पिंपरी चिंचवड – डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी 58 कोटींची निविदा

  पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) -पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीला आता पिंपरी गावात किंवा पुढे पिंपळे सौदागरकडे जाण्यासाठी पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म येथील रेल्वे फाटकावर थांबण्याची गरज नाही. कारण, डेअरी फार्म येथील लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यास संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने उड्डाणपूल बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यासाठी स्थापत्य विभागाकडून आज निविदा प्रसिध्द … Read more

पिंपरी चिंचवड – दोन हजारांपैकी फक्‍त पाच टक्‍के पोलीस फिट

पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – सुरक्षा आणि कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाला फिट असणे खूप गरजेचे आहे. परंतु अत्यल्प मनुष्यबळ, कामाच्या वेळा, अतिरिक्‍त ताण, कामामुळे बिघडलेले जेवण आणि झोपण्याचे वेळापत्रक या सर्व बाबींनी ज्यांना सर्वांत अधिक फिट असायला हवे त्यांच्याच फिटनेसवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या फिटनेस चॅलेंजमध्ये 2,194 पैकी केवळ … Read more

एकवीरा देवीच्या उत्सवासाठी प्रशासन सज्ज

  कार्ला, दि.24 (वार्ताहर) – श्री एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाची सुरवात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच सोमवारी (दि.26) घटस्थापना करण्यात येणार असून महानवमीचा हा होम 4 आक्‍टोबरला पहाटे होणार आहे,अशी माहिती एकवीरा देवस्थान कार्ला वेहरगाव प्रशासकीय समितीच्या वतीने देण्योडत आली. यानिमित्त मुख्य मंदिर व परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने हा परिसर दिव्यांच्या उजेडात उजळून निघाला आहे. … Read more

जिल्हा परिषद शाळांना सुविधा पुरविणार – आमदार शेळके

  वडगाव मावळ, दि. 24 ( प्रतिनिधी) -जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खरी गुणवत्ता असते. त्यांना त्यांच्या पातळीवर जाऊन शिक्षक शिक्षण देतात परंतु अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा नसल्याने खाजगी शाळांच्या तुलनेत ते कमी पडतात. त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्‍वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले पंचायत समिती मावळ व मावळ विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त … Read more

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत घुमला स्वच्छतेचा नारा

  हिंजवडी, दि. 24 (वार्ताहर) – जिल्ह्यातील 1385 पैकी 810 ग्रामपंचायतींमध्ये “स्वच्छता हीच सेवा’ अभियान पंधरवडा साजरा होत आहे. त्यापैकी 465 ग्रामपंचातींनी हे अभियान पूर्णत्वास नेले. स्वच्छता अभियानात मारुंजी-नेरे ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे काम वाखण्याजोगे आहे. स्वच्छता दूत निर्माण करणाऱ्या या उपक्रमाची जिल्हा परिषद प्रशासनाने नोंद घेतली असून, शासकीय पोर्टलवर आशा विधायक उपक्रमांची माहिती प्रसारित केली … Read more

“मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही”आदित्य ठाकरे यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

  वडगाव मावळ, दि. 24 (प्रतिनिधी) -महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही, अशी टीका माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख खोके सरकार असा करत ठाकरे म्हणाले की, फॉक्‍सकॉन प्रकल्प गुजरातला गेला यात केंद्र किंवा गुजरात सरकारचा नव्हे तर खोके सरकारचा दोष आहे. … Read more

पिंपरी चिंचवड – महापालिकेच्या शाळांमध्ये 285 शिक्षकांची कमतरता

  पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे येथील शाळाही स्मार्ट होतील अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेच्या प्राथमिक शाळेत तब्बल 285 शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांवर दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी कसे स्मार्ट होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. … Read more

पिंपरी मनपा शाळांमध्ये 285 शिक्षकांची कमतरता

  पिंपरी, दि. 24 – पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे येथील शाळाही स्मार्ट होतील अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेच्या प्राथमिक शाळेत तब्बल 285 शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांवर दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 शाळा आहेत. यामध्ये 18 हजार 893 मुले … Read more

अनुदान आले, परतही गेले पगार जमा नाही झाला

पिंपरी  -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 35 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यास होतो. शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतरही महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियपणामुळे या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन शासनाकडे परत गेले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या वेतनापासून वंचित रहावे लागले आहे. तर जानेवारी महिन्याचे वेतन झाल्याचा दावा उपायुक्त संदीप … Read more

पिंपरी-चिंचवड शिरपेचात मानाचा तुरा

पिंपरी  -उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेस महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे ब वर्ग महापालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. महाराष्ट्र महापौर परिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. यासाठी प्रश्‍नावलीद्वारे महापालिकांकडून माहिती मागविण्यात येत असते. या कामाचे परीक्षण करून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येत असते. त्यामध्ये निवड झाल्याने शहराच्या शिरपेचात मानाचा … Read more