, अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली पोलिसांनीच आपल्या अहवालात … Read more

संसदेत पोहचू शकलो नसतो तर, प्लॅन बी तयार होता…; सूत्रधाराची पोलिसांना माहिती

नवी दिल्ली – संसदेच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत आता अनेक धक्कादायक बाबी पढे येत आहेत. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याने पोलिसांना उलट तपासणीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. संसदेत शिरण्याची योजना अयशस्वी झाली असती तर गुन्हेगारांकडे बॅकअप प्लॅन अर्थात प्लॅन बी तयार होता, असे झा याने पोलिसांना सांगितले असल्याचे समजते. दिल्ली पोलिसातील सूत्राने … Read more

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींकडून ‘पंतप्रधान बेपत्ता’ असल्याची पत्रके जप्त ; बक्षीसाचाही पत्रकात होता उल्लेख

Parliament Security Breach : संसद भवनाच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी चार आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयाने हजर केले. न्यायालयाने चारही आरोपींना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला सात दिवसांची कोठडी दिली. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, हा सुनियोजित कट होता आणि भारतीय संसदेवरचा हल्ला होता. दरम्यान, या प्रकरणी सरकारी वकिलांनी माहिती दिली. यावेळी बोलताना, आरोपींनी एक … Read more

Parliament Security Breach : संसदेत घुसण्यासाठी आरोपींनी ‘असा’ रचला कट ; सर्व आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा

Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. सभागृहाच्या कामकाजादरम्यान लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन लोकांनी उडी मारून धुराचे लोट पसरवून गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणावरून विरोधक केंद्रावर हल्लाबोल करत आहेत. संसदेच्या सुरक्षेबाबत सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान. संसदेतल्या खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडून सुरक्षा दलांच्या ताब्यात दिले. … Read more

Parliament News : ‘नव्या संसदेत श्‍वास घुसमटतोय, चक्रव्यूहात अडकल्यासारखे वाटते…’; काँग्रेसच्या जबाबदार नेत्याचं विधान चर्चेत !

नवी दिल्ली – संसदेच्या (Parliament) जुन्या इमारतीला एक आभा होता आणि संवाद साधणे सोपे होते. मध्यवर्ती हॉल आणि कॉरिडॉरमध्ये एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये जाणे सोपे होते. नव्या संसदेत (Parliament) सभागृह चालवण्यासाठी दोन्ही सभागृहांमधील बंध कमकुवत झाला आहे. जुन्या इमारतीत मोकळेपणा जाणवत होता, तर नवीन इमारतीत बंदिस्त जागेमुळे श्‍वास घुसमटल्याची अथवा जीव गुदमरल्याची भावना होत आहे, … Read more

Parliament : नव्या संसदेचा आजपासून श्रीगणेशा; शास्त्रज्ञ आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या….

नवी दिल्ली – गणेश चतुर्थीपासून (Ganpati utsav) म्हणजेच 19 सप्टेंबरपासून संसदेच्या (Parliament) नवीन इमारतीत अधिवेशनाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. 18 सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनात विशेष सत्रादरम्यान ही घोषणा करण्यात आली. जुन्या संसद भवनाच्या (Parliament) इमारतीचा आकार गोलाकार होता, तर नव्या संसद भवनाचा आकार पंचकोनी आहे. या नव्या रचनात्मक संसद भवनाच्या इमारतीचे तपशील जाणून … Read more

Parliament : नव्या संसदेसाठी ड्रेस कोडही नवा.! कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर ‘कमळ’

नवी दिल्ली – संसद (Parliament) कर्मचाऱ्यांच्या नवीन गणवेशावर भाजपचे निवडणूक चिन्ह “कमळ’ छापले जात असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवताना त्यांनी “संसदेला (Parliament) एकतर्फी आणि पक्षपाती गोष्ट” बनवल्याचा आरोप केला आहे. लोकसभेतील कॉंग्रेसचे व्हिप मणिकम टागोर यांनी कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील कमळ चिन्हाला जोरदार आक्षेप घेतला आहे. फक्‍त कमळ का? मोर का नाही … Read more

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर होणार नव्या संसदेचा “श्रीगणेशा’; पहिला दिवस जुन्या संसद, नंतर….

नवी दिल्ली – 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसद भवनातील कामकाजाचा शेवटचा दिवस असेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी 19 सप्टेंबर रोजी संसद नवीन इमारतीत हलवण्यात येणार आहे. 28 मे रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. संसदेच्या नव्या इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे “लोकशाही संग्रहालय’मध्ये रूपांतर करण्यात … Read more