पिंपरी | पवना शिक्षण संकुलात एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम

पवनानगर, (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक विद्यार्थी, एक वृक्ष लागवड व संवर्धन या अभिनव उपक्रमाची सुरुवात पवना शिक्षण संकुलात करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेशभाई शहा, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे आदी उपस्थित होते. संस्थेच्या सर्व शैक्षणिक … Read more

पिंपरी | विद्यार्थ्यांच्या शोधासाठी शिक्षक पालकांच्या दारी

पवनानगर, {नीलेश ठाकर} – मराठा आरक्षण सर्व्हेक्षणानंतर लोकसभा निवडणुकीचे काम शिक्षकांना लागले. ते काम नुकतेच संपल्‍यावर जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकवर्गाची धावपळ सुरू झाली आहे. सर्वत्र शाळा प्रवेशप्रक्रियेला सुरवात झाली आहे. पालक पाल्यांसाठी चांगली शाळा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर बहुतेक शाळांचे शिक्षक मात्र शाळेत विद्यार्थिसंख्या वाढविण्यासाठी तळपत्या उन्हात घरोघरी भटकंती करीत असल्याचे चित्र … Read more

पिंपरी | निवडणूक होताच फूल बाजार कोमजला

पवनानगर, (वार्ताहर) – संपूर्ण महाराष्ट्रात यंदा पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे पिकांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे त्याचा फुलाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे; मात्र तरीही यंदा निवडणूक व लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी होती. कार्यालयांचे उद्‌घाटन, नेत्यांचे स्वागत, सभा, आणि नेत्यांच्या स्वागतासाठी फुलांची मागणी वाढली होती. या वाढत्या मागणीमुळे फुलांच्या दरातदेखील वाढ झाली होती. … Read more

पिंपरी | भिती ना आम्‍हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

पवनानगर, {नीलेश ठाकर} – वादळ वाऱ्याचा हवामानाचा इशारा. मावळच्‍या लाल मातीतील शेतात काडीकचऱ्यावर पोट भागविणाऱ्या हजार मेंढ्या. खतावणीसाठी शेतात बसलेल्या. राखणीला घनगर कुटुंबातील आजोबांपासून लहान मुले, बाया बापडे, गुरुवारी सायंकाळी वादळ वाऱ्याने अचानक फेर धरला. डोईवरचा कापड दूर सरला. विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट. अंगाचा थरकाप उडविणारा पाऊस कोसळला. आभाळाखाली थाटलेला संसार अंगावरचे कपडे पिळत … Read more

पिंपरी | पाण्‍याच्‍या मागणीसाठी मतदानावर बहिष्‍कार

पवनानगर, (वार्ताहर) – गावातील नळपाणी योजना बंद असल्‍याने मावळ तालुक्‍यातील आर्डव गावातील महिलांनी आज मतदानावर बहिष्‍कार घातला. तसेच डोक्‍यावर हंडा घेऊन त्‍यांनी निदर्शनेही केली. सध्‍या कडक उन्‍हाळा असल्‍याने पाण्‍याच्‍या वापरामध्‍ये वाढ झाली आहे. मावळ तालुक्‍यातील आर्डव गावातील नळपाणी योजना गेल्‍या १५ दिवसांपासून बंद आहे. ही बाब महिलांनी ग्रामपंचायतीच्‍या निदर्शनास आणली. मात्र ग्रामपंचायतीने सोयीस्‍कररित्‍या याकडे दुर्लक्ष … Read more

पिंपरी | मावळच्‍या रानमेव्‍याची शहराच्‍या गल्‍लीबोळात आरोळी

पवनानगर {नीलेश ठाकर} – पवन मावळातील जंगल परिसरात फुललेला रानमेवा घेऊन येणाऱ्या डोंगरी भागातील नागरिकांच्या आरोळ्यांनी शहरी भागामधील गल्लीबोळ दुमदुमत आहेत. डोंगरी भागातील रहिवाशांमुळे जांभळे, करवंदे, आंबोळी, आळू व इतर रानमेव्यांची चव चाखण्याची संधी मावळकरांना उपलब्ध होत आहे. या रानमेव्याच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नामुळे डोंगरी भागातील अर्थकारणास चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. मावळ तालुका निसर्ग … Read more

पिंपरी | पशूधन घटल्‍याने शेतखताची टंचाई

पवनानगर, {नीलेश ठाकर} – रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरला आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता सुधारावी, यासाठी शेतकरी आता पुन्‍हा शेणखताचा वापर अधिक करू लागले आहेत. मावळ तालुक्‍यात सध्या खरड छाटणी झालेल्या शेताला शेणखतांची मात्रा दिली जात आहे. सोन्याच्या दराला ७३ हजार रूपयांची झळाळी मिळाली आहे. तशीच सुवर्ण झळाळी शेणखताला यंदा मिळताना दिसत आहे. आठ … Read more

पिंपरी | दीप वंदनेने शिवाजी महाराज यांना अभिवादन

पवनानगर (वार्ताहर) – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 344 वी पुण्यतिथी, अभिवादन कार्यक्रम चैत्र पौर्णिमेला झाला. हजारो दिव्यांनी शिवसमाधी व जगदीश्वर मंदीर परिसर उजळून निघाला होता. त्यामुळे वातावरण शिवमय झाले होते. मंगळवारी (दि. २३) सकाळी जगदीश्वर मंदिरात महापूजा, हनुमान जयंतीनिमित्त कीर्तन व राजदरबारात श्री शिवप्रतिमापूजन … Read more

पिंपरी | मावळमधील झाडांना फणसाचा बहर

पवनानगर (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडे फणसांनी बहरलेली आहेत. झाडांवर लागलेले फणसांचे फड पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. व्यापार किंवा व्यवसायासाठी इतर शेतीमालाप्रमाणे फणसाची लागवड केली जात नाही. त्यामुळे, नैसर्गिकरित्या प्राप्त झालेल्या फणसाच्या विक्रीतून काही शेतकरी चांगली कमाई करत असतात. असेच नैसर्गिकरित्या तालुक्यातील डोंगर भागातील मोरवे, कोळेचाफेकर, आपटी, गेव्हंडे, आजिवली, चावसर, … Read more

पिंपरी | पक्षांच्‍या घरट्यात प्लास्टिकचा शिरकाव

पवनानगर, {नीलेश ठाकर} – नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने पक्षीही नवीन बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ घरट्यांच्या जागा नव्हे तर घरटे बांधणाऱ्या साहित्यातही बदल झाले असल्‍याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे. प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांची छोटी झाकणे, त्याच्यावरील छोट्या रिंग, बुटाच्या नाड्या, नायलॉनचे धागे, कपड्यांची बटणे, चष्म्याच्या काड्याही घरट्यांमध्ये शिरल्या आहेत. पुरेसे नैसर्गिक साहित्य मिळत नसल्याने तडजोड … Read more