पाटण तालुक्यात 138 मतदारांनी केले ‘टपाली’ मतदान

कोयनानगर (सातारा) – वृद्ध  व दिव्यांग व्यक्तींनी लोकसभा निवडणुकीत टपाली मतदानाला उत्तम प्रतिसाद दिला. या दोन्ही प्रवर्गाच्या 138 मतदारांनी मतदान करुन मतदानाची प्रक्रिया घरपोच मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले. भारतीय निवडणूक आयोगाकडून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ‘घरातून मतदान’ या विशेष उपक्रमाद्वारे या योजनेचा लाभ घेवून मतदान केले. पाटण विधानसभा मतदारसंघात 224 ज्येष्ठ नागरिक व 53 दिव्यांग … Read more

पाटण तालुक्यात पर्यटन विकासाची ६७ कोटी रुपयांची कामे होणार

– विजय लाड कोयनानगर – सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्यातून पाटण तालुक्यात तब्बल ६७ कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावून तालुक्यातील पर्यटनवाढीला चालना देण्यात येणार आहे. यामुळे निसर्गसंपन्न असणारे कोयना व पाटणचे पर्यटन समृध्द होणार आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दि. २२ … Read more

पाटण तालुक्‍यात पावसाचा कहर; धरणातून पाणी सोडल्याने कोयना नदीला पूर

पाटण – पाटण तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी पायथा वीजगृहातून 1050 क्‍युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीला पूर आला आहे. मुळगाव येथील पूल पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास … Read more

सातारा: एकाच कुटुंबातील चौघांचे राहत्या घरी आढळले मृतदेह; ढेबेवाडी परिसरासह पाटण तालुका हादरला

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील सणबूर येथे गुरुवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरी झोपलेल्या स्थितीत मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ढेबेवाडी परिसरासह पाटण तालुका हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केली की, त्यांच्या मृत्यूमागे काही … Read more

पाटण तालुक्यात गुटख्यासह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

मल्हारपेठ – अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीस पाटण पोलिसांनी गव्हाणवाडी (ता. पाटण) गावाच्या हद्दीत पकडले. त्याच्याकडून पाच गोणी गुटखा, रोख रक्कम, वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी असा एकूण ३ लाख २५ हजार ७९० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील मोरगिरी भागात गुटखा विक्रीसाठी एक गाडी येणार असल्याची माहिती … Read more

पाटणमध्ये “बॉबी” विक्रेत्याचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून

पाटण (प्रतिनिधी) – पाटण तालुक्यात अनेक वर्ष “बॉबी”चा व्यवसाय करणारा मूळचा तामिळनाडू येथील परंतु पाटण तालुक्याच्या परिसरात आण्णा नावाने परिचित असलेल्या रमण तेवर ऊर्फ आण्णा याच्यावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात लोखंडी रोड घालून हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने रमण तेवर ऊर्फ आण्णाचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटणच्या पूर्वेस असणाऱ्या म्हावशी पेठ … Read more

सातारा: पाटण तालुक्यात दुचाकींच्या धडकेत तिघांचा मृत्यू

मल्हारपेठ  (सातारा)- पाटण तालुक्‍यातील सांगवड पुलानजीक नाडे गावच्या हद्दीत काल (दि. 22) रोजी रात्री नऊच्या सुमारास दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण आपघातात तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. नितीन बबन तिकुडवे (वय 36, रा. शिदेवाडी ता. पाटण), भरत रामचंद्र पाटील (वय 43) व बबन धोंडीराम पडवळ (वय 70, दोघेही रा. येरफळे … Read more

पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

ढेबेवाडी(प्रतिनिधी):- रवले- सुतारवाडी (ता. पाटण) येथे सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहेत. याप्रकरणी पाटण पोलिसांनी संशयित नराधमाला ताब्यात घेतले असून या घटनेने पाटणसह सातारा जिल्हा आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संतोष थोरात याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेने रवले- सुतारवाडीसह ढेबेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण … Read more

पाटण तालुक्‍यातील 11 हजार एकर क्षेत्रही

कोयनेच्या पाण्यामुळे सिंचनाखाली नाही विक्रमबाबा पाटणकर यांची टीका; सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार कराड (प्रतिनिधी) – पाटण तालुक्‍यातील सुमारे दीड लाख हेक्‍टर सिंचन क्षेत्रापैकी कोयना धरणाच्या पाण्यातून 11 हजार एकरही क्षेत्र सिंचनाखाली नाही. तालुक्‍यातील बंधारे, तलाव तसेच धरणात गेलेल्या जमिनींएवढेही क्षेत्र सिंचनाखाली आलेले नाही. तालुक्‍यातील लोक सोशिक असून या सोशिकतेला आजपर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, अशी टीका … Read more

पाटण तालुक्यातील 86 गावे पाणीटंचाईग्रंस्त

पाटण (प्रतिनिधी) – मे महिन्याच्या अखेरीला पाणी टंचाई जाणवू लागल्याने पाटण तालुक्यातील 86 गावांचा संभाव्य पाणी टंचाईचे प्रस्ताव येथील प्रांत कार्यालयाकडे प्राप्त झाल आहे. सध्या चार टॅंकरव्दारे पाणी टंचाई असणाऱ्या तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा केला जात असून प्रस्ताव प्राप्त झालेल्या गावांना पाणी पुरवठा करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. संपूर्ण मे महिना व जूनच्या 15 तारखेपर्यंत कडक उन्हाळा भासणार असल्याने पाणीटंचाई अधिक भीषण होण्याची शक्यता आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त 86 गावांचा पाणी प्रस्ताव आला आहे. यात कोकीसरे, किल्लेमोरगिरी, झाकडे, मालोशी, मुरुड, आबंळे, … Read more