Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने शुक्रवारी पक्षाच्या लोकसभा खासदार प्रनीत कौर यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून निलंबित केले आहे. त्यांना पक्षविरोधी कारवायांसाठी आपली पक्षातून हकालपट्टी का करू नये, याचे तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव तारिक अन्वर यांनी सांगितले की, पंजाब कॉंग्रेसचे प्रमुख अमरिंदर राजा वॉरिंग आणि इतर नेत्यांकडून आलेल्या … Read more

Patiala Violence : हिंसाचारानंतर पटियालामध्ये इंटरनेट सेवा बंद

पंजाबमधील पटियाला येथे खलिस्तानींच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चावरून हिंसाचार उसळला होता. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान आज पटियालामध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी ‘खलिस्तानविरोधी मोर्चा’वरून दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. Patiala | Morning visuals from outside … Read more

Patiala | आणखी एका कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या

चंदीगड – पतियाळातील पंजाब विद्यापीठासमोर एका कबड्डीपटूची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र सिंह असे हत्या करण्यात आलेल्या कबड्डीपटूचे नाव आहे. गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची गेल्या महिन्यापासूनची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी जालंधरमध्ये संदीप सिंह नानगल या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूचीही अशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. धर्मेंद्र याच्या … Read more

कॅप्टन अमरिंदर सिंग पटियालामधूनच निवडणूक लढवणार: सिद्धूसाठी सोडणार नाही मैदान, ट्विटरवर केले जाहीर

पटियाला – पंजाबमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षादरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 2022 मध्ये पटियालामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी पटियाला व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवणार नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीट करत हा निर्णय जाहीर केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना ही … Read more

धक्कादायक ! पंजाबमध्ये निहंगा टोळक्याने पोलिसांचा तलवारीने हात कापला

नवी दिल्ली : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाउनची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. अशातच पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहे. पंजाबमध्येही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्याने कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने हातच कापला. यात इतर दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पटियाळातील भाजी मंडई … Read more

ऍथलेटिक्‍स स्पर्धा प्रेक्षकांविनाच होणार…

नवी दिल्ली – भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने यंदा होत असलेल्या दोन्ही इंडियन ग्रांप्री ऍथलेटिक्‍स स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे जाहीर केले आहे. पहिली स्पर्धा येत्या 20 मार्च तर, दुसरी स्पर्धा 25 मार्च 2020 रोजी पतियाळातील साई एनएस-एनआयएस संकुलातच होतील, असेही महासंघाने स्पष्ट केले आहे. करोना विषाणूंचा धोका लक्षात घेता प्रेक्षकांना, खेळाडूंच्या कुटुंबीयांना तसेच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश … Read more

#पटियाला _लोकसभा_2019 : परनीत कौर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पत्नी आणि पटियाला लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार परनीत कौर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते व पदाधिकारी उपस्थित होते. Patiala: Preneet Kaur, Congress candidate from Patiala & wife of Punjab Chief Minister Captain Amarinder Singh, files her … Read more