nagar | पेट्रोल पंपावर लावलेल्या कंटेनरची चारचाके चोरीस

राहुरी, (प्रतिनिधी): रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला लावलेल्या कंटेनरची चार चाके व डिझेल ,असा एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे दि. १८ मे रोजी रात्री संख्येश्वर पेट्रोल पंपावर कंटेनर लावलेला असताना घडली. देवळाली प्रवरा येथील सतीश पोपट चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चव्हाण यांच्याकडे एमएच … Read more

राजस्थानचे ४ हजार पेट्रोल पंप बंद ! नागरिकांची शेजारच्या राज्यांत इंधनासाठी धाव

जोधपूर – राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या आवाहनावर रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून राज्यातील पेट्रोल पंप बंद झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) दर कमी करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला असून १२ मार्चपर्यंत संप सुरू राहणार आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंपचालक संपात सहभागी झाले नाहीत. जोधपूर, कोटा, भिलवाडा, अजमेर, जैसलमेर येथे पेट्रोल पंप … Read more

पुणे जिल्हा : ग्रामीण भागातही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

नव्या कायद्यामुळे वाहन चालक संपावर गेल्याचा परिणाम मंचर : केंद्र सरकारने वाहनचालकांविरोधात केलेल्या नव्या कायद्यामुळे देशभरात वाहन चालक संपावर गेले असून, या संपात पेट्रोल पंपांना पेट्रोल, डिझेल पुरवठा करणारे ट्रकचालकही सहभागी होणार असल्याने पुढील काही दिवस पेट्रोल पंप बंद राहू शकतात किंवा पेट्रोल पंपांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा पडू शकतो. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातही … Read more

Pune: शहरातील पेट्रोल पंप सुरूच राहणार; ट्रक चालकांच्या संपामुळे पंपावर गर्दी

पुणे – केंद्रशासनाच्या प्रस्तावित हिट ॲंड रन कायद्याच्या विरोधात राज्यभरात ट्रक चालकांकडून आंदोलने केली जात असून अनेक ठिकाणी चक्का जाम करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या ( मंगळवारी) शहरातील पेट्रोल पंप बंद राहण्याची अफवा पसरल्याने संध्याकाळनंतर पुणेकरांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोलियम पदार्थांच्या रिफिलिंगसाठी पेट्रोलियम टँकरना पोलिस संरक्षण दिले असल्याने … Read more

पेट्रोल पंप, सराफा दुकानांवर 2 हजाराची नोट खपवण्यासाठी नागरिकांची गर्दी

नगर – पेट्रोल पंप आणि सराफ बाजारात सध्या 2 हजार रुपयांची नोट घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नगर शहरात तर 50 ते 100 रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठीही थेट 2 हजार रुपयांची नोट दिली जात असल्याने त्रस्त पंपचालकांनी किमान 500 व त्याच्या पटीत इंधन खरेदी केले तरच 2 हजारांची नोट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ खरेदीसाठी 2 … Read more

शहरातील बारा पेट्रोल पंप आठ दिवसांपासून बंद

पिंपरी -रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता खासगी तेल कंपनी नयारा एस्सारकडून त्यांच्या पेट्रोल पंप डीलर्सना गेल्या दहा दिवसांपासून कमी प्रमाणात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे बारा डीलर्ससह राज्यातील 700 तर देशभरातील 5000 पेक्षा अधिक पंप गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत. या कंपनीचे डीलर्सचे … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा;निवडणूक आयोगाचे पेट्रोल पंप धारकांना आदेश

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. तसेच आचार संहिता देखील लागू करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांना दिला आहे. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे निवडणूक … Read more