पुणे जिल्हा | बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

पिंपळवंडी/आळेफाटा, (वार्ताहर) – काळवाडी (ता.जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे. काळवाडी येथे यात्रेनिमित्त मामाच्या गावी आलेला रुद्र महेंद्र फापाळे (वय 8, रा. मूळगाव बदगीबेलापूर, ता.अकोले) सकाळी साडेआठच्या सुमारास आजोबा रोहिदास काकडे यांच्यासोबत शेतात गेला होता. जनावरांसाठी कडबा कुट्टी … Read more

पिंपळवंडीजवळ वाहनाच्या धडकेने बिबट्या गंभीर

उपचारासाठी माणिकडोह निवारण केंद्रात केले दाखल आळेफाटा – नगर-कल्याण महामार्गावर पिंपळवंडी गावच्या हद्दीत रविवारी (दि. 3) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्यामुळे हा बिबट्या गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी माणिकडोह येथे हलविण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपळवंडी गावच्या हद्दीमधील वाळुंजवाडी येथे मुक्ताईदेवीच्या मंदिराजवळ नगर कल्याण महामार्ग पार करत … Read more

आळेफाटा पिंपळवंडी दरम्यान अपघात वाढले

पुणे-नाशिक महामार्गाची कामे अर्धवट : वाहतूक कोंडीलाही आमंत्रण : प्रशासनाचे दुर्लक्ष आळेफाटा – पुणे-नाशिक महामार्गाची अनेक ठिकाणी अपूर्ण कामे आहेत. यामुळे आळेफाटा ते पिंपळवंडी या दरम्यान अपघातांचे प्रमाण वाढले असून ही कामे सुरु होणार कधी, असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पुणे-नाशिक महामार्गाची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत असल्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे. चाळकवाडी … Read more