Teacher Recruitment: ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी 1 लाख 26 हजार उमेदवारांची नोंदणी

पुणे – राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे (pavitra portal) शिक्षक भरती (Teacher Recruitment) करण्यात येणार असून या पोर्टलवर आत्तापर्यंत 1 लाख 26 हजार 453 उमेदवारांनी ऑनलाईन स्व-प्रमाणपत्र भरुन नोंदणी केली आहे. उर्वरित उमेदवारांनाही नोंदणची संधी मिळावी यासाठी येत्या 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2 लाख 16 हजार 443 … Read more

पुणे : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती नको

पुणे  – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेले पवित्र पोर्टल रद्द करावे व पूर्वीप्रमाणेच प्रचलित पद्धतीने भरती करण्यास शिक्षण संस्थांना परवानगी द्यावी यासह इतर प्रलंबित प्रश्‍न सोडवावेत, असा आग्रह महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत धरला. मुंबई येथे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण व शालेय शिक्षण विभागाच्या … Read more

शिक्षक भरती लवकरच; शिक्षणमंत्र्यांची माहिती

पुणे – शिक्षक भरती पवित्र पोर्टल माध्यमातूनच होणार आहे. मध्यंतरी एसईबीसी संवर्गास स्थगिती दिल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. एकूण 6 हजार शिक्षकांची पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकूण 6 हजार शिक्षकांची पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. … Read more

शिक्षक भरतीचा नव्या वर्षात सोक्षमोक्ष

4 हजार 500 पदांवरील भरती रखडली : प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षाच काहीना काही कारणांनी प्रक्रियेत विघ्न – डॉ. राजू गुरव पुणे – पवित्र पोर्टलद्वारे शाळांमध्ये 4 हजार 500 शिक्षकांची भरती पूर्ण करण्याचा टप्पा राज्य शासनाच्या वित्त विभागाने ग्रीन सिग्नल न दिल्यामुळे रखडला आहे. त्यातच पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता … Read more

‘पवित्र’ रद्द करा; शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्या

राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा शासनाकडे आग्रह पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल रद्द करावे व शाळांना शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्यावे, असा आग्रह राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाकडे धरला आहे. प्रलंबित प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालय बाबतच्या विविध घटकांवर परिस्थितीवर विचार विनिमयासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण … Read more

बी.एड. उत्तीर्ण उमेदवारही प्राथमिक शिक्षक

इयत्ता पहिली ते पाचवीला शिकविण्यासाठी पात्र ठरणार : औरंगाबाद खंडपीठ पुणे – राज्यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्याआठी बी.एड. उत्तीर्ण उमेदवारांना पात्र ठरविण्यात येणार आहे. या उमेदवारांना नोकरीला लागल्यानंतर ब्रीज कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिला आहे. नगर येथील योगेश मैद यांनी खंडपीठात राज्य शालेय … Read more

पवित्र पोर्टलद्वारेच्या शिक्षक भरतीसाठी विशेष परवानगी मिळवण्यासाठी धडपड

पुणे : राज्यात पवित्र पोर्टलद्वारेच्या शिक्षक भरतीसाठी सव्वा वर्षापासून प्रक्रिया सुरु आहे. शिक्षक भरतीसाठी पूर्वीच सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शाळांमधील शिक्षक भरतीचा टप्पा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षक भरती साठी शासनाकडून विशेष परवानगी मिळवण्यासाठी शिक्षण विभागाने धडपड सुरु केली आहे. यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या मार्फत राज्य शासनाकडे … Read more

करोनाचा प्रादुर्भाव वाढला; पवित्र पोर्टलद्वारेची शिक्षक भरती आणखी लांबणीवर 

TET exam validity

पुणे (प्रतिनिधी) – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षक भरतीची प्रक्रिया थंडावली आहे. आता लॉकडाऊन उठल्यानंतरच भरतीची पुढील प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रामुख्याने खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक भरती ही राज्यातील जिल्हा बंदी उठल्यानंतर करता येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. शिक्षक भरतीचे वेळापत्रकच कोलमडले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे … Read more

“पवित्र’ शिक्षक भरतीत याचिकांचा अडसर

पुणे – राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयात दाखल झालेल्या 30 याचिकांमुळे अडसर निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून पोर्टलवर भरती प्रक्रियेबाबत काहीच सूचना प्रसिद्ध झालेल्या नाहीत. उमेदवारांचे मात्र भरतीकडे लक्ष लागले आहे. राज्यात पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. पहिल्या टप्प्यात 12 हजार शिक्षकांची भरती करण्याची … Read more

‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती

838 उमेदवारांची यादी जाहीर; नववी ते बारावीच्या गटासाठी नियुक्ती पुणे – राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या पवित्र पोर्टलमार्फतच्या शिक्षक भरतीत आता खासगी व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या इयता नववी ते बारावीच्या गटातील शिक्षकांच्या पदांसाठी मराठी, इंग्रजी माध्यमांच्या 838 शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क … Read more