कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा

नामवंत अर्थतज्ज्ञ, संशोधकांशी शिफारशींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची चर्चा मुंबई : कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ज्ञ, संशोधक यांनी केलेल्या शिफारशींमुळे निश्चितच राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालबद्ध रितीने या शिफारशीवर कृती करण्याच्या सूचना दिल्या व तसा आराखडा लगेच सादर करण्यास सांगितले. महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा … Read more

शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

नागपूर शहर व ग्रामीण आरोग्य विभागाचा घेतला आढावा… नागपूर : नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना विषयक बाबींचा नागपूर शहर … Read more

भंडारा : कृषी पंपाला बारा तास वीज देण्याचे नियोजन करा – पालकमंत्री

भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने धान रोवणी केली असून पावसाच्या अनियमिततेमुळे धान जिवंत ठेवण्यासाठी कृषी पंपांना १२ तास वीज देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी वीज विभागाला दिल्या. याविषयी पालकमंत्र्यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असिम गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. भंडारा … Read more

छोट्या व्यावसायिकांसाठी योजना आखा

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांची मागणी पुणे(प्रतिनिधी) – प्रथमच देशात आर्थिक आणीबाणी ओढावली असून कर भरणारा व्यापारी वर्ग कर्ज बाजारी झाला आहे. याची केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी दखल घेणे आवश्‍यक आहे. ठराविक रक्कमेपर्यंत व्यवसायिक कर्ज माफ करावीत तसेच पुढील कर्जाला शून्य टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करुन द्यावीत. छोट्या … Read more

नागपुरसाठी बुध्दिस्ट थीम पार्कचा आराखडा करा – पालकमंत्री

नागपूर : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क, भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुध्दिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन स्टेडियम, वाहन विरहीत बिझनेस सेंटरचा आराखडा देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू … Read more

चीनला आणखी एक झटका ;हिरो सायकल कंपनीकडून ९०० कोटींचा करार रद्द

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनकडून करण्यात आलेल्या हिंसक कृत्याला आता भारताकडून चांगलेच उत्तर मिळताना दिसत आहे. कारण सरकारसह सर्वच भारतीयांनी चीनची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे. भारतातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबतचा भविष्यातील ९०० कोटींचा करार रद्द केला आहे. करोनाच्या काळात अनेक कंपन्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पण हिरो सायकल … Read more

भारतीय सैन्याकडून ‘टूर ऑफ ड्युटी’ कार्यक्रमाची आखणी

नवी दिल्ली : भारतीय युवकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याकडून ‘टूर ऑफ ड्युटी’ कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे . भारतीय सैन्याने देशातील युवकांसाठी तीन वर्षांचा इंटर्नशिप कार्यक्रम आणला आहे. यामध्ये अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांचा समावेश आहे. ‘आपल्या देशात बेरोजगारी एक वास्तव आहे’ या सत्याचा स्वीकार करत सैन्याने तीन वर्षाच्या … Read more

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश ठाणे : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निविष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, जास्त दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. ठाणे जिल्हाधिकारी … Read more

“सुजल गाव, स्वच्छ गाव’ योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा

उदय कबुले; जिल्हा परिषदेत “जल जीवन मिशन’ अंतर्गत कार्यशाळा सातारा  – ग्रामपंचायतींचे आराखडे तयार करताना पाऊस, पाणी संकलन, पाणलोट व्यवस्थापन, पाणी आडवण्याची कामे करुन जल जीवन मिशन आणि “सुजल गाव, स्वच्छ गाव’ योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. सुजल व स्वच्छ गावाची जबाबदारी सर्वांची असून लोकांचा सहभाग घेऊन अशा गावांची निर्मिती करावी, असे आवाहन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष … Read more

कण्हेर पाणी योजना पाच वर्षांनंतरही अपूर्णच

संतोष पवार सातारा – शाहूपुरीकरांना मुबलक पाणी मिळावे यासाठी 2015 मध्ये शाहूपुरी पाणी योजनेसाठी 33 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मोठ्या धुमधडाक्‍यात कामही सुरु झाले. मात्र पाच वर्षे झाली तरी अद्याप ही योजना पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे वर्षभरात शाहूपुरीकरांना पाणी देण्याची घोषणा हवेतच विरली असून ग्रामस्थांची पाणी समस्या अद्यापही कायमच आहे. शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना … Read more