satara | लंके समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला

पारनेर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी विजय मिळवला. या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण तापले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे नीलेश लंके समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यात झावरे जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर पारनेर तालुक्यात … Read more

nagar | कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले

पारनेर, (प्रतिनिधी) – कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा विभागामार्फत दि.३०रोजी दुपारी चार वाजता उन्हाळी आतर्वन सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मा.आ. नीलेश लंके यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठपुरावा केला होता. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतामधील विशेषतः जनावरांच्या चाऱ्याची पिके, फळबागा, इतर शेतमाल जळण्याची भिती निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे … Read more

nagar | विद्याधामच्या मुली अव्वल, शंभर टक्के निकाल

पारनेर , (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम कला कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला. पहिले तीनही क्रमांक पटकावत मुली अव्वल ठरल्या आहेत. या परीक्षेत वैष्णवी दीपक घेगडे हिने ७४. १७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. धनश्री संजय शेळके हिने ७० .३३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. मानसी जालिंदर बनकर … Read more

nagar | विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा, महावितरणविरोधात नागरिक संतप्त

पारनेर, (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. या दरम्यान परिसरात विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा उडाला असून, महावितरणविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे १० ते १२ गावांचे केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात गेल्या दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले … Read more

satara | वादळी वाऱ्यात शाळेच्या आवारातील झाड कोसळले

पारनेर, (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या आवारातील भले मोठे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले.चौकोनी आकाराची प्रशालेची इमारत असून आवारात विद्यार्थ्यांना सावली मिळावी, यासाठी झाडे लावलेली आहेत. पण ही जंगली झाडे आता खूप वाढलेली असून अधूनमधून त्याच्या फांद्या तुटून खाली पडतात. त्यामुळे ही झाडे धोकादायक बनली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या बाबतीत … Read more

nagar | वारकरी संप्रदायातून सुख, समृद्धीचे विचार

पारनेर, (प्रतिनिधी)- वारकरी संप्रदाय सर्व मानव जातीच्या सर्वांगीण कल्याणासाठी तसेच सुख समाधान प्राप्त करण्याचे विचार शिकविणारा असल्याचे प्रतिपादन हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांनी सोबलेवाडी येथे आयोजित अखंड त्रिदिणीनाम जप व हनुमान जन्म उत्सव सोहळा प्रसंगी केले. या काल्याच्या सोहळ्याप्रसंगी हभप दगडू महाराज शेळके, हभप देवराम धोंडीभाऊ शेरकर, मृदंगसम्राट आदिनाथ महाराज गलधर, हभप कैलास महाराज शिंदे, … Read more

nagar | पारनेर तालुक्यात गुरूदेव शाळा अव्वल

पारनेर (प्रतिनिधी) – लक्षवेध फाउंडेशन संचलित लक्षवेध या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेची नुकतीच गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी नजीकच्या गुरुदेव प्रशालेच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. गुरुदेव प्रशालेतील इयत्ता पहिलीतील तब्बल १६ व दुसरीतील एक, अशा एकूण १७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. नगर, पुणे, बीड, नाशिक, जळगाव या … Read more

nagar | न्यू इंग्लिश स्कूलच्या सोंडकर, सोबल, शिंदे यांना शिष्यवृत्ती

पारनेर, (प्रतिनिधी) – येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात एनएमएमएस परीक्षेत बसलेल्या 86 विद्यार्थ्यांपैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. 42 विद्यार्थी हे सार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब करंजुले यांनी दिली. पारनेर येथील इंग्लिश स्कूल विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जाते. त्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी कशी केली … Read more

nagar | प्रलंबित प्रश्नांवर भविष्यात लढा उभारावा लागेल – शिवाजीराव खांडेकर

पारनेर (प्रतिनिधी) – जूनअखेर सेवक संच निश्चिती होऊन शिक्षकेतर सेवकांची भरती होइल, असे आश्वासित करत शिक्षकेतर सेवकांच्या प्रश्नांसह कंत्राटीकरण, जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर भरती, आश्वसित प्रगती योजना या प्रलंबित प्रश्नावर भविष्यात लढा उभारावा लागेल. त्यासाठी सर्वांनी संघटनेच्या पाठीशी ताकतीनिशी उभे रहावे, असे आवाहन शिवाजीराव खांडेकर यांनी केले पारनेर तालुका शिक्षकेतर संघटना व जिल्हा संघटना यांचे … Read more

nagar | ग्रामपंचायतींमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा होणार कार्यान्वित

पारनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या प्रयत्नातून ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व समन्वय बैठकीचे सुपा पोलीस स्टेशन येथे आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना … Read more