मनुष्यबळ कमी, तरी लसीकरणात जिल्हा अव्वल

नगर  – गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात लम्पी त्वचारोगचा संसर्ग वाढू लागला असून त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून लसीकरण असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मनुष्यबळाचा अभाव असला तरी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्‍टरांच्या माध्यमातून जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल 64 हजार जनावरांचे लसीकरण झाले असून आतापर्यंत 5 लाख … Read more

राज्य सरकारच्या लंपी लसीकरण मोहीमेपूर्वीच आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात जनावरांचे लसीकरण पूर्ण

कर्जत / जामखेड – महाराष्ट्रात सध्या लंपी या आजाराने अनेक पाळीव प्राणी ग्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या आजाराचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात वेगाने होत आहे. विषाणूजन्य साथीचा असलेला हा आजार आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाकडे सध्या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आणि याच पार्श्वभूमीवर पशुपालकांची व जनावरांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन कर्जत-जामखेड … Read more

धक्कादायक! दक्षिण कोरियात पाळीव प्राण्यांमुळे आगीच्या घटना

सेऊल : कुत्री अथवा मांजरे पाळणे हा आधुनिक काळातील जीवनशैलीचा भाग असला तरी ही जीवनशैलीच आता अनेक कुटुंबांना संकटात टाकत आहे. पाळीव प्राण्यांमुळे आग लागण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्या असून त्यामुळे दक्षिण कोरिया प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये मांजरामुळे आणि कुत्र्यांमुळे 100 पेक्षा जास्त आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर … Read more

पाळीव जनावरांमध्ये गोचिडांमुळे तापाची साथ

मुंबई – गोचिडांमुळे पाळीव जनावरांमध्ये क्रायमिन कॉंगो हेमोरेजिक तापाची साथ पसरत असल्याने राज्याच्या सीमा भागातल्या पशुपालक आणि मांस विक्रेत्यांना सतर्क राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा रोग गुजरातमधून राज्याच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्‍यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. हा आजार बाधित जनावरांकडून माणसांमध्ये पसरत असल्याने सीमा भागातल्या पशुपालकांना या साथीबाबत … Read more

कुत्र्यावरून दोन कुटुंबांत भांडण

पिंपरी – कुत्र्यावरून दोन कुटुंबांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. याबाबत दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधात गुन्हेही दाखल केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता साईनगर, गहुंजे येथे घडला आहे. ओंकार शिवशंकर सिंग (वय 59, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, गहुंजे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी रवींद्र पोटफोडे, रवींद्र यांची पत्नी (पूर्ण नाव माहिती नाही), रोहन पोटफोडे यांच्या … Read more

कुत्र्यावरून भांडण; चार महिलांवर गुन्हा दाखल

पिंपरी – कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होत असल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे सोमवारी (दि. 6) सायंकाळी घडली. शमा शेठी (वय 40), भोज अंटी (वय 30), सोहमची आई (वय 35) आणि प्राजक्‍ताची आई (वय 30, सर्व रा. सुखवानी इलाईट, मोरवाडी, पिंपरी) अशा नावांनी आरोपींविरुद्ध गुन्हा … Read more

पाळीव प्राण्यांपासून करोनाचा धोका कमी

डब्ल्युएचओने केले स्पष्ट जिनिव्हा – जगभरात करोनाचा हाहाकार सुरू असताना पाळीव प्राण्यांपासून करोनाची बाधा होऊ शकते अशा चर्चा गेले काही दिवस सोशल मीडियावर सुरु आहेत. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) असा धोका होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे मत व्यक्त केले आहे. चीनकडून जगभरात पसरलेला करोनाचा धोका मुख्यत्वे वटवाघूळ व खवले मांजर यांच्यामार्फत पसरला … Read more

‘राधा’ गायीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

पेठ : लहान मोठ्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे होताना आपण पहिले असतील, पण तुम्ही कधी गायीचा वाढदिवस साजरा होताना पहिला क? नाही ना! तर मग हि बातमी वाचा. पेठ तालुक्यातील सणस वस्तीत चक्क एका गायीचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. शेतकरी कोंडाजी सणस यांनी आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे राधा गायीचा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. आपला स्वतःचा किंवा … Read more

पुणेकरांनो, कुत्रे पाळण्यावर येणार बंधने!

महापालिका करणार नियम : धोरण तयार करून स्थायीपुढे ठेवणार, परवानाही आवश्‍यक पुणे – कुत्रे पाळण्याच्या परवान्याबरोबरच ते किती पाळावेत, याचेही नियम महापालिका करणार असून, आरोग्य विभागाकडून यासंबंधी धोरणच तयार होणार आहे. छोट्या जागेत या प्राण्यांना ठेवून त्यांची हेळसांड केल्याबद्दल पाळीवप्राणी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. याशिवाय आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास रोखण्यासाठी महापालिका प्राणी पाळण्याबाबत नियम निश्‍चित … Read more

प्राणी पाळताय? आधी महापालिकेत नोंद करा

मागील 15 वर्षांत फक्‍त 2,700 जणांनी घेतला परवाना मालकांना लवकरच नोटीस : कारवाईचा इशारा पुणे – पाळीव प्राणी घरात ठेवण्यासाठी महापालिकेचा परवाना लागतो, हेच अनेकांना माहिती नसते. काहीजण तर याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आता विनापरवाना प्राणी पाळणाऱ्यांना महापालिका नोटीस पाठवणार असून, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. पाळीव प्राणी घरात ठेवण्यला परवाना … Read more