भीतीदायक! राज्यातील ‘या’ शहरात विद्युतदाहिन्याही पडू लागल्या अपुऱ्या

पारंपरिक पद्धतीने करणार कोविड मृतांचे अंत्यविधी : हतबल पालिका प्रशासनाचा निर्णय पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोना परिस्थितीने रौद्र रुप धारण केले आहे. शहरातील बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच आता मृतांच्या आकड्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. करोनाबाधित रुग्णांचा अंत्यविधी विद्युतदाहिनीमध्ये केला जातो. मात्र मृतांची संख्या वाढल्याने शहरातील विद्युतदाहिन्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. परिणामी मृतांचा अंत्यविधी … Read more

प्लाझ्मा दात्यांना देणार दोन हजार रुपये – महापौर

पिंपरी – करोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच, या प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून दोन हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली. सध्या खासगी रुग्णालयांमधील रुग्णांना प्लाझ्मासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये दराने प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्याऐवजी आता महापालिकेच्या … Read more

पिंपरी-चिंचवडमध्येही अंत्यविधीसाठी वेटींग; स्मशानभूमीत रुग्णवाहिकेच्या रांगा

प्रचंड ताण येत असल्याने बंद पडताहेत विद्युत दाहिन्या पिंपरी – भाटनगर, पिंपरी येथील दोनपैकी एक विद्युत दाहिनी गुरुवारी सकाळी बंद पडली. त्यामुळे नातेवाइकांना अंत्यविधीसाठी साडेदहा तासांचे वेटींग करावे लागले. पिंपरी चिंचवड शहरातील उच्चांक पातळीवर गेलेली करोना बाधितांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. मात्र करोना बाधितांच्या मृत्यूमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 40 हून … Read more

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ठेकेदारावर वीजचोरीचा आरोप

स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही महावितरणकडून कारवाईस टाळाटाळ पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने रस्त्याचे काम करणारा ठेकेदार चोरून वीज घेत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. यामुळे एक कुत्रा आणि कामगारही जखमी झाला. तरीदेखील वीज चोरीस सुरूच असल्याचा धक्‍कादायक आरोपी बिजलीनगर येथील गिरीराज सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू … Read more

सायबर हल्ल्यातील नुकसानीचे गौडबंगाल वाढले

नुकसानभरपाई देण्यास आयुक्तांचा नकार; चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची मागणी पिंपरी – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या निगडीतील अस्तित्व मॉल येथील कार्यालयातील 27 सर्व्हरवर नुकताच सायबर हल्ला झाला. त्यानंतर सुमारे पाच कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदाराचे झालेले नुकसान देण्यास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट नकार देत खंबीर … Read more

माण गावात सरपंच-उपसरपंच पदाचा नवा राजकीय ‘मुळशी पॅटर्न’

हिंजवडी – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आयटी नगरी माण गावात एक वेगळा राजकीय मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत माणच्या सरपंचपदी अर्चना सचिन आढाव तर उपसरपंचपदी “जॉइंट किलर’ ठरलेले प्रदीप श्रीरंग पारखी यांची बहुमताने निवड झाली. माण गावच्या सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणारे नंदकुमार भोईर यांच्या सौभाग्यवतींना धक्कादायक पराभवाचा सामना … Read more

नोटीसची मुदत संपण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड पालिकेची कारवाई

स्थानिक व्यावसायिकांचा आरोप : सात दिवसांची मुदत सहाव्या दिवशीच कारवाई पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बुधवारी जाधववाडी येथील अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तेथील 68 व्यावसायिकांच्या पत्राशेड भुईसपाट करण्यात आल्या. मात्र यासाठी पालिका प्रशासनाने पुरेसा वेळ दिला नाही. तसेच नोटीसचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच अतिक्रमण विरोधी कारवाई करत दुकाने उद्धवस्त केली असल्याचा … Read more

एक संगीत अकादमी असताना दुसरी अकादमी कशासाठी?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निगडी येथे संगीत अकादमी असताना आता पुन्हा आणखी एक संगीत अकादमी सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या एक संगीत अकादमी असताना आणखी एक संगीत अकादमी कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या वतीने सध्या निगडी येथे संगीत अकादमी कार्यरत आहे. … Read more

उद्योगांना घडी बसविण्याचे; तर कामगार संघटनांना वेतनवाढीचे वेध

वेतनवाढीबाबत कामगार संघटनांकडून व्यवस्थापनाला मागणीपत्र सादर पिंपरी – लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला आहे. सुमारे सहा महिन्यांनंतर उद्योगांची चाके आता रुळावर येत आहेत. स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अनेक उपाययोजना व्यवस्थापनाकडून करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीतील उद्योगनगरीतील उत्पादन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने आर्थिक चक्राला गती मिळाली आहे. तरीदेखील उद्योजकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. दुसरीकडे कामगार … Read more

अँटिबॉडीज असल्या तरी करोनाचा धोका

पिंपरी – करोना झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्याआधी करोना होऊन गेला आहे की नाही हे तपासण्यासाठी अँटिबॉडीजची (प्रतिपिंड) चाचणी केली जाते. गेल्या एक महिन्यांपासून शहरामध्ये खासगी प्रयोगशाळेत या चाचणीसाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. शरीरात प्रतिपिंड तयार झाली असतील तर आता करोना होणार नाही अशी नागरिकांची समजूत आहे. मात्र … Read more